या राशींचे लग्न म्हणजे घराची युद्धभूमी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कुणाच्याही आयुष्याची सप्तपदी ही तप्तपदी ठरवू नये असं सगळ्यांनाच वाटत. त्यामुळे ज्योतिष शास्त्राचा आधार घेतला जातो. ज्योतिषशास्त्र सांगत की लग्न ठरवताना या राशींच्या जोड्यांनी एकत्र येणं किंवा लग्न करणं म्हणजे घराची युद्धभूमी करण्यासारख आहे. पण कोणत्या आहेत त्या जोड्या चला जाणून घेऊया.

संसार म्हटल की भांडणही होतच राहणार. परंतु जर कधी कधी सतत भांडण होत असतील तर भांडत राहणं म्हणजे काय संसार नाही नाही का. कधी तिने मनोहरमरुसणे रुसण्यात उगीचच हसणे असा लटका राग असेल तोपर्यंत ठीक. तोपर्यंत या ऋणानुबंधाच्या गाठी जन्मभर टिकतात.

परंतु जर कधी कधी दोघांनीही भांडणांमध्ये तलवारी उपसल्या तर मात्र नात्याचा खून झाला म्हणून समजा. आणि यासाठी ज्योतिष शास्त्र आपल्याला विवाहपूर्व सूचना देते. त्यानुसार आपल्या राशीला अनुकूल राशीचा जोडीदार निवडून संसार थाटला जातो.

भविष्यातील होणारी वादावादी टाळण्याचा हा हेतू असतो. चला तर मग वळूया अशा जोड्यांकडे ज्यांचं लग्न झालं तर घराची युद्धभूमी होण्याची शक्यता असते. आणि त्यातली सगळ्यात पहिली रास आहे कर्क रास आणि सिंह रास.

कर्क रास आणि सिंह रास- ज्योतिष शास्त्रानुसार कर्क आणि सिंह राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास गृहकलहाला खत पाणी मिळते. या राशींच्या व्यक्ती लग्नामुळे एकत्र आल्या तरी त्यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचे नाते परस्परांशी बांधले जाणे कठीण असते.

कर्क राशीची लोक नात्याबद्दल सजग असले तरी सिंह राशीचा वरचढ स्वभाव नात्यात अहंभाव निर्माण करतो. त्यामुळे प्रेमाला थारा मिळत नाही. पुढची जोडी आहे मीन आणि वृश्चिक राशीची.

मीन रास आणि वृश्चिक रास- मीन राशीची लोक अति संवेदनशील आणि प्रेमळ असतात. पण या उलट वृश्चिक राशीची लोक असतात प्रेमळ असतात पण प्रेम व्यक्त करण्यात हलगर्जीपणा करतात. तसेच वृश्चिक राशीच्या संशयी स्वभावामुळे मीन राशीची लोक दुखावले जातात. आणि याच कारणामुळे या दोन राशींमध्ये प्रेमाच्या जागी मी संवादाची किंवा अबोल्याची पोकळी निर्माण होते.

आणि त्याचाच परिणाम असतो की नात्यात कायमची कटूता येते. मीन आणि वृश्चिक राशी मध्ये आणखीन एक मुद्दा असतो तो म्हणजे मीन राशीची लोक अति सरळ असतात. आणि वृश्चिक राशीची लोक अति चलाक असतात अस सुद्धा आपण म्हणू शकतो. चला वळूया पुढच्या जोडीकडे.

कर्क आणि धनु राशीची जोडी- कर्क आणि धनु राशीचे एकत्र येणे तसे दुर्मिळच कारण या राशींचे गुण परस्पर विरुद्ध आहेत. धनु राशीची लोक काटेकोर आणि वेळेला महत्व देणारे असतात. तर कर्क राशीच्या लोकांना वेळेचा परिस्थितीचा काहीही परिणाम होत नाही.

ते आपल्याच तंद्रीत जीवन जगतात. याच कारणामुळे धनु राशीला कर्क राशीची जुळवून घेणं थोडं कठीण होऊन जात.
परिणामी या दोन्ही राशी एकत्र येणे अवघड होतं. मंडळी राशींच्या स्वभावावरूनच हा तर्क बांधला जातो.

परंतु हे इथे लक्षात घ्यायला हवं की प्रेम आणि सामंजस्य तसेच एकमेकांबद्दल आदर असेल तर कुठल्याही प्रकारचं नातं आपण निभावून देऊ शकतो नाही का. याबाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *