तुम्हाला माहीत आहे का आपल्या या हातांच्या बोटांमध्ये लपले आहे खूप मोठे गुपित.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या जीवनात ज्योतिशास्त्राचे खूप महत्व आहे. मनुष्याचे हात, पाय, डोळे पाहून त्याबद्दल विविध बाबी सांगितल्या जातात. हातांवरील रेषांचे ज्योतिषशास्त्रात विषेश महत्व सांगितलेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या हाताचा अभ्यास करून त्याचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ सर्व काही जाणून घेता येऊ शकते. हस्तरेषा अभ्यासाद्वारे मनुष्याच्या पूर्ण जीवनाबद्दल आपण सांगू शकतो.

ज्यामध्ये संपूर्ण जीवन आपण सहज बघू शकतो. फक्त बोटांच्या आकारावरून आणि रेषां वरून आपण आपल्या जीवनातील बहुतेक गोष्टी जाणून घेऊ शकतो. काही व्यक्तींची बोटे लहान तर काही व्यक्तींची बोटे लांब असतात. काही व्यक्तींची बोटे भारी तर काही व्यक्तींची बोटे जाड असतात. काही व्यक्तींची बोटे वाकडी तिकडी तर काही व्यक्तींची गाठ बसलेले असतात.

अशा या बोटांच्या प्रकारावरून आपण बहुतेक बाबी जाणून घेऊ शकतो. आपल्या प्रत्येक बोटाला तीन भागांमध्ये विभाजित केले असते पोटाच्या वरच्या भागाला पेर असे म्हणतात. म्हणजेच प्रत्येक बोट तीन पेरांमध्ये मध्ये विभागलेले असते. प्रत्येकाच्या एका हाताला पाच बोटे असतात त्यामध्ये अंगठा व तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी अशी पाच बोटे असतात.

तर्जनी बोटावर गृहस्पती, मध्यम बोटावर शनि अनामिका बोटावर सूर्य आणि करंगळी बोटावर बुधाचा परिणाम जाणवतो. प्रत्येक बोटाचे एक वेगळे महत्व असते. ज्या व्यक्तींच्या बोटाचा अर्धाभाग शार्प असेल किंवा मधल्या बोटामध्ये गाठ नसेल असे व्यक्ती कलेचे किंवा साहित्याचे उपासक असतात. त्यांचे विचार धार्मिक आणि अपरिपक्व असतात.

तसेच या व्यक्तींमध्ये काम करण्याची क्षमता खूप कमी असते. संसारिक जीवनामध्ये हे कमकुवत असतात. ज्या व्यक्तींची बोटे लांब असतात असे व्यक्ती इतरांच्या कामात खूप हस्तक्षेप करतात त्यांना इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप करणे खूप आवडते. स्वतःचे काम सोडून ते इतरांच्या कामांमध्ये जास्त लक्ष देतात. ज्या व्यक्तींची बोटे पातळ आणि लांब असतात असे व्यक्ती चतुर तसेच राजकारणी असतात.

ज्या व्यक्तींची बोटे मध्यम आकाराचे असतात ती व्यक्ती इतरांपेक्षा जास्त समजूतदार असतात. ते लोक प्रत्येक गोष्टी समजूतदार पणे घेतात. ज्या व्यक्तींचे बोट खूप लहान असतात ते व्यक्ती खूप आळशी आणि सुस्त असतात. असे व्यक्ती स्वार्थी असतात ते फक्त आपल्या पुरताच विचार करतात. तसेच ते स्वभावाने देखील दुष्ट असतात व क्रूर प्रवृत्तीचे असतात.

ज्या व्यक्तींचे पहिले बोट म्हणजे तर्जनी खूप लांब असते ती व्यक्ती हुकूमशहा प्रवृत्तीचे असतात. असे व्यक्ती तर लोकांवर आपले विचार लादून काम करतात. सगळे बोटे एकत्र मिळून जर तर्जनी आणि मध्यमा यामध्ये एक छिद्र दिसत असेल. त्या दोघी बोटांमधून उजेड दिसत असेल तर अशा व्यक्तींना वयाच्या ३५ व्या वर्षापर्यंत पैशांची खूप चणचण भासते.

त्यांना तोपर्यंत पैशांची कमी झेलावि लागते. सगळे बोटे जुडवली तर मध्यमा आणि करंगळी या दोघी बोटांमध्ये जर छिद्र पडत असेल तर अशा व्यक्तीला जीवनाच्या मधल्या काळामध्ये धनाची कमतरता जाणवते. तर अनामिका आणि कनिष्ठा या दोन बोटांमध्ये जर छिद्र पडत असेल तर त्या व्यक्तीला वृद्ध काळात दारिद्र्याचा सामना करावा लागतो.

ज्या व्यक्तीची करंगळी खूप लहान आणि वाकडी तिकडी असते अशा व्यक्ती खूपच उतावळा स्वभावाच्या असतात. तसेच बेईमान ही असतात, त्यांना प्रत्येक कामांमध्ये घाई असते आणि इतरांना फसवण्यात यांचा हातखंड असतो. तर व्यक्तींच्या हातांवरून आणि हातांच्या बोटांवरून व्यक्तीचा जीवन परिचय आपण सहज करून घेऊ शकतो.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *