दातांची कीड व तोंडाची दुर्गंधी घालवायची असेल तर करा हा उपाय, लगेचच जाणवेल फरक.

Astrology

नमस्कार मित्रांनो

मित्रहो दिवस व काळ जसा बदलत आहे तसेच माणसाचे अवयव कमकुवत होत आहेत. हाडे अधिक मजबूत जाणवत नाहीत शिवाय आजारपण लवकर अंगी येते. तसेच याचा परिणाम तोंडातील दातांवर सुद्धा झालाच आहे. दातांचा ठिसूळ पणा वाढला असून हल्ली लहान मुलांना देखील दात दुखीचे प्रॉब्लेम असतात.

दातांची योग्य निगा राखणे आवश्यक असते नाहीतर ते लवकर खराब होतात व मग अन्न व्यवस्थित खाता येत नाही. याचा परिणाम आपल्या तब्येतीवर सुद्धा आपोआप होतो. शिवाय तोंडातून येणाऱ्या दुर्गंधी मुळे कोणाशी बोलताना जास्त जवळ आपण जात नाही.

दात दुखणे, मुखाची दुर्गंधी येणे अशा समस्या अनेकांना असतात. त्यामुळे आपण निरनिराळी औषधे देखील वापरतो पण त्याचा काही उपयोग होत नाही. पण मित्रहो आज आपण या लेखातून एक असा उपाय जाणून घेणार आहोत जो अगदी सोपा असून नैसर्गिक देखील आहे.

तसेच त्याचा कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही. मित्रहो हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा, जेणेकरून तुम्हाला देखील हा उपाय नीट कळेल. या उपायामुळे मुखाची दुर्गंधी, दाढ सुजणे, दातांना कीड लागणे. तसेच दातांचा पिवळेपणा, दात हलने, हिरड्या सुजणे, हिरड्या दुखणे, या संपूर्ण समस्या हा उपाय केल्याने सहज निघून जातील.

आजच्या उपायामध्ये आपण जी एक पावडर तयार करणार आहोत, त्यातील सामग्री आपल्या घरात सहज उपलब्ध असतेच. त्यामुळे हा उपाय अजिबात खर्चिक नसुन गुणकारी आहे. ही पावडर मुख दुर्गंधी दूर करून दात स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

तसेच दाताचे दुखणे, दाढ दुखणे शिवाय दातात कीड निर्माण होणे, हिरड्या दुखणे, सुजणे, फुगणे या सर्वांवर ही पावडर अगदी रामबाण ठरणार आहे. मित्रहो ही पावडर करण्यासाठी आपणाला लवंग लागतील, वीस ते पंचवीस लवंग आपण घ्यायचे आहेत.

हे लवंग एका खलबत्त्यात टाकावे, लवंग मध्ये सोडियम, कॅल्शियम, थॅलॅनियम, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन इ ही काही पोषक तत्वे असतात जी आपल्या दातांसाठी अत्यंत उपायकरी असतात. तसेच दुसरा पदार्थ म्हणजे आपण तुरटी घ्यायची आहे, तुरटी मुळे दात खूप मजबूत होतात.

तसेच तुरटी मुळे दातातील पिवळेपणा निघून जातो व दात स्वच्छ होऊन जातात. तसेच यामुळे मुख दुर्गंधी सुद्धा दूर होते. यासाठी आपण दीड ते दोन इंच तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे, व तो लवंग सोबत बारीक कुटीन घ्यायचा आहे. आता हे तयार झालेले मिश्रण एका मिक्सरच्या पात्रात टाकावे.

त्यामध्ये रोज खाण्यात असलेले मीठ एक चमचाभर टाकावे. मिठा मुळे मुख दुर्गंधी कमी होऊन दातातील कीड कमी होते. तसेच यामध्ये अर्धा चमचा हळद देखील घालायची आहे. दाढ दुखणे, सुजणे या समस्या हळदी मुळे कमी होतात. तसेच यामध्ये खाण्याचा सोडा देखील घालावा, एक चमचा हा सोडा घ्यावा.

सोडा घातल्याने दातांचा पंधरा रंग आहे तसा टिकून राहतो. हे सर्व पदार्थ बारीक करून घ्यायचे आहेत, व ही पावडर तयार होईल. रोज दात घासून झाल्यावर आठवणीने ही पावडर दातांवर बोटाने अलगद घासायची आहे. त्यामुळे मुख दुर्गंधी दूर होऊन दात स्वच्छ बनतील व घट्ट बनतील.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *