वर्ष २०२३ तुमच्या राशीनुसार करा हा उपाय वर्षभर होईल फायदा. अचानक चमकुन उठेल या राशींचे भाग्य..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

२०२३ हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समाधानाचं जावो असे तुम्हाला जर वाटत असेल कारण या लेका मध्ये तुम्हाला ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या तुमच्या राशीनुसार उपाय सांगतो आहोत. ते उपाय जर तुम्ही केलेत तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाणारी यात काय शंकाच नाही. चला तर मग सुरुवात करूया.

ज्योतिष शास्त्र नुसार नवीन वर्षासाठी काही उपाय सांगितले जात आहेत. नवीन वर्षात येणाऱ्या अडचणी, समस्यावर हे उपाय उपयुक्त ठरू शकतात. मेष ते मीन राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल नवीन वर्ष २०२३ हे सुद्धा आपण जाणून घेऊया.

१) मेष रास- मेष राशीचे स्वामी आहे मंगळ. मंगळ उत्साह आणि पराक्रमाचा कारक आहे. या राशींच्या लोकांचे करिअर चांगला असू शकेल. नवीन यश त्यांना मिळेल. नवीन क्षेत्रात गुंतवणूक इथून लाभाचे योग सुद्धा आहेत. काही कौटुंबिक समस्या असू शकतात. मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात संमिश्र राहील.

मेष राशीच्या व्यक्तीने दर मंगळवारी हनुमानसाठी उपवास करावा. जर तुम्ही उपवास करू शकत नसाल. हनुमान चालीसा चा पाठ करा किंवा बजरंग बाणाचा पठण करा किंवा मारुती स्तोत्र म्हणा. तर मंगळवारी तुम्हाला यातलं कोणतेही स्तोत्र म्हणायचं आहे. वर्षभर तुम्ही हे केलं तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाणार यात काय शंका नाही.

२) वृषभ रास- वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांसाठी २०२३ हे वर्ष करिअरच्या दृष्टीने चांगले असणार आहे. मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगल्या नफ्याची तुम्ही अपेक्षा करू शकता.

कौटुंबिक दृष्टीतून येणाऱ्या वर्ष थोडं प्रतिकूल असू शकेल. वर्षाच्या मध्यात आरोग्य विषयी समस्या सुद्धा येऊ शकतात. एप्रिल नंतर विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. शुक्रवारी पांढरा रंगाची मिठाई किंवा तांदूळ खीर तुम्ही अर्पण करावी. हा उपाय तुमच्यासाठी चांगला ठरेल.

३) मिथुन रास- मिथुन राशीचा स्वामी आहे बुध. काशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळण्याची अपेक्षा आहे. जून ते नोव्हेंबर मध्ये तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. नवीन वर्ष व्यवसायिकांसाठी चांगले असेल. कौटुंबिक पातळीवर वर्ष चांगले जाईल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष शुभ फळ देणारे असेल. मिथुन राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाची उपासना करणे लाभदायी ठरेल.

४) कर्क रास- कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र. या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष चांगले जाणारे आहे. व्यवसायिक दृष्ट्या ही फायदा होण्याची शक्यता आहे. घाई गडबडीत निर्णय मात्र घेऊ नका. नवीन वर्षात कौटुंबिक जीवन प्रभावित होऊ शकत. आरोग्याच्या संबंधित समस्या ही येऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्यासाठी उपाय आहे तुम्ही महादेवाचा जल अभिषेक करावा. मंगळवारी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र पाठन करावं.

५) सिंह रास- सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. हे वर्ष करायचे दृष्टीने चांगले असेल. व्यवसायिक नवीन योजनांचा लाभ होईल. नोकरदरांना नवीन संधी मिळतील. यश सुद्धा मिळेल. अचानक आर्थिक लाभ ही होतील. काही अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. जोडीदारासोबत त्यासाठी सुसंवाद राखावा.

रोज तुम्हाला सूर्यासाठी आर्घ पण करणे फायदेशीर ठरेल. रोज जमत नसेल तर रविवारी सूर्यदेवाला, सूर्यनारायणाला पाणी अर्पण करा. हनुमान चालीसा किंवा मारुती स्त्रोतांचा पठण करण ही तुमच्यासाठी सर्वात फायद्याचे ठरेल. सर्वात सोपा तुमच्या वडिलांची सेवा करा. त्याने तुम्हाला नक्कीच लाभ होईल.

६) कन्या रास- कन्या राशीचे स्वामी आहे बुध. करिअरच्यादृष्टीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कन्या राशीला चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायासाठी चांगली सुरुवात होऊ शकते. नोकरदरांची इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते.

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे वर्ष चांगलं ठरू शकत.२०२३ वर्ष आरोग्य च्या दृष्टीने चांगले जाईल. स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगलं ठरू शकेल. गणपती बाप्पाचे पूजन मात्र करावे त्यांना दुर्वा अर्पण करावे हे तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.

७) तुळ रास- तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र. कार्यक्षेत्रात काही चांगलं काही नवीन करणे अपेक्षित आहे. नवीन नोकरीच्या शोधत असणाऱ्या व्यक्तींसाठी तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रॉपर्टी आणि शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष फायदेशीर ठरणार आहे. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना तोटा लागू शकतो. कौटुंबिक दृष्टीने हे वर्ष संमिश्र जाईल. विद्यार्थ्यांना वर्ष सकारात्मक ठरेल.माता दुर्गेची तुम्ही पूजा करावी तसं माता लक्ष्मी आणि माता संतोषी यांची सुद्धा पूजा करावी. रिश्ता शुक्रवारी विधीवथ पूजा करण फायदेशीर ठरेल.

८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. नोकरी किंवा व्यवसायात कोणताही बदल काळजीपूर्वक करावा लागेल. व्यावसायिक स्पर्धेत लाभ होईल. गुंतवणुकीचा फायदा मिळणार आहे. रियली इस्टेटमध्ये वाढ होण्याचे शक्यता आहे. कौटुंबिक बाबींमध्ये अडचणी मात्र येऊ शकतात. विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. परंतु कठोर परिश्रम करावे लागतील. हनुमानाची पूजा करावी विशेषतः मंगळवारी हनुमान चालीसा किंवा मारुती स्त्रोताचं पठन करावं.

९) धनु रास- धनु राशीचा स्वामी आहे गुरु. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाची ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल पर्यंत मोठं काम पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायातही यश मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले असणार आहे. कुटुंबात शुभकार्याची चिन्हे आहेत. आरोग्य हे चांगले राहील. शैक्षणिक लाभदायी ठरेल. श्रीहरी विष्णूंचे पूजा करा किंवा रंगाची त्यांना फुल अर्पण करा.

१०) मकर रास- मकर राशि का स्वामी आहे शनि. नवीन वर्ष आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहेत. गुंतवणुकी सुद्धा चांगला परतावा मिळू शकेल. करिअरमध्ये नवीन मिळू शकेल. हे नवीन वर्ष व्यवसायासाठी लाभदायी ठरणार आहे. विद्यार्थ्यांना यशासाठी येत्या वर्षात कठोर परिश्रम करावे लागतील. शनिवारी उपवास करा शक्य नसेल राम रक्षा स्तोत्र पटन करा. हनुमानाचे दर्शन सुद्धा शनिवारी घ्यावा.

११) कुंभ रास- कुंभ राशीचा स्वामी सुद्धा शनी आहे. नवीन वर्षात कुंभ राशीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. व्यापारात प्रगती होईल. नोकरदारांना पदोन्नतीची शक्यता आहे. कौटुंबिक मालमत्तेतूनही आर्थिक लाभ होऊ शकतो. हे वर्ष कौटुंबिक बाबी तुम्ही चांगले जाणार आहे. सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल. आरोग्य संबंधित समस्या येऊ शकतात. विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. शनिवारी आणि मंगळवारी सुंदरकांडाच पटन करा.

१२) मीन रास- मीन राशीचा स्वामी गुरु आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नोकरी आणि व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. कोणतीही गुंतवणूक काळजीपूर्वक करा. अन्यथा नुकसान सहन करावा लागू शकतो. कुटुंबात काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी जोडीदारासोबत सुसंवाद ठेवा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येणारे वर्ष चांगला निकाल देणार आहे. दर गुरुवारी रामरक्षा् स्त्रोत्राचं पठन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *