गरुड पुराण..! मृत्यूनंतर देखील या ५ गोष्टी येतात सोबत, जाणून घ्या तुम्हीही..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो मनुष्याचा जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी अटळ आहेत, त्या कधीही होऊ शकतात. जन्म मृत्यूच्या जाळ्यात अडकलेला मनुष्य आपल्या वाटणीचे आयुष्य जगत असतो. जन्माला येताना सुद्धा आपण काही घेऊन येत नाही आणि आपला जेव्हा मृत्यू होतो.

तेव्हाही आपण रिकामे जातो असे अनेकांना वाटते मात्र मित्रहो जेव्हा मनुष्याचा मृत्य होतो तेव्हा त्याच्यासोबत जीवनातील ५ गोष्टी त्याच्या सोबत येतात. आज या लेखातून तुम्हाला त्या ५ गोष्टी कोणत्या ते कळेल.

मित्रहो सर्वात पहिली गोष्ट असते ती कामना, गरुड पुराणानुसार कामना ही पुनर्जन्मासाठी आत्म्याला शरीर धारण करण्यास मदत करते. कामना म्हणजेच इच्छा ही नेहमी मनुष्याच्या सोबत असते.

मृत्यूच्या वेळी मनुष्य जी कामना करतो त्याचप्रमाणे त्याला पुढील जन्म मिळत असतो. जी इच्छा मनुष्य मृत्यूच्या वेळी आपल्या मनात आणतो ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला पुढील जन्म मिळत असतो.

तसेच दुसरी गोष्ट आपल्या सोबत येते ती म्हणजे वासना, वासना ही कामनाचाच प्रकार आहे. वासना ही देखील सदैव सोबत असते, तिचा कधीच अंत होत नसतो. वासना म्हणजे सांसारिक सुखाची इच्छा करणे होय, मृत्यूच्या अंतशयावर असताना सुद्धा वासनेपासून मनुष्याची मुक्ती होणे कठीण असते.

वासना म्हणजे आपण समजतो की शारीरिक सुख…..पण असे नसून वासना म्हणजे आपल्या लोकांवर असलेलं प्रेम. मृत्यूसमयी सुद्धा माणूस आपला जोडीदार, मुले बाळे, आई वडील यांचा विचार करत असतो.

तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्याचे कर्म होय, हे कर्म मृत्युनंतर सुद्धा माणसाच्या सोबत जाते.त्याने त्याच्या आयुष्यात केलेली चांगली व वाईट कर्मे नेहमी त्याच्या सोबत राहतात. जेव्हा मनुष्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याची आत्मा ही त्याच्या शरीराद्वारे केलेल्या कर्माला एकत्रित करत असते.

हे एकत्रित केलेले कर्म त्या आत्म्याला परलोकात सुख किंवा दुःख मिळवून देत असतात.भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपले कर्म हे पुढील सात जन्म आपला पाठलाग करत असतात.

पुढील काही आपल्या सोबत येत असेल तर ते असते कर्ज, ते मग आपण कोणाकडून घेतलेले असो किंवा कोणाला दिलेले असो. आपण जर कोणाकडून कर्ज घेतलेले असेल तर ते मृत्यूपूर्वी त्याला परत करावे.

अन्यथा जेव्हा आपण मृत्यू होऊन परलोकात जातो आणि तिथे ज्याच्याकडून कर्ज घेतले आहे त्याची आत्मा सुद्धा आली तर ती तिथेही त्याच्या कर्जाची रक्कम मागते. त्यावेळी यमदूत आपणाला असह्य वेदना देतात.

मात्र तरी सुद्धा ते कर्ज तिथे फिटत नाही आणि पुढील जन्मात देखील ते कर्ज आपल्या डोक्यावर तसेच राहते. त्यामुळे जर आपणाला पुढील जन्मात पीडा नको असेल तर मृत्यूपूर्वी आपण ते कर्ज फेडून टाकावे.

तसेच गरुड पुराणानुसार मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सोबत जाणारी पाचवी गोष्ट म्हणजे त्याने केलेले पुण्य. त्याच्या कर्मातून पुण्याची मोजणी होत असते. आपण जे पुण्य करतो ते आपल्या पुढील जन्मात देखील आपणाला सुखाचे दिवस देते.

परलोकात सुद्धा आपली पिडे पासून सुटका होते. आपले पुण्य हे पुढील सात जन्म चांगला परिणाम देत असते. म्हणून मनुष्याने नेहमी पुण्य कर्म करत राहावे.

मित्रहो आपला मृत्यू झाल्यावर या ५ गोष्टी आपल्या सोबत येत असतात, कामना, वासना यांच्या पासून मृत्यूवेळी जमेल तितके दूर राहावे कारण यांचा परिणाम पुढील जीवनावर होत असतो.

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *