१० जुलै २०२२ आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, जाणून घ्या सविस्तर माहिती.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आषाढी एकादशी भगवत भक्तांच्या आयुष्यातील भक्तीत रमण्याचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी पांडुरंगाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून पूजा अर्चना आणि उपवास केला जातो. खरंतर आषाढी एकादशीला सर्व भाविक भक्तांचा उपवास असतोच असतो. कुणीही असं नसतं ज्यांचा उपवास नाही.

म्हणूनच आज आपण एकादशी म्हणजे काय आणि ती कशी करावी. एकादशीचा उपवास कसा करावा हे सगळं अध्यात्मक दृष्टीने समजून घेणार आहोत. उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे हा उपवासाचा खरा अर्थ आहे.

उपवास करणं म्हणजे फक्त उपाशी राहणे नाही. आपण काय करतो दिवसभर उपवास करतो. उपवासाच्या नावाने भात भाकरी भाजी पोळी खात नाही. थोडक्यात रोजच जेवण जेवत नाही. पण फराळाच्या नावाखाली अगदी दिवसभर जेवत असतो. पोटात अगदी जागा शिल्लक ठेवत नाही.

अति पण झाले तर सुस्ती येते मग देवाचं नाव कसं घेणार आठवणारच नाही. आणि मग उपवासाच्या दिवशी देवाच्या जवळ जाणे राहू द्याच पण आपण देवापासून दूर दूरच जातो. एकादशी आणि दुप्पटशी अशी अवस्था सगळ्यांचीच होऊन जाते. म्हणूनच एकादशीचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आजच्या या माहितीचा खटाटोप आहे.

एकादशीचा अर्थ असा आहे की आपली पाच ज्ञानेन्द्रिय पाच कर्मेंद्रिय तसेच एक मन मिळून ११ अर्थात एकादशक यांना एकत्र करून एकाच दिशेकडे म्हणजे म्हणजेच ईश्वराकडे आत्मस्वरूपाकडे वळणे म्हणजे एकादशीचा उपवास करणे आत्मरुपी पांडुरंगा जवळ आणि म्हणजे उपवास करणे संतांनी वर्णन केलेच आहे.

देह ही पंढरी आत्मा पांडुरंग मग आपण एकादशीला कोणत्या पद्धतीने उपवास केला पाहिजे. उपवासाच्या दिवशी आपलं मन शांत राहण्यासाठी फराळ हा अगदी अल्प प्रमाणात असावा. अति खाण नसाव. तसंच उपाशी सुद्धा राहू नये. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहे. जर योग्य आहार असेल तरच आपले मन एकाग्र होते.

आणि आपल्या उपास देवतेची पूजा मनोभावे करता येते. किंवा ज्यांना आत्मज्ञान झाले आत्मदर्शन झाले आहे. त्यांना अनुसन्मान साधन सोपं जातं म्हणून एकादशी किंवा कोणताही उपवास करताना आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेन्द्रिय तसेच मन एकत्र करून उपास्य देवतेच्या चरणानकडे लावावे. म्हणजे उपास केलेल्याचे पुण्य आपल्याला मिळते. वारकरी संप्रदायात एक नियम आहे.

एकादशीचा उपवास करताना म्हणतात धरायला दशमी करायला एकादशी आणि सोडवायला द्वारशी याचा गोड अर्थ हाच आहे. धरायला दशमी म्हणजेच पाच ज्ञानेन्द्रिय अधिक पाच कर्मेंद्रिय दहा म्हणजे दशमी आता करायला एकादशी म्हणजे मनमिळावू म्हणजे झाली एकादशी.

एकादशक म्हणजे ११ आणि सोडवायला द्वादशी म्हणजे याचा अर्थ पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेन्द्रिय एक मन आणि बारावा आत्मराम म्हणजे अर्थात आत्मरूपी पांडुरंग शेवटी तोच भवसागरातून सोडवतो. असा हा एकादशीचा उपवास करता आल तर सोन्याहून पिवळ. आता या उपवासाची दुसरी बाजू सुद्धा पाहिली पाहिजे उपवासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही.

तर विविध विकारांपासून मनालाही उपवास घडावा म्हणून सत्संग करावा. असं शास्त्र सुद्धा सांगत उपवासाच्या दिवशी शारीरिक लंगन केल्याने त्याचे विकार तर दूर होतातच. तसेच मनाचे लंगन केले तर मनाचे विकार सुद्धा दूर होतात. विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपवासाच्यादिवशी मन भजनात आणि कीर्तनात रमवावे धन्यवाद.

भावाने भगवंतांना शरण जाऊन भगवंतांना स्मरण करावं. हे सर्व ऐकून आता सुगरणीचा हिरमोड झाला असेल त्यात काय शंकाच नाही. परंतु आपल्याला देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. उपवासाच्या पदार्थांचे काय तुम्ही इतर दिवशी सुद्धा बनवून खाऊ शकता.

पण उपवासांचा हेतू साध्य करायचा असेल तर तना मनाचा उपवास घडणे अर्थात लग्न घडने आवश्यक आहे. मग उपवासाच्या दिवशी काय खावे आणि खाऊ नये. तर सगळ्यात महत्त्वाचा शक्यतो आषाढी एकादशीला काहीही खाऊ नये. पण प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते. त्यामुळे ज्याला जसे झेपेल तसा अल्प आहार घ्यावा.

शक्यतो साबुदाणा खिचडी तेलकट तुपट हे खाऊ नये. फळ खावीत किंवा दूध घ्यावे. उपवासाला काय काय खायचं या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा उपवासाच्या दिवशी हरी भजन हरी किर्तन कसं करायचं. आपल्याला सत्संग कसा घडेल याचा विचार करा.

कारण उपवासाचा खरा अर्थ तोच आहे. यंदाच्या एकादशीला तना मणाला उपवास घडवूया. आणि विठ्ठल रुक्माईचे नाव घेऊया. तर मंडळी तुम्ही सुद्धा आषाढी एकादशीचा उपवास करत असाल तर कमेंट मध्ये जय हरी विठ्ठल असे नक्की लिहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *