२६ फेब्रुवारी २०२३ भानू सप्तमीला ही एकच गोष्ट करा यश तुमचच समजा..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुम्हाला प्रत्येक कामात यशस्वी व्हायचय का? म्हणजे ते काम कोणत्याही प्रकारचे असू द्या बर का म्हणजे आर्थिक व्यवहार असू देत, कोर्ट करचेरीचे काम असू द्यात, स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा इतर कोणत्याही प्रकारच काम पण यश तुम्हालाच हवय. अस जर असेल तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे.

येत्या २६ तारखेला अर्थात रविवारी आहे भानू सप्तमी आणि या भानू सप्तमीच्या दिवशी एक छोटस काम तुम्हाला करायच ज्यामुळे यश तुमचंच होणार पण कोणता काम चला जाणून घेऊया. मित्रांनो भानु सप्तमी ही तिथी सूर्य देवांना समर्पित आहे आणि जेव्हा आपण सूर्य देवांचे उपासना करतो तेव्हा आपल्याला यश प्राप्ती होतेच होते.

म्हणूनच भानू सप्तमीला हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. तसं तर हा उपाय तुम्ही वर्षभर केलात तर मग विचारायलाच नको. कोणत्याही प्रकारच काम हाती घ्या यश तुमचंच होणार आहे. नाही वर्षभर जमल तर कमीत कमी भानू सप्तमीला तरी हा उपाय तुम्ही नक्की करा. करायचंय काय तर तुम्हाला भानु सप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे म्हणजे सूर्योदयापूर्वी उठायच आहे.

स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे.त्या कलशामध्ये अक्षदा, पाणी, कुंकू हे सर्व त्या कलशामध्ये टाकायचा आहे आणि सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचा आहे. अर्थात हातात घेतलेले ते जल सूर्यनारायणाकडे बघत सूर्यनारायणाच्या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्यनारायणाला अर्पण करायचा आहे आणि त्या दिवशी उपवास करायचा आहे.

फल आहार करू शकता. आणि हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्य देवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच सोडायचा आहे. त्या दिवशी गरजूंना दान करायचा आहे. गाईला हिरवा चारा द्यायचा आहे. त्याचबरोबर सूर्यनमस्कारही घालायचे आहेत. आणि सूर्याची बारा नाव घ्यायला विसरायच नाही. सूर्य पूजेमध्ये सूर्यांच्या नावांचा उल्लेख झालाच पाहिजे या उपासनेचा होणारा लाभ तुम्हाला काही काळातच दिसून येईल.

कारण सूर्य देवाच्या कृपेमुळे आपल्याला आरोग्य मिळत. सूर्यनारायणाची कृपा झाली तर पद,प्रतिष्ठा, सन्मान, यश हे सगळच मिळत. सूर्याची उपासना करून बघा. कर्ण हा सूर्याची उपासना करायचा आणि त्यामुळे तो कसा तेजस्वी होता हे ही आठवा. कर्णाने जशी सूर्याची उपासना केली एवढी कडक उपासना करायला आपल्याला तरी कमीत कमी सकाळी उठल्यानंतर सूर्याला जल अर्पण करायला जमल तरी सुद्धा सूर्याच्या तेजाचा अंश आपल्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही.

आता सूर्याची जी बारा नाव घ्यायचे आहेत ती नाव याप्रमाणे आहेत, १)ओम मित्राय नमः|२) ओम रावये नमः|३) ओम सूर्याय नमः|, ४) ओम भानवे नमः|,५)ओम खगाय नमः|, ६)ओम पुश्रे नमः|,७) ओम हिरण्यगर्भाय नमः|,८) ओम मारीचय नमः|९) ओम आदित्यय नमः|१०) ओम सावित्रे नमः|११) ओम अर्काय नमः|१२) ओम भास्कराय नमः| ती सूर्याची बारा नावे तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करताना म्हणायची आहेत. सुरुवातीला थोडा सराव करा. सराव करून जमेल.

आता भानु सप्तमीच्या दिवशी तुम्ही हे करा तुम्हाला यश प्राप्ती तर होईलच. पण भानू सप्तमीच्या दिवसापासून तुम्ही हे जर करण्याचा संकल्प घेत आहात मात्र भानू सप्तमीच्या दिवशी तसा आधी संकल्प करा की भानू सप्तमीपासून तुम्ही हे अर्घ्य तोच द्याल.

मित्रांनो गोष्टी दिसायला बरे असतात. अगदी साध्या सरळ असतात. आपल्याला अस वाटत की या करून आपल्या आयुष्यात काय बदल होणार आहे. पण मी काय म्हणते जर नुकसान होत नसेल तर करून बघायला काय हरकत आहे.

श्रद्धा भक्ती ने कोणताही काम केल तर ते परिणाम करतच करत. तुम्ही जर आयुष्य कडून निराश झाला असाल तर मात्र अशा गोष्टी तुम्ही नक्कीच करायला हव्या. कारण काही नाही पण कमीत कमी सकारात्मकता तरी तुमच्या आयुष्यात या गोष्टींमुळे नक्कीच येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *