वृषभ राशी २०२२ मध्ये तुमच्या आयुष्यात या घटना घडणार म्हणजे घडणारच. सविस्तर राशिफळ २०२२.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मंडळी येणारे नवीन वर्ष, नवीन कल्पना, नवीन विचार आणि नवा विश्वास घेऊन येत असतं आणि मग अशातच आपल्या मनात नवीन विचारांचा जाळ पसरत जातं की, येणार वर्ष आपल्यासाठी कसं असेल. मागच्या वर्षी पेक्षा चांगलं असेल ना. अशा अनेक शंका आपल्या मनात घर करतात.

आणि मग आपल्याला ज्योतिष शास्त्र मदत करत. पुढचा मार्ग दाखवण्यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार आज आपण बघणार आहोत बारा राशींपैकी दुसरी रास अर्थात वृषभ रास या राशीसाठी २०२२ हे वर्ष कस असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया.

वृषभ राशीसाठी २०२२ हे वर्ष जीवनाच्या इतर काही भागांमध्ये सामान्य परिणाम देणार असेल. तरीसुद्धा करिअरच्या बाबतीत मात्र अफलातून प्रगती करवणार असणार आहे. सुरुवातीच्या महिन्याच्या मध्यात म्हणजे १६ जानेवारीला मंगळाचे धनु राशि मध्ये होणारे संक्रमण तुम्हाला भाग्याची साथ देईल.

त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात बऱ्याच क्षेत्रात अपार यश मिळवू शकता. सर्वच ग्रहांची स्थिती बघता यावर्षी करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. त्याबरोबरच तुम्ही आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये उन्नती करू शकाल. याव्यतिरिक्त शनी ग्रहाचे आपल्या राशीच्या नव भागात उपस्थित असन कमाईचे बरेच स्रोत उत्पन्न करण्यास मदत करतात.

खास करून यावर्षी एप्रिलमध्ये बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन याकडे इशारा करत आहे की तुम्ही या काळात धनसंपत्तीचा संचय करण्यात यशस्वी व्हाल. तसेच एप्रिल महिन्यात मीन राशीत बृहस्पतीचे संक्रमण होईल. त्यामुळे तुमचा एकादश भाव प्रभावित होईल.

त्याच्या परिणामामुळे तुम्ही आपल्या सुख सुविधा व इच्छांवर मोकळ्या मनाने खर्च कराल. आणि कदाचित यामुळेच यावर्षी ऑगस्ट आणि ऑक्टोंबर मध्ये धना संबंधित ही चढउताराने तुम्हाला काही प्रमाणात का होईना पण आर्थिक तंगीचा सामना सुद्धा करावा लागेल.

याव्यतिरिक्त यावर्षी बरेच वृषभ राशीतील जातक हे या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही उत्तम संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी होतील. मंडळी हे वर्ष वृषभ राशीतील विद्यार्थ्यांसाठी खूपच अनुकूल असणार आहे. २०२२ मध्ये वृषभ राशीतील विद्यार्थ्यांची आपल्या शिक्षणातील रुची वाढेल.

शिक्षणात लक्ष लागेल आणि त्याबरोबरच या राशीतील विद्यार्थ्यी उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहत आहेत ते यशस्वी सुद्धा होतील. पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एप्रिल नंतर यश मिळेल.

२०२२ मध्ये वृषभ राशीच्या विवाह इच्छुकांचे लग्न जमण्याचे योग आहेत त्याबरोबरच ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांच्या साठी सुद्धा हा काळ शुभ असेल. मग मंडळी तुमची रास कोणती आहे ते नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *