श्री गणेश चतुर्थी २०२२ चुकूनही घरी आणू नका या पाच गणेश मूर्ती घर बरबाद होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

३१ ऑगस्ट २०२२ बुधवारचा दिवस आणि या दिवशी श्री गणेश चतुर्थी आलेली आहे. दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीस आपण श्री गणेश चतुर्थीचा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव साजरा करतो. अनेक लोक यावेळी गणपती बाप्पांना आपल्या घरात विराजमान करतात. बाजारातून गणेश मूर्ती खरेदी केल्या जातात आणि त्यांची विधिवत आपल्या घरात स्थापना करून पूजा केली जाते.

काही लोक दीड दिवसांचा काही ५ तर काहीजण दहा दिवसांचा गणपती बसवतात आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपण सासुरूनहीनांनी निरोप देत असतो. मित्रांनो अशा वेळी हिंदू धर्मशास्त्राने पाच प्रकारच्या गणेश मूर्ती खरेदी करण्यास आणि त्यांची आपल्या घरात स्थापना करण्यास विरोध केलेला आहे. मनाई केलेली आहे.

कारण या पाच गणेश मूर्तींची स्थापना आपल्या घरामध्ये केल्यास घरात दुःख दारिद्र्य संकटे भय आणि अनिष्टकारक गोष्टी उत्पन्न होतात. गणपती बाप्पा तर क्रोधित होतातच आणि परिणामी त्यांचे कृपाशीर्वाद मिळवण्याची सुवर्णसंधी आपण गमावतो. जाणून घेऊया नक्की अशा कोणत्या पाच गणेश मूर्ती आहेत. ज्या आपण चुकूनही खरेदी करू नयेत किंवा त्यांची स्थापना आपल्या घरात करू नये.

मित्रांनो त्यातील पहिली मूर्ती मुकुटा विना असणारी श्री गणेश मूर्ती म्हणजे गणपती बाप्पांची अशी मूर्ती की ज्यांच्या डोक्यावरती मुकुट नाहीये. मित्रांनो मुकुट हा मानाचा प्रतीक आहे आणि अशी मुकुटाशिवाय असणारी गणेश मूर्ती जर आपण तिची पूजा करत असू तर गणपती बाप्पांची आशीर्वाद आपल्याला मिळतील की नाही याबद्दल शासन कथाच आहे.

आणि म्हणून जर तुम्ही अशा प्रकारची मूर्ती खरेदी केलेली असेलच तर आपण बाजारातून एखादा मुकुट खरेदी करा आणि तो गणपती बाप्पांच्या माथे म्हणजेच डोक्यावरती नक्की ठेवा. जेणेकरून श्री गणेश प्रसन्न होतील. दुसरी मूर्ती आहे उभी असणारी गणेश मूर्ती मित्रांनो तस तर बाजारात अनेक प्रकारच्या विविध अशा गणेश मूर्ती तुम्हास पहावयास मिळतील.

मात्र ज्या गणेश मूर्तीमध्ये गणपती बाप्पा उभे आहेत. अशी गणेश मूर्ती मात्र आपण कृपया खरेदी करू नका. कारण आपल्या घरात आपण त्यांना दीड पाच आणि दहा दिवसांसाठी त्यांची स्थापना करणार आहोत. आपण आपल्या घरात आलेल्या अतिथींना पाहुण्यांना सुद्धा खाली बसा असे आग्रहाने म्हणतो. त्यांना आपण उभ किंवा ताटकळ ठेवत नाही.

तेव्हा गणपती बाप्पांना इतके दिवस ताटकळत उभे ठेवून हे सुद्धा हिंदू धर्मशास्त्राने वर्ज्य मानलेल आहे. आपणास आठवत असेल की पाठीमागच्या वेळी मी माता लक्ष्मीची उभी असणारी मूर्ती कदापिही घरात ठेवू नये अन्यथा घरातील पैसा बाहेर निघून जातो अस सांगितल होत. कारण लक्ष्मी मुळातच चंचल आहे.

त्या एका जागी कधीच स्थिर राहत नाहीत. आणि त्यातच जर आपण उभी असणारी लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरात आणत असू. तर घरातला पैसा कधीच स्थिर राहत नाही. पैसा तर येईल मात्र त्यास पायवाटा नक्की पुरतील. तेव्हा गणेश मूर्तीच्या बाबतीत सुद्धा पण हा नियम नक्की पाळा. आणि जर तुम्ही अशा प्रकारची गणेश मूर्ती खरेदी केलेलीच असेल तर अशा मूर्तीचे लवकरात लवकर विसर्जन करण्याची मात्र तयारी आपणास ठेवावी लागेल.

मित्रांनो तिसरी श्री गणेश मूर्ती की जी आपण कदापिही खरेदी करू नये ती म्हणजे शिव परिवारासहित असणारी श्री गणेश मूर्ती. शिव परिवार म्हणजे काय तर भगवान शिवशंभो महादेव तसेच माता पार्वती स्वामी कार्तिकेय की जे गणपती बाप्पांचे भाऊ आहेत. बंधू आहेत. आणि गणपती बाप्पा तसेच भगवान शिव शंकरांच्या काही कन्या आहेत. त्यातील सर्वात धाकटी कन्या अशोक सुंदरी तर हा संपूर्ण जो आहे.

त्यामुळे नंदी महाराज सुद्धा आले हा संपूर्ण शिव परिवार आहे. अनेक जण अशी शिव परिवारासहित असणारी गणेश मूर्ती खरेदी करतात. आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तिची पूजा केली जाते. मात्र यामध्ये घडत अस की नकळत अनुदानाने आपण गणपती बाप्पांची तर पूजा करतो. मात्र शिवशंभूंची माता पार्वतींची स्वामी कार्तिके यांची आणि शिवशंभूंची जी सर्वात धाकटी कन्या आहे.

यांची मात्र अशोक सुंदरी यांची मात्र पूजा केली जात नाही. किंवा त्याबद्दलचे नियम हे पाळले जात नाहीत. आणि मग या देवतांचा क्रोध निर्माण होऊ शकतो आणि त्याचा वाईट परिणाम आपल्यावर आणि आपल्या वास्तुवर होऊ शकतो. आणि म्हणून केवळ गणपती बाप्पांची मूर्ती आपण खरेदी करा शिव परिवाराची मूर्ती जर खरेदी करणार असाल तर संपूर्ण नियमांचे पालन करण्याची तयारी मात्र आपणास ठेवावी लागेल.

मित्रांनो चौथी मूर्ती गरुडावर विराजमान असणारे श्री गणेश, होय गरुड हे गणपती बाप्पांचे वाहन मानल जात आणि आपण पाहिल असेल अनेक मंदिरांमध्ये देवळांमध्ये गरुडावर विराजमान असलेले गणपती आपणास दिसले असतील. मित्रांनो ही मूर्ती आपल्या घरात कदापिही आणू नका अन्यथा घरामध्ये गरीबी कंगाली दलिद्रता दारिद्र्य या गोष्टी निर्माण होऊ शकतात.

घर विनाशाकडे जाऊ शकत. घरातील पैसा विनाकारण वायफळ गोष्टींवरती खर्च होऊ शकतो आणि याला धार्मिक मान्यता सुद्धा आहे. मित्रांनो अशी मूर्ती मंदिरामध्ये असे नियमांचे पालन कराव लागत. अशी मूर्ती आपण कदापिही घरात मात्र आणू नका.

पाचवीची गणेश मूर्ती आहे की जिची खरेदी आपण कदापिही करू नये. ती आहे मूषक विना असणारी श्री गणेश मूर्ती मूषक म्हणजे उंदीर, मित्रांनो मुषक हे गणपती बाप्पांच वाहन गणेश पुराण अस मानत की गणपती बाप्पा ज्या ज्या ठिकाणी जातात ते आपल्या वाहनाशिवाय जात नाहीत. ते या वाहनात बसूनच जातात. तर मग मित्रांनो जेव्हा आपण गणपतींना आपल्या घरामध्ये आणत आहोत.

तेव्हा तर मूषकच नसेल तर मूर्तीमध्ये तर असे गणपती बाप्पा आपल्या घरात येतील तरी कसे. कारण ते त्यांच्या वाहनाशिवाय कुठे जात नाहीत आणि म्हणून जर तुम्ही अशा प्रकारची गणेश मूर्ती खरेदी केलेली असेलच तर एक बाजारातून छोटासा मोशक काही छोटासा उंदीर आपण खरेदी करा. आणि त्याची हळदी आणि तांदळाने थोडीफार पूजा करून आपण या मोक्षकाची स्थापना गणपती बाप्पांच्या पायाजवळ ही नक्की स्थापन करा.

सहावा सर्वात महत्त्वाचा नियम की जो प्रत्येकाने पाळावयास हवा. तो म्हणजे गणपती बाप्पांची सोंड मित्रांनो बाजारामध्ये दोन प्रकारच्या मूर्ती तुम्हाला पहावयास मिळतील. एका मूर्तीमध्ये गणपतीची सोंड उजवीकडे असते तर दुसऱ्या मूर्ती ती डावीकडे असते. उजवीकडे सोंड असणारा गणपती दक्षिणाभिमुख ही गणपती मानला जातो.

ही मृत्यूची दिशा आहे. अशी गणेश मूर्ती खरेदी करून जर आपण घरात आणली असेल तर आपणास अनेक प्रकारचे नियम पाळावे लागतील. अन्यथा आपणास शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. सोबतच ब्रह्मचर्याच पालन करणे. कोणत्याही तामसिक गोष्टी घरामध्ये न शिजवण न खाण या गोष्टी सुद्धा आपल्याला पाळाव्या लागतात‌ आणि म्हणूनच ज्या गणपती बाप्पांची सोंड डावीकडे आहे अशी मूर्ती आपण खरेदी करून आपल्या घरात आणा.

प्रत्येक गृहस्थाश्रमी व्यक्तीने डावीकडे सोड असणारी गणपतीची मूर्तीच खरेदी करावी. कारण या गणेश मूर्तींची पूजा करताना जरी काही चुका घडल्या काही अपराध घडले तरीसुद्धा गणपती बाप्पा हे अत्यंत दयाळू आहेत. आणि ते आपल्याला या चुकांची क्षमा ही नक्की देतात. आणि म्हणून आता डावी आणि उजवीही बाजू ठरवताना गणपती बाप्पांच्या डाव्या हाताकडे असणारी जी सोंड आहे.

गणपती बाप्पांचा डावा हात तर त्याकडे जर सोंड असेल त्या बाजूला तर अशी मूर्ती आपण खरेदी करायची आहे. हे लक्षात ठेवा आपला डावा उजवा हात पाहायचा नाहीये. या नियमाच्या बाबतीत गणपती बाप्पांचा डावा किंवा उजवा हात आपण पहा. डाव्या हाताकडे जी गणपती बाप्पांच्या डाव्या हाताकडे जर सोंड वळलेली असेल तर अशी मूर्ती खरेदी करण्यास योग्य आहे.

तर मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेल्या या काही नियमांचे पालन आपण नक्की करा. गणपती बाप्पांची अस्सीम कृपा या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर भरसो याच मनोकामनेसह आम्ही या ठिकाणी थांबत आहोत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *