सोमवारी जर तुम्ही उपवास करत असाल तर या ५ चुका करणे टाळा. नाहीतर संपूर्ण घर उध्वस्त होईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्मात सोमवार हा दिवस महादेव यांना समर्पित केला आहे. सोमवार हा दिवस खूप शुभ मानला जातो. सोमवारी महादेवाचे भक्त उपवास करतात. आणि त्यांची मनोभावी पूजाही करतात. मित्रांनो शास्त्रामध्ये सगळ्या देवदेवतांचे विशेष असे महत्त्व आहे. जसे की सोमवारी महादेवाचा मान आहे. महादेवाला भोले भंडारी देखील म्हटले आहे.

म्हणून महादेव त्यांच्या भक्तांवर जास्ती वेळ नाराज नाही राहत. पण तरी आपल्याकडून काही झालेल्या चुका त्यांच्या क्रोधाला आमंत्रित करू शकते. सोमवारी सर्वप्रथम आपण काय करतो. सकाळी उठून आंघोळ करून महादेवाची पूजा करतो. आणि त्यांचा उपवास करतो. त्यांना विनंती करतो की आपल्या वरचे संकट लवकर टळूदे.

सोमवारी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात. आणि आपल्या सगळ्या इडा पिडा दूर करतात. सोमवारच्या दिवशी शिवभक्त उपवास करतात. आणि दिवसभरातून एकदा किंवा दोनदा फराळ करतात. पण एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की सोमवारच्या दिवशी मीठ कधीही खाऊ नका. आणि फराळामध्ये टाकू सुद्धा नका.

समजा तुम्ही एक दिवसाचा उपवास केला आहे आणि त्याच रात्री तुम्ही उपवास सोडत असाल तरी त्या जेवनामध्ये मीठ घालू नका. जर तुम्हाला चवीसाठी मीठ खायच असेल तर फक्त चिमुटभर शेंदे मीठ घेऊ शकता. पण चुकूनही उपवासाच्या दिवशी मिठाला हात लावू नका.

दुसरी गोष्ट जी तुम्हाला उपवासाच्या दिवशी लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला पूर्ण दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे लागेल. स्त्री असो किंवा पुरुष ज्यांनी कोणी सोमवारचा उपवास पकडला आहे यांचे पालन त्यांनी केलेच पाहिजे.

तिसरी गोष्ट ही की उपवासाच्या दिवशी कोणत्याच वृद्ध व्यक्तीचा किंवा आपल्या वडीलधाऱ्यांचा अपमान केला नाही पाहिजे. घरात कोणीही तुमच्यापेक्षा वयाने मोठे असेल तर त्यांना सोमवारच्या दिवशी दुखावू नका. जर तुम्ही उपवासाच्या दिवशी घरातील मोठ्यांना दुखावलं असेल त्यांचा अपमान केला असेल तर महादेव तुमचा उपवास ग्रहण करत नाही.

ते तुमच्यावर कुपू शकतात. तुम्हाला कोणतेच फळ मिळणार नाही. त्याची शिक्षा तुम्हाला नक्की भोगावे लागेल. म्हणून सोमवारच्या दिवशी ही गोष्ट लक्षात ठेवा. सोमवारच्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही कोणतेच भांडणे केले नाही पाहिजे. आणि कोणत्याच भांडणात भाग घेतला नाही पाहिजे.

उपवास ही खूप पवित्र गोष्ट आहे आणि उपवासाच्या दिवशी भांडणे करणे टाळा. या दिवशी कोणाचीच निंदा, चुगली आणि खोटे बोलू नका. जर तुम्ही असं करत असाल तर महादेव तुमच्यावर नाराज होऊ शकतात. मित्रांनो उपवासाच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी महादेवाच्या समोर बसून त्यांची आरती करा.

आणि जर सकाळी आरती करणे शक्य नसेल पण संध्याकाळी तुम्ही महादेवाची आरती केलीच पाहिजे. या सोबतच धूप अगरबत्ती दाखवा. आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा. शक्य असेल तर त्यांना कच्च्या दुधाचा अभिषेक करा. तुम्ही मधाने सुद्धा अभिषेक करू शकता. असे केल्याने महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि घरात त्यांचा आशीर्वाद कायम राहील.

सोमवारी उपवास केला असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन एक नारळ फोडू शकता. मंदिरात गेल्यावर महादेवाची आरती करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की महादेवाची आरती करताना कधीच टाळी वाजवू नका. शास्त्रात सांगितले आहे की शिवजींच्या आरतीला टाळी वाजवणे बंधनकारक आहे.

महादेवाच्या आरतीला टाळी वाजवणे का बंधनकारक आहे. कारण यावेळी शिवजी ध्यान अवस्थेत असतात. आणि पौराणिक कथेमध्ये तुम्ही ऐकलं असेलच महादेवाचे ध्यान भंग करणे म्हणजे खूप मोठे पाप आहे. ध्यानभंग होताच महादेव रुद्र अवतार धारण करता. आणि कठोर शिक्षाही देऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *