नमस्कार मित्रांनो.
मित्रहो तरुण तरुणी प्रेमात पडणे साहजिकच आहे, हलका हलका पाऊस आणि वाऱ्यात झुलणारी झाडी अलगद प्रेमाचे वातावरण निर्माण करत असते. पाण्याची झुळझुळ कवितेचे नवे बोल गात असते, अशातच आपणाला आपलं हक्काचं कोणीतरी मिळाव अस वाटत असत आणि कोणी यावेळी आपल्याशी मैत्री केली.
तर आपण त्याच्या स्वभावाची पारख करायला लागतो आणि बघता बघता कधी आपणच त्याच्या प्रेमात पडतो कळत नाही. पण मित्रहो माणूस सहज कळण्याची गोष्ट नसते, संपूर्ण आयुष्य गेलं तरीही कधी कधी माणूस समजून येत नाही. आयुष्यातील सुवर्ण काळ तोच असतो जेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडतो.
फुलासारख हलकं वाटणे आणि फुग्यासारखे उडावेसे वाटण्याचे हेच दिवस असतात. अनेक गोडसर आठवणी आयुष्याच्या पुस्तकात खूपशा पानावर जपून ठेवल्या जातात. या आठवणीत फुलांचा सुगंध तर असतोच शिवाय काही वेळा यामध्ये काटे देखील असतात जे खूपदा दुःखद धक्का देतात. बऱ्याचदा ब्रेकअप होण्याचेही खूपसे कारणे असतात.
स्वभाव खटकतात, वागणे, सवय खटकते. योग्य आणि प्रामाणिक जोडीदाराची साथ ही आयुष्यात सुख मिळवण्या- साठी गरजेची असते. पण जर जोडीदाराचा स्वभाव खटकत असेल तर नात्यात खूप खटके उडतात. त्यामुळे कधी कधी आपण राशीवरून माणसाचा स्वभाव ठरवतो.
राशिभविष्यात अशा ५ राशी आहेत ज्यांच्यावर आपण फारसा विश्वास ठेवू शकत नाही. आज या लेखातून मित्रहो आपण जाणून घेऊया की कोणत्या आहेत या पाच राशी ज्या विश्वासघात करू शकतात याला काही अपवाद देखील असू शकतात.
१) वृश्चिक :- ज्योतिष शास्त्रानुसार तुमचा पार्टनर जर या राशीचा असेल तर त्याला कोणत्याही कामासाठी थांबवू नका. या लोकांना टोकलेले अजिबात आवडत नाही. असे केल्याने तुमच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो आणि मग पर्यायाने तुमचे ब्रेकअप देखील होऊ शकते. नात्यात तूट पडू शकते, जोडीदार तुमचा विश्वासघात नक्की करू शकतो.
२) वृषभ :- या राशीचे गुणवैशिष्ट्ये सर्वाना माहीतच आहे, अतिशय रसिक आणि हौशी अशी ही रास आहे. हे लोक खूप सकारात्मक असतात, आपली छाप सहज कोणावर देखील पाडतात. तसेच दुसऱ्या कडे लगेच आकर्षित होतात.
या लोकांना नवीन गोष्टींचे आकर्षण लवकर निर्माण होतं. एखाद्या नव्या गोष्टीकडे या राशीचे लोक लगेच आकर्षित होतात त्यामुळे रिलेशनशिपला हे लोक लवकर कंटाळतात. पार्टनरला विसरायला हे लोक मागेपुढे बघत नाहीत.
३) मिथुन :- वृषभ राशीसारखीच काही वैशिष्ट्य मिथुन राशीची असतात. हे लोक दुसऱ्यांना दिलेले कमिटमेंट देखील मोडू शकतात. या राशीची लोकं धोका देण्यात माहिर असतात. बऱ्याचदा हे लोक फ्लर्ट देखील करतात, जास्त वेळ रिलेशनशिप मध्ये राहणे या लोकांना आवडत नाही.
४) धनु :- हे लोक रोचक काम करण्यात माहिर असतात, त्यांना कोणी जाब विचारलेलं आवडत नाही किंवा त्यांना रोखलेल देखील आवडत नाही. हे लोक दुसऱ्याचं मन मोडण्यात माहीर असतात.
५) सिंह :- या राशीच्या लोकांच्या प्रेमात न पडलेलं बरं, अस या राशीबद्दल बोललं जातं. हे लोक स्वतःवर जास्त प्रेम करतात, स्वतःपेक्षा अधिक प्रिय या लोकांना काहीही नसतं.
मित्रहो ज्योतिष शास्त्र हे तर्क शास्त्र असत, काही लोक यासाठी अपवाद असतात. याच राशीचे काही लोक प्रेम छान जपू शकतात, अस नसते की सर्वजण धोकाच देतात. त्यामुळे तुम्ही प्रेमात पडा पण काहीसे सावध देखील रहा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.