नमस्कार मित्रांनो.
दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर एकच चर्चा होते ते म्हणजे कोणत्या साईडला जायचं. कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं. कुठलं करिअर निवडायचं याविषयी अशावेळी तुम्ही राशींची मदत सुद्धा घेऊ शकता. अर्थातच त्या मुलाची आवड काय आहे हे विचारात घेणे सगळ्यात आधी महत्त्वाचं पण त्याचबरोबर त्या मुलाची किंवा मुलीची रास काय आहे.
त्यानुसार सुद्धा करिअर निवडायला तुम्हाला मदत होऊ शकते. कोणत्या राशीच्या लोकांनी कोणतं करिअर केलं तर त्यांना जास्त चांगल्या संधी मिळतील किंवा त्यांचं नशीब फुलून येईल हेच आज आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळ हा धैर्य आणि ऊर्जा या दोन गोष्टी भरपूर प्रमाणात देतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशी मुलांनी किंवा मुलींनी अभियांत्रिकी किंवा सैन्य, पोलीस किंवा मेडिकल असे क्षेत्र निवडले तर त्यांची प्रगती होऊ शकते.
याशिवाय वकिली, ज्वेलर, कम्प्युटर यासारख्या व्यवसायात सुद्धा त्यांना यश मिळते. थोडक्यात सांगायचं झालं तर जिथे धाडसाची गरज असते अशा क्षेत्रात मेष रास बाजी मारू शकते.
वृषभ रास- या राशीचा स्वामी आहे शुक्र ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रह हा वैवाहिक जीवन, जोडीदार इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार कला, चैनीच्या वस्तू, चित्रकला, गायन, नृत्य, संगीत, सिनेमा, अभिनय, फॅशन अशा क्षेत्रांमध्ये वृषभ राशीचे लोक चांगली कामगिरी करू शकतात.
त्यासोबतच या लोकांमध्ये धातू विषयक व्यावसायिक किंवा हॉटेल व्यवसाय किंवा शेती संबंधित व्यवसाय सुरू करणे लाभदायक ठरू शकते.
मिथुन रास- ज्योतिष शास्त्रानुसार बुध हा ग्रह मिथुन राशीचा स्वामी आहे. हा ग्रह संवाद गणित गाणी बुद्धिमत्तेचा कार्यक्रम आहे. ज्योतिष शास्त्रानुसार अशा परिस्थितीत मिथुन राशीच्या लोकांनी जर बँकेत, लिपिक, लेखन करणे, किंवा मीडिया रिपोर्टर.
एडिटर, भाषातज्ञ किंवा अनुवादक म्हणून काम केलं तर ते नक्कीच चांगली तयारी करू शकतात. याशिवाय सुद्धा जे बोलण्याचे क्षेत्र आहे जिथे बोलण्याची कला वापरून काम केलं जातं अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये ही लोकं प्रगती करू शकतात.
कर्क रास- कर्क राशीचा कारक ग्रह आहे चंद्र, चंद्र हा मनाचा आणि आईचा कारक आहे. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांना पाणी किंवा काच या संबंधित व्यवसायामध्ये यश मिळत.
म्हणूनच तुम्ही डेरी, फार्म, हॉटेल व्यवसाय, बर्फ, जहाज, रसायन शास्त्र, अत्तर, अगरबत्ती, छायाचित्रण, चित्रकला, पुरातन शास्त्र, इतिहास आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करू शकता.
सिंह रास- सूर्यग्रहाच्या मालकीची ही रास आहे. हिंदू ज्योतिष शास्त्रात सूर्य हा ग्रह पद प्रतिष्ठा, या गोष्टींचा कारक आहे. सिंह राशीच्या लोकांनी राजकीय प्रशासकीय किंवा सरकारी पदांवर काम करावं. सरकारी वर्ग म्हणून सुद्धा ते काम करू शकतात. याशिवाय औषध, स्टॉक एक्सचेंज, कापड, कापूस, कागद, स्टेशनरी किंवा फळ या व्यवसायात सुद्धा त्यांना यश मिळू शकत.
कन्या राशि- ज्योतिष शास्त्रानुसार कन्या राशि वर बुध ग्रहाचे वर्चस्व असतं. आणि अर्थातच हा ग्रह संवाद बुद्धी वाणी गणित इत्यादींचा कारक ग्रह आहे. त्यामुळेच कन्या राशीच्या लोकांना ज्योतिष, अध्यापन अर्थात शिक्षक, किरकोळ विक्रेते, कार्टून पैशांचा व्यवहार रिसेप्शन बस ड्रायव्हर व्हिडिओ किंवा टेलिव्हिजन संबंधित व्यवसाय किंवा आर्टिस्ट नोकरी, कम्प्युटर या क्षेत्रांमध्ये करिअर केल तर नक्कीच ते त्यांचा चांगला ठसा उमटवू शकतात.
तुळ रास- तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र वैदिक भौतिकशास्त्रानुसार तारुण्य, सौंदर्य, दागिने, ऐश्वर्य यांचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी मानसोपचार तज्ञ, तपासणी, गुप्तहेर, बुक कीपर, कॅशियर, ड्रायव्हर, टायपिस्ट, बँकिंग, ऑडिटर, पशुजन्य पदार्थ, दूध तूप लोकर ईत्यादींचे व्यवसाय केल्यास नक्कीच ते त्यांचा चांगला ठसा उमटवू शकतात.
वृश्चिक रास- मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी आहे. अर्थातच मगाशी म्हटलं तसं मंगळ हा ऊर्जा आणि धैर्य देतो. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार रसायनशास्त्र, डॉक्टर, वकील, अभिनेता, इमारत बांधकाम, देशसेवा, टेलिफोन, खनिज तेल, मीठ, औषध, घड्याळ, रेडिओ, तत्त्वज्ञ आणि सगळ्यात महत्त्वाचं गुप्तहेर अशा व्यवसायांमध्ये वृश्चिक रास नक्कीच चांगलं काम करू शकते.
धनु रास- या राशीचा स्वामी आहे गुरु, गुरु हा ग्रह ज्ञान देतो आनंद देतो. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार या राशींच्या लोकांसाठी अध्यापन, लेखक, संपादक, शिक्षण, कायदा, वकील, तत्त्वज्ञ, सुधारक, प्रकाशक, आयात निर्यात करणारे, खाद्यपदार्थाशी संबंधित व्यवसाय. बँकर्स आणि चामड्याच्या वस्तू या क्षेत्रात नक्कीच चांगली कामगिरी धनु राशीचे लोक करतात.
मकर रास- मकर राशि शनी ग्रहाच्या मालकीची रास आहे. त्यामुळे बोलायचे झाल्यास व्यवस्थापन, विमा विभाग, विज, कमिशन, यंत्रसामग्री, करार सट्टा, आयात निर्यात, कापड, राजकीय, खेळणी, खाणकाम, वन उत्पादन, फलोत्पादन या क्षेत्रांमध्ये आपलं करियर घडवावं यामुळे नक्कीच त्यांना त्याचा फायदा होतो.
कुंभ राशी- कुंभ राशीचा स्वामी सुद्धा शनी आहे आणि त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना सुद्धा या सगळ्या क्षेत्रांमध्ये तर यश मिळतच पण त्याचबरोबर कुंभ राशीचे काही खास वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजेच संशोधन कार्य अध्यापन कार्य प्रकाश, तांत्रिक, नैसर्गिक, उपचार, तात्विक, वैद्यकीय, संगणक, विमान मेकॅनिकल, या अशा क्षेत्रांमध्ये काम करणं त्यांच्यासाठी शुभ ठरू शकते.
मीन राशि- मी नाही गुरुच्या मालकीची रास आहे. आणि त्यामुळे मीन राशीची लोक सुद्धा चांगला शिक्षक, चांगले लेखक त्याचबरोबर चांगले कलाकारही बनू शकतात. कमिशन एजंट. आयात निर्यात संबंधित, नृत्य दिग्दर्शक, यामध्ये सुद्धा ते आपलं चांगलं करिअर घडवू शकतात.
मित्रांनो या होत्या राशी आणि त्यांना कोणत्या क्षेत्रात गती आहे त्याचं सविस्तर भविष्य पण अर्थातच निर्णय घेताना तुम्हाला आहे त्या गोष्टी तुम्ही विचारात घ्यायचा आहे. राशीचे भविष्य तुम्ही मार्गदर्शन म्हणून घेऊ शकता.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.