३ मार्च २०२३ आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची करा पूजा ‘या’ फायदेशिर गोष्टी घडतीलच.!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रानो.

३ मार्चला आहे आमलकी एकादशी या एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. आणखीही बऱ्याच गोष्टी आवळ्याच्या संबंधित केल्या जातात. पण त्या केल्यामुळे आपल्या आयुष्यात काय बदल होतो.या गोष्टी आपल्या आयुष्यात घडून येतात. चला जाणून घेऊयात.

मित्रांनो आमलकी एकादशीला म्हणतात रंगभरणी एकादशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर ज्या दिवशी सगळ्यात प्रथम काशीला आले तो हा दिवस म्हणजे रंग भरणी एकादशी अर्थात आमलकी एकादशीचा या दिवशी संपूर्ण काशी नगरी गुलाल होऊन जाते. विश्वनाथ मंदिरामध्ये पूजा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन केल जात.

पण याच एकादशीचा मुख्य वैशिष्ट्य आहे आवळ्याच्या झाडाचे पूजन करणे. पौराणिक कथेनुसार भगवान श्री हरी विष्णु आवळ्याच्या झाडाची निर्मिती केली. त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करायला सांगितले जाते. आवळ्याच्या झाडा जवळचा परिसर स्वच्छ करून घ्यावा. या झाडाखाली कलशाची स्थापना करावी. भगवान विष्णूंचा नामस्मरण करून पूजन करावे.

कलशाला धूप दीप नैवेद्य दाखवा. तसेच आवळ्याचे सेवन सुद्धा या दिवशी नक्की करावा. म्हणजे तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल किंवा नसाल पण या दिवशी आवळ्याचा सेवन करणे आवश्यक आहे. आवळा हे श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे.आवळ्याच्या झाडाचे पूजनामुळे गोदानाचा पुण्य मिळत.

तसेच आवळ्याचे गुणधर्म आणि उपयोग आपल्याला माहीतच आहे मधुमेह, पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यांसाठी गुणकारी आणि संसर्गापासून संरक्षण करणे. ते कितीतरी उपयोग आवळ्याचे आहेत. म्हणूनच आवळ्याच्या झाडाला तितकं महत्व आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी आपण आवळ्याचे झाडाचे पूजन केले तर सुख समृद्धी, धन धन्य सगळंच भरभरून येत.

आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होते. श्रीहरी विष्णूंची कृपा व्हावी म्हणून आमलकी एकादशीला तुम्ही आणखी काही करू शकता. जस भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळी फुल प्रिय आहेत म्हणूनच आमलकी एकादशीला २१ फुल अर्पण करा. श्रीहरींची कृपा तुमच्यावर सदैव राहील. या एकादशीच्या दिवशी एक नारळ पिवळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळा आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ स्वच्छ ठिकाणी ठेवा.

त्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहिल. जर तुम्हाला नोकरी व्यवसायात काही अडचणी येत असतील तर आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला एक ग्लास पाणी अर्पण करा. त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालताना सुती धागा सुद्धा गुंडाळा. त्यामुळे तुमच्या जोडीदाराची इच्छा पूर्ण होईल. शरद ऋतू संपून वसंत ऋतुचा आरंभ होळीपासून होतो. ऋतुचक्र आणि निसर्गचक्र या काळात बदलते.

शांत वातावरण दहातेकडे जाणार असते. या वातावरणीय बदलाची आपल्या शरीराला सवय व्हावी यासाठी आपल्याकडे परंपरा आणि पूजन यांच महत्त्व आहे. ते समजून घेऊन मग करायला हवे. मग मंडळी या एकादशीला जरी तुम्ही उपवास करणार नसला तरी आवळाचे सेवन मात्र नक्की करा. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या आरोग्यावरही सुधारणा होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *