गणेश चतुर्थीच्या एका उपायाने आयुष्य बदलून जाते. नक्की करून बघा हा उपाय.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी संकट कितीही मोठा असू वीवंचना कितीही असू द्या, पण एकदा का विघ्नहर्ताची कृपा झाली की कुठलही संकट कुठलीही विवंचना तुम्हाला सतावू शकत नाही. म्हणून विघ्नहर्ताची कृपा महत्त्वाची. पण त्यासाठी काय करायचं गणेश चतुर्थी येत आहे गणपती बाप्पाचं तुमच्या घरी आगमन होणार आहे.

आणि या दहा दिवसांमध्ये करायचा आहे फक्त एक उपाय. गणेश स्तोत्र कसं करायचं कधी करायचं किती वेळा करायचं आणि काय गणेश स्तोत्राचं नेमक महत्त्व काय चमत्कार हे गणेश स्तोत्र म्हंटल्याने आपल्या आयुष्यात काय चमत्कार घडतात.

हे स्तोत्र कस म्हणायच सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया अगदी थोडक्यात. जर तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हवा असेल तर नियमितपणे संकटनाशक गणेश स्तोत्र पठण करायला सांगितलं जात. हे स्तोत्र गणपतीला अत्यंत प्रिय आहे या स्तोत्राचं पठण केल्याने दुःख सगळी दूर होतात. बिघडलेली काम होऊ लागतात सगळी विघ्न दूर होतात.

जर तुम्ही रोज हे करू शकत नसाल तर कमीत कमी आता गणेश चतुर्थी येते. १९ सप्टेंबर पासून गणपती बाप्पाचा आगमन आपल्या घरी होणार आहे. आणि या दहा दिवसांमध्ये तरी तुम्ही हे स्तोत्र नक्की म्हणू शकता.

पण हे स्तोत्र कस म्हणायच गणपतीच हे स्तोत्र श्री गणेशाला केलेली सगळ्यात गोड विनवणी आहे. हे स्तोत्र नाराद मुनीनी रचलेला असून नारद पुराणातून घेण्यात आलाय. याचा मराठी अनुवाद श्रीधर स्वामीनी केलाय. या क्षेत्रात गणपतीची १२ नावे असून आणि स्तोत्राच्या शेवटी पठण करणाऱ्याला काय लाभ मिळणार आहेत, ते सुद्धा सांगण्यात आले. सगळ्यात आधी गणपतीची पूजा करून घ्या. आपली इच्छा सांगून संकल्प सोडा.

म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही स्तोत्र पठण करत आहात ते कारण सांगून किंवा ती इच्छा बोलून ती पूर्ण व्हावी अशी विनंती गणपती बाप्पा जवळ करा. आणि तामनात पाणी सोडा. पूर्वेकडे तोंड करून बसा आरामदायक स्थितीमध्ये बसा. त्याचबरोबर एक ग्लास पाणी घेऊन त्यात अगरबत्तीची विभूती पडेल अर्थात अगरबत्तीची राख पडेल अशा पद्धतीने अगरबत्ती लावा.

श्री गणपती स्तोत्र चा जप करा आणि स्तोत्र म्हणून झाल्यावर गणेशाची आरती करा. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न की हे स्तोत्र किती वेळा म्हणायच. ११ वेळा हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचे. ज्या दिवशी गणपती बाप्पा बसले त्या दिवसापासून सुरू करा आणि अनंत चतुर्दशी पर्यंत रोज ११ वेळा स्तोत्र म्हणा. त्यानंतर ते विभूती पडलेल पाणी थोडसं प्रसाद म्हणून तुम्ही घ्या आणि घरातल्यानाही द्या.

गणपती स्तोत्र पठण करण्याचे फायदे काय काय सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आर्थिक प्रश्न सुटेल. सुख समृद्धी आणि वैभवाची प्राप्ती होईल. हे स्त्रोत पठण केल्याने तुमचं मन अशांत असेल तर मनःशांती सुद्धा मिळते. आयुष्यातून तसंच मनातून वाईट गोष्टी निघून जातात. हे स्त्रोत वाचल्याने जीवन निरोगी आणि समृद्ध होत.

या स्तोत्रात सांगण्यात आले आहे की जो कोणी या स्तोत्राचे पठाण करतो त्याचे सर्व त्रास सर्व अडचणी नष्ट होतात. हे स्तोत्र वाचल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींवर मार्ग निघतो. म्हणूनच याला संकटनाशनाम स्तोत्र असाही म्हणतात. आता लक्षात घ्या तुम्ही गणपतीत ही सेवा सुरू करत आहात. म्हणून तुम्ही हा जप अकरा वेळा म्हणायचा आहे.

पण जर तुम्ही गणेश चतुर्थी पासून सुरु करून सलग सहा महिने तुम्ही मांडणार आहात तर तुम्ही एकदा म्हणालात तरी चालू शकते. पण मग न चुकता नियमितपणे एकदा रोज म्हणायचे आहे. आणि सहा महिने म्हणत असतानाच फक्त स्त्रियांनी अडचणीचे चार दिवस सोडून द्यायचे आहेत.

इतर वेळी मात्र रोज हे स्तोत्र म्हणायचे आहे. आता संकटनाशक स्तोत्र म्हणजे नक्की मी कोणत्या स्तोत्राबददल म्हणत आहे बऱ्याच जणांचा गोंधळ होतो अथर्वशीर्ष कोणते आहे. गणेश स्तोत्र कोणते तर अथर्वशीर्ष वेगळं आणि गणेश स्तोत्र वेगळ गणेश स्तोत्र याच्याबद्दल ही माहीती आहे. त्या स्तोत्राच्या दोन ओळी मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल.

“प्रणय शिरसा देव गौरीपुत्र विनायकम भक्तावास स्मरेनित्यम आयुषकामार्थ सिद्धये” विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे स्तोत्राच पठण केल जात संकटांचा नाश होण्यासाठी या स्तोत्राच पठण केल जात. गणेश चतुर्थी पासून हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा आणि अनुभव घेऊन पहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *