शनीच्या साडेसाती पासून वाचण्यासाठी या ५ राशींच्या लोकांनी चुकूनही करू नयेत ही ५ कामे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो भगवान शनिदेव हे ग्रहांचे न्यायाधीश असून ते अतिशय न्यायप्रिय मानले जातात. शनिदेव हे न्यायाचे देवता असून कर्मफलाचे देवता आहेत. मित्रांनो शनीच्या दृष्टीपासून कोणीही वाचू शकत नाही. ज्या ज्या राशीसाठी शनिदेव शुभ असतात अशा व्यक्तींना जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

मानसिक ताण तणाव, नोकरीत अधिकारी वर्गाशी मतभेद, व्यापारात नुकसान होणे, पैशांची तंगी, कामात वारंवार अपयश येणे, वैवाहिक जीवनात कलह अशा अनेक समस्यांचा सामना त्या व्यक्तीला करावा लागतो. मित्रांनो शनिदेव हे नेहमीच अशुभ फल देतात असं नाही. त्यांना प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत.

मित्रांनो भगवान शनिदेव हे फक्त कर्मफलाचे दाता आहेत. म्हणून ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांना शनीच्या क्रोधाला घाबरण्याचे काही कारण नाही. शनि हे भाग्याचे कारक असून धन संपत्तीचे कारक देखील आहेत. जेव्हा शनि शुभफल देतात तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही.

सूर्यपुत्र शनिदेव जेव्हा शुभ फल देतात तेव्हा व्यक्तींचे संपूर्ण जीवन बदलून जाते. दुःखाचा अंधकार दूर होऊन सुखाची सुंदर दिवस यायला सुरुवात होते. प्रत्येक शनिवारी शनि देवाची ‌ पूजा केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. ज्यांनी विधी विधान पूर्वक भक्ती भावाने शनीची पूजा करतात. शनीच्या नावे दानधर्म करतात अशा लोकांवर शनी देव नेहमीच प्रसन्न होतात.

प्रत्येक मंगळवारी हनुमानजीं ची पूजा करून हनुमान चालीसेचा पाठ केल्याने शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो. सध्या मिथुन तुळ धनु मकर आणि कुंभ राशीवर शनीची अशुभदृष्टी असून यांना सावध राहणे गरजेचे आहे. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीची महादशा चालू आहे अशा लोकांना देखील सावध राहणे गरजेचे आहे. वाईट कामापासून दूर राहणे गरजेचे आहे.

मित्रांनो भगवान शनींना प्रसन्न करण्याची वाईट कामापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. ते प्रत्येकाला करमानुसार फळ प्रदान करत असतात. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीचे किंवा दुर्बल व्यक्तीचे शोषण कधीही करू नका.

कष्ट करणाऱ्या गरीबाचा कधी अपमान करू नका. वाईट सवयी आणि चुकीच्या कामापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शब्दामुळे कोणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.

मित्रांनो प्रत्येक शनिवारी शनिदेवाला काळे तीळ, काळे उडीद, काळे कापड, काळी छत्री आणि मोहरीचे तेल अर्पण करणे अत्यंत शुभ मारण्यात आले आहे. सोबतच गरजूंना दान केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. आपल्या जीवनातील शनीचा वाईट प्रवास सुद्धा दूर होतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *