मंगलमय योग, या राशींना धनलाभ, अचानक जुळून येतील मंगलमय योग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी या आठवड्यामध्ये मंगलमय असा त्रीग्रही योग जुळून आलाय. त्याचा लाभ काही राशींना होणार आहे अडकलेले पैसे असतील कुठे तर ते येतील किंवा जुनी येणी वसूल होतील. अशा अनेक धनलाभच्या घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात. कोणत्याही त्या राशी चला बघूया.

१) मेष रास – मेष राशीसाठी हा काळ मिश्र फलदायी म्हणावा लागेल. आता मिश्र फलदायी म्हणजे नक्की काय तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जरी सुख शांतता असली तरी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे जीवन तणावयुक्त असल्याचे दिसून येईल. जर तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करायचे आहे तर त्याच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. शेअर बाजारात मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा.

नोकरी बदलण्यासाठी हा काळ प्रतिकूल आहे. अति आत्मविश्वास टाळावा शैक्षणिक क्षेत्रात यश आहे. खास करून ते विद्यार्थी आहेत ते स्पर्धेमध्ये यशस्वी होतील. व्यस्त जीवनातून कुटुंबीयांसाठी थोडा वेळ तुम्हाला काढावा लागेल. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काही खरेदी तुम्ही या काळामध्ये करू शकता. खास करून मित्रांचा सहकार्य तुम्हाला लाभेल.

२) वृषभ रास – हा काळ वृषभ राशीसाठी अत्यंत अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख शांतता बघायला मिळेल सर्वजण एकत्रितपणे काम करत असल्याचे दिसून येईल. कुटुंबात मंगल कार्य ही होऊ शकत. सगळ्यांची येजा सुरू असेल म्हणजे पाहुणे मंडळी ये जा करतील त्या कार्याच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती आहे उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे.

स्पर्धेत सुद्धा यश प्राप्त होऊ शकत. वृषभ राशीच्या लोकांचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर जास्त प्रमाणात खर्च होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. व्यापार करणाऱ्यांसाठी वृद्धीचा काळ आहे तसेच वैवाहिक जोडीदारासह आपण काही सुखद क्षण सुद्धा अनुभवाल. मुलांचा सहकार्य या काळात तुम्हाला दिसून येईल.

३) मिथुन रास – मिथुन राशि साठी सुद्धा हा काळ अनुकूल म्हणावा लागेल. कारण कौटुंबिक जीवनात त्यांनाही सुख शांती बघायला मिळेल. कुटुंबाची अतिरिक्त जबाबदारी येण्याची संभावना मात्र आहे. त्याने तुम्ही काहीच येत रस्ता झालेले दिसाल. घराची सजावट घराची दुरुस्ती अशा काही गोष्टींमध्ये पैसे या काळात खर्च होऊ शकतात.

मात्र खर्च नियंत्रणात ठेवण्यात हिताचे ठरेल. नोकरीत असताना परिवर्तन संभवतात व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. मात्र मन विचलित राहू शकत. उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे कुटुंबात मंगल कार्यांचा आयोजन होऊ शकत. कुटुंबीयांसह खरेदीला जाण्याचे योग आहेत.

४) कर्क रास – हा काय कर्क राशि साठी अत्यंत चांगला म्हणावा लागेल. कारण वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण तुम्ही घालवाल. तुमच्या प्राप्तीमध्येही वाढ होईल. मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही आर्थिक गुंतवणूक कराल. भविष्यात उपयोगी होण्यासाठी पैसा सुरक्षा ठिकाणी गुंतवा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना सोपवण्यात आलेली काम वेळेवर पूर्ण करावी. व्यापारी वर्गासाठी हा काय योग्य दिसून येत आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना मात्र अधिक परिश्रम घ्यावे लागतील. घरातल वातावरण धार्मिक राहील.

५) सिंह रास – हा काळ सिंह राशीसाठी अनुकूल आहे कारण वैवाहिक जीवनामध्ये आनंद दिसेल. जोडीदार भरपूर सहकार्य करेल. व्यवसाय वृद्धीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरी प्रगतीची संधी मिळेल नोकरीत स्थान परिवर्तन होण्याची संभावना आहे. धनसंचय कसा करावा हे आपण वरिष्ठांकडून शिकून घ्याव. काही बदल होऊन त्यात वृद्धी होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्तीचे योग आहेत. उच्च शिक्षणासाठी सुद्धा हा काळ अनुकूल म्हणावा लागेल. जे विद्यार्थी स्पर्धांची तयारी करत आहेत त्यांना त्यांचे परिश्रम वाढवावे लागतील. तसंच विवाहा इच्छुकांची विवाहाची बोलणी संभवतात. अर्थात जे स्थळ शोधतायत त्यांच्यासाठी हा काळ जोडीदाराच्या शोधाच्या समाप्तीचा ठरू शकतो.

६) कन्या रास – कन्या राशीसाठी सुद्धा अत्यंत चांगला काळ आहे कुटुंबीयांचा सहकार्य मिळणार आहे. कुटुंबाच्या सहवासात वेळ घालवन तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. कारण तुम्ही बऱ्याच नव्या गोष्टी शिकाल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीची संधी आहे. व्यापारात सुद्धा लाभ आहे.

एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने प्रलंबित काम पूर्णत्वास जातील. धनलाभाचे योग आहेत. मुलांकडून कन्या राशीच्या लोकांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. काही गरजेच्या वस्तूंची खरेदी ही या काळामध्ये होऊ शकते. परंतु तरीसुद्धा खर्चावर नियंत्रण मात्र तुम्हाला ठेवावे लागेल. भावाच्या विवाहात येणाऱ्या अडथळे दूर होतील.

७) तुळ रास – हा काळ अत्यंत चांगला तूळ राशीच्या व्यक्तींना म्हणावा लागेल. कारण कुटुंबीयांचा सहकार्य मिळणारच पण त्याचबरोबर मुलांच्या उत्तरदायित्वाची पूर्तता होईल. विद्यार्थी शिक्षणासाठी एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याची सुद्धा शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी हा काळ योग्य आहे. नोकरी करणारे व्यक्तींना नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील .संधीचा फायदा मात्र तुम्हालाच करून घ्यावा लागेल.

व्यापारी व्यापार वृत्ती करण्यात यशस्वी होतील. अचानकपणे खर्च येतील जे तुम्हाला करावेच लागतील. तसे तुमचे थकबाकी परत मिळण्याचे योग आहेत म्हणजे तुम्हचे पैसे कुठे अडकले असतील तर तुम्हाला या काळात परत मिळू शकतात. घर आणि जमीन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.

८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी सुद्धा हा काळ अनुकूल आहे कुटुंबीयांचा सहकार्य मिळणारच आहे पण एखाद्या धार्मिक स्थळी तुमचा प्रवास होऊ शकतो. विद्यार्थी सुद्धा शिक्षणासाठी म्हणून बाहेरगावी जाऊ शकतात. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. थकबाकी मिळेल शैक्षणिक क्षेत्रात यश आणि प्रगती बघायला मिळेल. व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखीतील आणि तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीतही प्रगतीची संधी आहे. म्हणजे एकंदरीतच तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असला तरी वृश्चिक राशीच्या लोकांना हा काळ अनुकूल आहे.

९) धनु रास – धनु राशीसाठी आर्थिक स्थितीत जरा चढ-उतार पाहायला मिळतील. खर्चात वाढ झाल्याने त्रस्त झाल्याचे तुम्ही दिसून याल. प्रकृतीमुळे खर्चात वाढ होऊ शकते.मुलांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मात्र आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा त्यांची पद आणि प्रतिष्ठा उंचावत असल्याचा दिसेल
व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होते व्यापार वृद्धी करण्यात ते यशस्वी होतील. विद्यार्थी मन लावून अध्ययन करताना दिसतील. स्पर्धेत यश प्राप्त होईल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे संपुष्टात येतील. जमीन जमल्यास गुंतवणूक करण्याचाही फायदा होईल.

१०) मकर रास – मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ जरा वेगळा असेल. वेगळा यासाठी कारण तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल. तसंच जोडीदाराबरोबरचे तुमचे संबंध सुधारतील म्हणजे वैवाहिक जीवनात ज्यांच्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी हा काळ थोडा सुधारणा घेऊन येईल असेच म्हणणावे लागेल.

११) कुंभ रास – कुंभ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये सगळेजण एकजुटीने काम करताना दिसतील. त्याचबरोबर घरामध्ये मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये या मंगल कार्यासाठी सगळेजण मिळून खरेदी करू शकतात आणि ही खरेदी करताना कुटुंबातील सर्व सदस्यांना आनंद येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी काळ अनुकूल आहे कारण नोकरीत प्रगतीच्या संधी आहेत.

खर्चात वाढ होणारे कारण अर्थातच मी मगाशी म्हटलं तसंच धार्मिक कार्य होईल आणि धार्मिक कार्यानिमित्त खरेदी केली जाईल. प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचा विचार तुम्ही करू शकता व्यापाऱ्यांना इच्छित लाभ झाला तर दिसून येईल. थोडक्यात आर्थिक स्थिती व्यापाऱ्यांची मजबूत असेल.

१२) मीन रास – मीन राशीसाठी हा काळ अनुकूल आहे. तेव्हाही जीवनात सुख शांतता नांदेल पण वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण सुद्धा तुम्ही घालवाल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल व्यवसायात देखील यशस्वी होऊ शकाल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या ऑफर येतील. पगार वाढ होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर पदभारही वाढेल. स्वतःसाठी आणि कुटुंबीयांसाठी काही गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल. उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे. ज्या व्यक्ती शासकीय नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांना यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. घर जमीन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. वाणीत माधुरीय मात्र टिकवून ठेवाव.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *