पितृपक्षात का येतो १८ हातांचा गणपती? तुम्हाला माहिती आहे का यामागील शास्त्रीय कारण.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो पूर्ण भारतभर गणेश उत्सव साजरा केला जातो. नुकतेच या गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झालेय. मात्र नागपुरातील गणेशोत्सव अद्याप संपलेला नाही. नागपूरकर भोसले यांच्या वतीने नागपुरातील महाल भागात असलेला मोठा राजवाडा येथे दरवर्षी पितृपक्षात हडपत्या गणेश उत्सव साजरा येतो. गेल्या २३६ वर्षापासून ही अनोखी परंपरा कायम आहे. पूर्व विदर्भातील लोक पितृपक्षातील गणेशोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात.

अस म्हणतात की नागपूर भोसले घराण्यातील लढवय्या सरदार श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाध्य चिमणा बापू हे अन्याविरुद्ध लढण्यासाठी बंगालच्या स्वारीवर गेले होते तेथे विजय प्राप्त करून परत येत असताना कुणाचाराच्या घरगुती गणपतीचे विसर्जन झालं होत. त्यामुळे बंगाल वरील विजय असो साजरा करण्यासाठी पितृपक्षात इसवीसन १७८७ मध्ये चिमण्या बापू यांनी हडपक या गणपतीची प्रतिष्ठापना केली.

तेव्हापासून या उत्सवाची परंपरा सुरू झाले. नागपूर घरण्यात गणेश उत्सव साजरा केला जातो. भोसले राजवाड्यातील हडपत्या गणपतीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तीच वेगळपण म्हणजे भोसले घराण्यात चिमणा बापूंनी १८ हातांची २१ फुटाची मूर्ती स्थापन केली होती. आता चार फुटाची मूर्ती पूजेसाठी ठेवण्यात येते. परंतु गणेश मूर्तीच्या अठरा हातात आयुध आताही तसेच ठेवण्यात आले.

संकष्टी चतुर्थीला त्याची प्रतिष्ठापना केली जाते. आणि दहा दिवसांनी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत. दरवर्षी भोसले वाड्यात हा उत्सव अविरतपणे साजरा केला जातो. मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यापासून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पूर्वपार अनेक लोककला सादर करण्यात येतात. प्रामुख्याने लावणी नकला खडी गंमत इत्यादी अनेक खड्डा मस्करीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते.

या कार्यक्रमांना नागपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते. यामागील मुख्य धारणा अशी की या लोककलेला राजश्रय देऊन ही लोककाला जपली जावी आणि समाजात एकता प्रस्तावित व्हावी. कालांतराने या थट्टामस्करीच्या कार्यक्रमाहूनच या गणेशाला मस्कऱ्या नाव देण्यात आल.

अशी माहिती राजे मुदोजी भोसले यांनी दिले आहे. श्रीमंत राजे मधुजी महाराज भोसले हे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या व्यवस्थापनात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. हा नवसाला पावणारा गणपती आहे याची प्रचिती भक्तांना आजही येते. असा दावा सुद्धा करण्यात येतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *