१५ जानेवारी २०२३, ५ राशींना मकर संक्रात फलदायी. या राशींचे नवीन वर्ष सुरू होणार जोऱ्यात…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

१५ जानेवारीला आहे मकर संक्रांत. ग्रहमानअशा पद्धतीचा तयार होत आहे, की पाच राशींसाठी ही मकर संक्रांत लाभदायी फलदायी आणि शुभ ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात चला जाणून घेऊयात.

१) वृषभ रास- वृषभ राशीत मंगळ ग्रह मार्गी होत आहे. मंगळाच्या मार्गी चलनाचा या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल ,या काळात इच्छा पूर्ण होतील मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची सुद्धा तुमची शक्यता आहे .व्यवसायात कोणतीही महत्त्वाची योजना राबवण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे .कुटुंबाचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि आणि वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील .

२) सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्तींना मंगळाचं मार्गी चलन सकारात्मक ठरू शकेल, कामाच्या ठिकाणी सुरू असलेले वाद मिटतील .आर्थिक दृष्टिकोनातून आगामी काळ सकारात्मक परिणाम देणार असेल नवीन ऑर्डर किंवा टेंडर साठी अर्ज करायचा असेल तर वेळ चांगली आहे. प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाने ध्येय आणि उद्दिष्ट तुम्ही साध्य करू शकाल ,कौशल्य दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल नोकरदारांना सुद्धा चांगली फळ मिळतील.

३) वृश्चिक रास- मकर संक्रांतीचा लाभ वृश्चिक राशीला सुद्धा होणारे वृश्चिक राशीच्या व्यक्ती या काळात धार्मिक तसेच सामाजिक कार्यामध्ये सहभागी होतील. त्यांच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी त्या चांगल्या योजना सुद्धा बनवतील. नोकरीत बदलाची योजना आखत असतील, तर त्यातही त्यांना यश मिळेल आर्थिक दृष्ट्या सकारात्मक परिणाम मिळतील. करिअरमध्ये प्रगतीसाठी योजनांचा नव्याने आढावा घेणे उपयुक्त ठरू शकेल .

४) धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींना सुद्धा हा काय फायदेशीर ठरेल गुंतवणुकीच्या दृष्टीने खास करून जास्त फायदेशीर ठरेल. कोणताही कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही अगदी उत्साही असाल तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात ,गुंतवणुकीचे समाधानकारक परिणामही तुम्हाला मिळतील .काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा .

५) मीन रास- मीन राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मार्गी चलन अनुकूल ठरेल व्यक्तिमत्वात बदल होईल .लोक तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने खूप खुश होतील. आत्मविश्वासाने तुम्ही काम करा आणि इतकाच नाही, तर काम पूर्ण करण्यातही यशस्वी व्हाल करिअरमध्ये चांगले यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ तुम्ही घालवाल.

तुम्ही घेतलेले स्मार्ट निर्णय सकारात्मक ठरू शकतील. तर या होत्या त्या ५ राशी ज्यांची मकर संक्रांत तिळगुळ खाण्या आधीच गोड होणार आहे. मग तुमची रास यामध्ये आहे की नाही? कमेंट करून सांगायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *