ऑक्टोबर २०२१ मध्ये सर्वात जास्त भाग्यशाली ठरणार या लकी राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मनुष्य जीवन हे गतिशील असून अत्यंत कठीण आणि संघर्षमय मानले जाते. जीवन जगताना मनुष्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो ज्योतिष शास्त्रानुसार हा सर्व बदलत्या ग्रहदशा चा परिणाम असतो. जेव्हा ग्रह नक्षत्र प्रतिकूल असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचा संघर्ष निर्माण होतो अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागतात.

पण हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक पडते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही. ऑक्टोबर २०२१ पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून ऑक्टोबर महिन्यापासून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

ऑक्टोबर मध्ये होत असलेल्या ग्रहांच्या परिवर्तनाचा अत्यन्त सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडण्याचे संकेत आहेत. आता येथून येणार पुढचा काळ आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला शुक्राचे वृश्चिक राशीत होणारे राशांतर आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल व लाभदायी ठरणार आहे.

यावर्षी एकूण चार ग्रह मार्गी होणार आहे सुरुवातीला प्लॉटो मार्गी होणार असून त्यापाठोपाठ शनी बुध आणि गुरू मार्गी होणार आहे. गुरू आणि शनीचा मार्गी होण्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येईल. एकाच महिन्यात चार ग्रहांचे मार्गी होणे ज्योतिष शास्त्रानुसार विशेष महत्वपूर्ण मानले जात आहे.

ग्रहांची बदलती स्तिथी काही राशींसाठी नकारात्मक ठरणार असली तरी काही राशीवर याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम दिसून येईल. ऑक्टोबर मध्ये बनत असलेली ग्रहांची स्तिथी या लकी राशीसाठी लाभदायक ठरणार आहे आता जीवनातील दुःखाचे दिवस संपायला वेळ लागणार नाही.

आपल्या जीवनात सुरू असलेले दुःखाचे व दारिद्र्याचे दिवस संपणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याचे योग आहेत. गुरुवारी शनीचे मार्गी होणे आपल्या जीवनात अनेक आश्रयजनक घडामोडी घडवून आणू शकते. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राला नवीन दिशा प्राप्त होणार आहे. उद्योगाच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार असून व्यपारातून आर्थिक आवक वाढणार आहे.

या काळात आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. प्रगतीच्या नवीन दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रम यामध्ये वाढ होणार आहे. आपल्या मनावर असलेला मानसिक ताणतणाव कमी होणार आहे. समाजात मानसन्मान आणि यश किर्तीत वाढ होणार आहे. एका सकारात्मक आणि सुंदर दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे.

मेष राशी- ऑक्टोबर मध्ये बनत असलेली ग्रहांची स्तिथी मेष राशीसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रत्येक क्षेत्रात यशाचे मार्ग मोकळे होणार असून नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. या काळात केलेली छोटीशी सुरुवात पुढे चालून खूप मोठे रूप घेऊ शकते आता जीवनातील अति दुःखाचे दिवस संपणार असून सुखाचे सुंदर क्षण आपल्या वाट्याला येणार आहे.

व्यवहारिक जीवनात पती पत्नी मधील निर्माण झालेल्या समस्या दूर होणार असून प्रेमात वाढ दिसून येईल. प्रेम प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार असून आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो. करीयरविषयी अनुकूल काळाची सुर्यवात होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे मात्र या काळात कोणाच्याही गोड बोलण्याला बळी पडू नका.

स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणे आवश्यक आहे. उद्योग व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेणे आपल्या हिताचे ठरेल. या काळात रागावर नियंत्रण ठेवून डोके शांत ठेवून कामे करण्याची आवश्यकता आहे. मन शांत ठेवून कामे केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.

वृषभ राशी- वृषभ राशींच्या जीवनात सुखाची सुंदर सकाळ होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. या काळात भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. ग्रहांची अनुकूलता आपले मार्ग मोकळे करून देणार आहे. यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील पण मनापासून मेहेनत करणे अत्यन्त आवश्यक आहे.

मनापासून मेहनत केलेले कोणतेही काम यशस्वी रित्या पूर्ण होणार आहे जेवढे जास्त तुम्ही मेहनत करणार आहात तेवढा मोठा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. याकाळात अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात हातात पैसा खेळता राहील.

कौटुंबिक जीवनासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे परिवारातील लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करणार आहात. या काळात प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल.

कर्क राशी- कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये दुःखाचा अंधकार दूर होणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. भौतिक सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासाचा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

तसेच आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे प्रेम जीवनासाठी हा कार्ड विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग-व्यापार प्रगतिपथावर राहील.

सिंह राशी- सिंह राशी वर ग्रहांची विशेष कृपा भर असणार आहे ऑक्टोबर महिन्यापासून आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडून येणार आहेत. पारिवारिक सुख लाभणार असून व्यवसायातून अनेक लाभ प्राप्त होणार आहे.

भौतिक सुविधेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल आपली जिद्द आणि चिकाटी आता फळाला येणार आहे. करियर मध्ये मनापासून यश प्राप्त होणार आहे व कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. नव्या योजना लाभदायक ठरणार आहे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

तूळ राशी- तूळ राशीसाठी ऑक्टोंबर महिना लाभदायक ठरणार आहे कौटुंबिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. व्यवहारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असलेले वाद आता मिळणार आहेत भाग्याची साथ आणि ग्रहांची अनुकूलता असल्यामुळे आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.

या काळामध्ये आपल्या महत्वकांशा मध्ये वाढ दिसून येईल. उद्योग व्यापार आणि करिअरमध्ये नवीन योजना राबविणार आहात नवीन दमाने नव्या कामाची सुरुवात होणार असून आपल्या उत्साहात अधिकच वाढ होणार आहे प्रगतीचे नवीन क्षेत्र आपल्यासाठी उपलब्ध होतील. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे.

तसेच प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे मागील काळात बिघडलेली कामे या काळामध्ये पूर्ण होणार आहे. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होतील हा काळ आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार असल्यामुळे या काळात वाईट कामापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरेल.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी हा महिना लाभदायक ठरणार आहे तसेच ग्रह नक्षत्र आपल्यासाठी विशेष उपयोगी व लाभदायक ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील व कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहे. यश प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असून प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होणार आहे.

मागील काळात आपण केलेले कष्ट आता फळाला येतील त्यासोबतच योजलेल्या योजना लाभदायक ठरणार आहे. पारिवारिक सुखात वाढ होणार असून कुटुंबात वैभवाचे दिवस येणार आहेत. उद्योग व्यापार आणि व्यवसायातून कार्यक्षेत्रामध्ये वाढ होणार आहे.

हा काळ चांगला असल्यामुळे या काळामध्ये डोके शांत घेऊन कामे करणे आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवून गोडीगुलाबीने कामे करून घेणे आवश्यक आहे त्यासोबतच तुमचा रागावर नियंत्रण ठेवणे सुद्धा आवश्यक आहे.

मकर राशी- मकर राशीसाठी हा महिना शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत प्रेम जीवनात अनुकूल घडामोडी घडून येतील. या काळात प्रेम प्राप्तीचे योग बनत आहे उद्योग-व्यवसाय प्रगतिपथावर राहणार असून करिअरमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आर्थिक प्राप्तीचा मार्ग मोकळे होणार आहे आपल्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करून घेणे आवश्यक आहेत सांसारिक सुख उत्तम लाभणार आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो गुंतवणूक करताना मोठ्या व्यक्तीचा व त्यातील यशस्वी व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मिन राशी- मीन राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. या महिन्यात आपल्या कार्यक्षमतेत वाढ दिसून येईल उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आपली आर्थिक आवक समाधानकारक असणार आहेत.

कौटुंबिक जीवनात चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार असून संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. बेरोजगार तरुणांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *