कुंभ राशी २०२२ मध्ये तुमच्या आयुष्यात या घटना घडणार म्हणजे घडणारच. सविस्तर राशिफळ २०२२.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मंडळी नवीन वर्ष म्हटलं की नवा उत्साह नव्या प्रेरणा आणि अर्थातच नव्या आशा आकांक्षा पण या अशा आकांक्षा पूर्ण होणार आहेत की नाही हे कसं जाणून घेणार. अहो अर्थातच राशिभविष्याच्या मदतीने. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीसाठी २०२२ हे साल कसे जाणार आहे.

मंडळी कुंभ राशी भविष्य २०२२ नुसार कुंभ राशीतील जातकांसाठी हे वर्ष अधिक अनुकूल राहील. आर्थिक दृष्टीने हे वर्ष तुम्हाला अपार यश देईल. कारण जानेवारी महिन्यात मंगळाचे संक्रमण तुम्हाला सर्वाधिक लाभ देण्याचे कार्य करील. या महिन्यानंतर मार्चच्या सुरुवातीच्या वेळी चार प्रमुख ग्रह म्हणजेच शनि मंगल बुध आणि शुक्राची एक सोबत युती करण तुम्हाला आर्थिक दृष्ट्या ही फायद्याचे ठरेल.

त्याचबरोबर १२ एप्रिलला मेष राशीत राहूचे संक्रमण होणे आणि त्याचे तुमच्या तृतीय भागात दृष्टी करणे तुम्हाला घाई गर्दीत निर्णय घेण्याला प्रेरित करेल पण अशावेळी तुम्हाला कोणत्याही गोष्टीने प्रभावित व्हायचं नाहीये. आणि संयम ठेवण्याची गरज असेल. या वर्षभर तुमचे आरोग्य सामान्य राहील.

जानेवारी महिन्यात तुम्ही मानसिक ताणतणावाने ग्रस्त होऊ शकता. आणि फेब्रुवारी पासून मे पर्यंत तुम्ही यास ग्रहांची प्रतिकूल चाल त्यांचे स्थान परिवर्तन या कारणाने तुम्हाला काही शारीरिक तक्रारींचा सामना करावा लागेल. एप्रिल महिन्यात मेष राशी मध्ये होणारे राहूचे संक्रमण आणि त्याचे तुमच्या तृतीय भावावर दृष्टी टाकने तुमच्या भाऊ बहिणींना आरोग्य संबंधित बऱ्याच समस्या देण्याचे कार्य करेल.

करियर आणि प्रोफेशनल लाईफ बद्दल बोलायचं झालं तर जानेवारी महिन्यात धनु राशि मध्ये मंगळ ग्रहाची उपस्थिती तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश देण्याचे योग बनवेल तसेच सप्टेंबर महिन्यापासून तुम्हाला कार्यस्थळी आपल्या वरिष्ठ आणि बॉस यांच्यासोबत लहान मोठ्या विवादांचा सामना करावा लागू शकतो.

याव्यतिरिक्त कुंभ राशीतील विद्यार्थ्यांसाठी तर हे वर्ष उत्तमच असणार आहे. फलदायी असणार आहे परंतु अनुकूल फळांचा आनंद घेण्यासाठी सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे. तसेच विवाहित जातकांसाठी विचार करता वर्ष २०२२ तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचे असेल.

यावर्षीच्या सुरुवातीच्या दिवसात तुमचे तुमच्या जीवनसाथी आणि सासरच्या पक्षाबरोबर वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. आणि एप्रिल पर्यंत स्थितीमध्ये सुधार पाहायला मिळणार नाही. एप्रिल महिन्यात गुरुचे मीन राशि मध्ये होणारे संक्रमण आणि त्याचे तुमच्या दुसऱ्या भागाला सक्रिय करणे अविवाहित जातकांना विवाहाच्या बंधनात बांधण्याचे कार्य करेल.

मंडळी तुम्हाला सल्ला दिला जातो आहे की २०२२ मध्ये थोडं धीराने घ्या. थोडं धैर्य ठेवा आणि समजदारीने निर्णय घ्या. जसं की जर तुम्हाला या काळात आर्थिक समस्या निर्माण झाली तर नोकरी सोडण्याचे ऐवजी तुम्ही त्रिरांशिन काम शोधून आपली समस्या सोडवू शकता.

किंवा कुठल्या सहयोगी किंवा सहकारी बरोबर समस्या निर्माण होत असेल तर तुम्ही स्वतःला त्या वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करून त्या समस्येतून बाहेर पडू शकता. हे वर्ष कुंभ राशीतील महिलांसाठी मात्र उत्तम राहण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या प्रेम जीवनाविषयी बोलायचं झालं तर यावर्षी उत्तरोत्तर तुमच्या प्रेमामध्ये जीवनातील अडीअडचणी तुमच्या दूर होत जातील.

वर्षाच्या शेवटी तुमच्या नात्याला घट्ट करणाऱ्या घटना घडण्याची शक्यता आहे. तर मंडळी एकंदरीतच बघता कुंभ राशीसाठी नवीन वर्ष नव्या आशा आकांक्षा घेऊन येत आहे. मग कुंभ राशीच्या सर्व जातकांना येणारे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो हीच सदिच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *