घराबाहेर या गोष्टी असतील तर त्या आत्ताच करा दूर, नाहीतर आयुष्यभर करावा लागेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तुदोष बरोबर असेल तर घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा राहते. पण दुसरीकडे वास्तूमध्ये काही त्रुटी राहिल्यास घरामध्ये त्रास अडथळे आणि रोग सतत असतात. वास्तू नुसार प्रत्येक दिशेवर कोणत्या ना कोणत्या देवतेच राज्य असत. याच कारणामुळे घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचे स्वतःचे महत्त्व आहे. चला त्याविषयी जाणून घेऊयात.

चुकीच्या दिशेला ठेवलेल्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा सहज प्रवेश करते. वास्तूमध्ये घरामध्ये वस्तू योग्य दिशेने ठेवणे महत्त्वाचा आहे. तर दुसरीकडे घराबाहेर चुकूनही काही वस्तू नसाव्यात ज्या नकारात्मकता निर्माण करतील.

१) घरासमोर कचरा ठेवू नये- अस मानल जात की ज्या घरामध्ये स्वच्छता आणि वस्तू योग्य दिशेला ठेवल्या जातात तेथे माता लक्ष्मीचा वास असतो. अनेक जण घरासमोर कचरा टाकतात घराच्या दारासमोर कचरा हे गरिबीचा निर्देशक आहे. अशा स्थितीत ज्या घरासमोर कचरा साठला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी वास राहत नाही. या सवयीमुळे घरात अशांतता रोग आणि धनहानी होण्याची शक्यता असते.

२) घरापेक्षा रस्ता उंच असू नये- वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा समोरच्या रस्त्यापेक्षा उंच नसावा. ज्या लोकांचे घर समोर बांधलेल्या रस्त्याच्या खाली असेल तर तेथे नकारात्मक ऊर्जा वास करते. अशा घरांमध्ये नेहमीच रोगदायी आणि भांडण होत असतात.

३) घरात काटेरी वनस्पती- घरात काटेरी वनस्पती असं टाळावे. वास्तुशास्त्रानुसार चुकूनही घराच्या मुख्य दरवाजा समोरच्या काटेरी झाड लावू नये. वास्तूमध्ये हे निषेध मानल गेलय. ज्या घरासमोर काटेरी झाड असत त्या घरात सुख समृद्धी येण्यास अडथळे निर्माण होतात.

४) घरासमोर दगड विटांचा ढीग- याव्यतिरिक्त घरासमोर दगड विटांचा ढीगही असू नये. अनेक लोक आपले घर सुंदर बनवण्यासाठी घराबाहेर विविध प्रकार आणि विटा ठेवतात. वास्तू नुसार घराबाहेर पडलेले दगड जीवनात पुढे जाण्यास अडथळा बनतात. त्यामुळे घराबाहेर गोळा केलेले दगडही ठेवले असतील तर ते लगेच काढून टाका.

५) घराबाहेर सांडपाणी वाहने- याशिवाय घराबाहेर सांडपाणी वाहने सुद्धा चुकीचं मानल गेलय. ज्या लोकांच्या घरासमोर घाण पाणी आहे त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच राहत नाही. घराबाहेर घाम पाणी साटण म्हणजेच नकारात्मकतेला आव्हान आहे. अशावेळी आपल्या घरात अलक्ष्मी घरात राहते. अशा परिस्थितीत घराबाहेर पाणी साठू देऊ नका.

६) घरासमोर विजेचा खांब- त्यानंतर घरासमोर विजेचा खांब सुद्धा असू नये. वास्तुशास्त्रानुसार घरासमोर विजेचा खांब नसावा. कारण घरासमोर विजेता खाऊ असल्यास घरातील सदस्यांमध्ये नेहमी भांडण वाद होतात अस बोलल जात.
मित्रांनो तर या गोष्टी तुमच्या घराबाहेर चुकूनही ठेवू नका. कारण यामुळे नकारात्मकता निर्माण होईल आणि तुमच्यावर समस्येचा आक्रमण होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *