सप्ताहातील बुधवारी करा हा बाप्पाचा एकच उपाय आणि करा सर्व अडचणींवर मात…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो हल्ली परिस्थिती खूप बिकट होत आहे, काहींच्या घरात पैसे टिकून राहत नाहीत तर काहींच्या घरात पैसे कमावण्यासाठी मार्ग मिळत नाही. शिवाय कधी कधी कमावलेले पैसे सुद्धा विनाकारण आणि भरभर खर्च होऊन जातात, ज्याचा हिशोब सुद्धा लागत नाही.

पण मित्रहो या बाबतीत काळजी करण्याचे काहीच कारण नाही, आज आम्ही या लेखातून असे काही उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या घरी समाधान, धनसंपत्ती कायम राहील व नेहमी आनंदी वातावरण तयार होत राहील.

मित्रहो हे उपाय तुम्ही बुधुवारी करू शकता, बुधवार हा सप्ताहातील श्रीगणेशाचा वार म्हणला जातो. हिंदु धर्मात सर्वात आधी पूजेचा, आद्य पूजेचा मान श्रीगणेशाचा असतो. बाप्पाला सर्व अडचणींवर मात करणारे मंगलमूर्ती म्हणले जाते.

मित्रहो जर आपण बुधवारी श्री गणेशाचे मनोभावे पूजन केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसेच जर आपल्या कुंडलीत बुध ग्रह असेल तर बुधवारी पूजन केल्याने तो शांत होतो.

तसेच जर मंडळी आपल्या घरात नेहमीच नकारात्मकता पसरलेली असेल आणि त्याचा खुप त्रास होत असेल तर तुम्ही बुधवारी बाप्पांची पांढऱ्या रंगाची मूर्ती आणून तिची स्थापना करावी. असे केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते, व घरात सकारात्मकता पसरते.

तसेच आपली अडकून पडलेली कामे देखील पूर्ण होतात. मित्रहो जर आपण मिळवलेले पैसे टिकत नसतील, किंवा हवे तितके उत्पन्न मिळत नसेल तर बाप्पांची मनोभावे पूजा करून त्यांना गूळ व तुपाचा नैवेद्य दाखवावा.

हा नैवेद्य दुपारी गायीला द्यावा, तिला खाऊ घालावे. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ तर होईलच शिवाय समाधान सुद्धा मिळेल. मित्रहो तिसरा उपाय म्हणजे श्री गणेशाची दुर्वांची मूर्ती बनवून आपल्या देवघरात स्थापित करावी.

त्यामुळे घरातील वादविवाद, तंटे दूर होऊन घरात शांती राहते. जर तुमच्या घरी नेहमी वाद, भांडणं होऊन अशांती पसरत असेल तर हा उपाय योग्य आहे त्यासाठी. या दुर्वांची गणेशाची रोज पूजा करावी, त्यामुळे घरात समाधान, शांती राहील.

तसेच चौथा उपाय असा की बुधवारी एखाद्या हत्तीला हिरवा चारा घालावा, आणि मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना आपल्या अडचणी सांगाव्या. त्या निवारण होण्यासाठी प्रार्थना करावी. जर तुम्हाला हत्ती मिळत नसेल तर तुम्ही हा चारा गायीला देखील देऊ शकता.

त्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या जीवनातील अडचणी कमी झाल्या आहेत. तसेच पाचवा उपाय म्हणजे बुधवारी सकाळी स्नान करून एका कांस्यच्या ताटात चंदनाच्या लेपाने ओं गणपतेय नमः असे लिहावे व त्यावर पाच बुंदीचे लाडू ठेवावेत.

व ते ताट गणपती मंदिरात दान करावे. त्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते. तसेच सहावा उपाय असा आहे की बुधवारी सकाळी स्नान आटोपून २१ गुळ्याच्या लहान पेढ्या अर्पण कराव्या व त्यावर दुर्वा ठेवाव्या. तसेच गायीला गूळ आणि तूप खायला द्यावे.

त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील. मित्रहो सातवा उपाय असा आहे की बुधवारी सकाळी स्नान करून जर तुम्ही गूळ व शुद्ध तुपाचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवल्यास धनासबंधी असणाऱ्या अडचणी दूर होतात.

शास्त्रांमध्ये सांगितल्या प्रमाणे बुधवारी सकाळी स्नान करून गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा, व गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे. तसेच नववा उपाय म्हणजे बुधुवारी सकाळी मंदिरात जाऊन आपल्याला शक्य तितक्या वस्तूंचे दान करावे. त्यामुळे आपल्या पुण्यकर्मात वाढ होते. व गणपती प्रसन्न होतात.

मित्रहो हे उपाय नक्की करा, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन सुखी जीवन प्राप्त होईल. आमचा आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *