नमस्कार मित्रांनो.
मित्रहो शरीरात एक जरी काही बिघडल तरी खूप त्रास होतो, त्यामुळे आपण लगेच होणाऱ्या व्याधींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना भेटतो. खास करून अनेक जणांना मूळव्याध असते, अशा लोकांना या व्याधीचा खूप जास्त त्रास होतो. अगदी पोटात दुखत, माणूस वेदनेने हैराण होऊन जातो.
काहीजण तरी घरात लोळतात पोट धरून, अगदी डोळ्यात पाणी येते इतक्या वेदना होत असतात. त्यामुळे या वेदनांना शांत करण्यासाठी लागतील तेवढे पैसे घालून लोक दवाखान्यात जातात, डॉक्टरांना हवे तितके पैसे देऊन आपण उपचार करतो. मात्र तरीही काही परिणाम होत नाही.
पण मित्रहो आज आपण मूळव्याध घालवण्यासाठी अत्यंत साधा सोपा आणि घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा. मूळव्याध जरी कितीही भयंकर असेल, मास वाढून रक्त पडत असेल खूप त्रास होत असेल तर हा उपाय केल्याने तुमची सहज या त्रासातून सुटका होईल.
मित्रहो हा उपाय अगदी रामबाण आणि जुनाट उपाय आहे, हा उपाय केल्याने आपणाला नक्कीच भरपूर फायदा होणार आहे. मूळव्याध ज्यांना झाला आहे त्यांनी स्वतःकडे, आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते. जर कोणाला मूळव्याध झाला असेल तर त्यांनी आहारामध्ये काकडी, कलिंगड, नारळ यांचे सेवन करावे.
तसेच दिवसातून एक दोन वेळा एक एक ग्लास भरून ताक प्यावे. आपल्या घरात जे गाईचे दूध असते त्यात एक एक चमचा भरून साजूक तूप घालावे आणि प्यावे. तसेच दिवसभरात अगदी दोन कांदे आपण कच्चे चावून चावून खायचे आहेत.
शिवाय दिवसभरात कधीही तुम्ही दोन ताजे अंजीर खाल्ले तर ते देखील फायदेशीर ठरतील. ताजे अंजीर नसल्यास फ्रायफ्रूटच्या दुकानात कोरडे अंजीर देखील मिळतात ते तुम्ही खाऊ शकता. त्यातील दोन अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे व सकाळी हे दोन्हीही अंजीर चावून चावून खावे आणि त्याचे जे पाणी आहे ते देखील तुम्हाला प्यायचे आहे.
हा जो आहार आहे त्यापैकी तुम्ही सर्वकाही खाणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीरातील आंतरिक समस्या मूळव्याध जी असते ती सहज निघून जाते. बाह्य समस्या ज्या असतात त्या दूर करण्यासाठी मित्रहो आपणाला हळद लागणार आहे जी अत्यंत गुणकारी असते शिवाय तिच्यात अनेक फायदेशीर गोष्टी असतात.
एका वाटीत एक चमचा भर हळद घ्यायची आहे. त्यामध्ये खोबरेल ते एक चमचा भर टाकावे. तसेच यामध्ये फ्रेश कोरफड घालावी. त्याच्या बाजूचे काटे सर्वप्रथम काढून घ्यावे व मधील जो कोरफडचा गर आहे तो वाटीत काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.
यातील कोरफड आणि खोबरेल तेल शरीरासाठी अत्यंत थंड असते त्यामुळे जखम शांत व थंड वाटते. तर हे मिश्रण मूळव्याधच्या ठिकाणी लावावे व त्यावर कॉटन ठेवावा. असे हे दिवसातून तीन वेळा करावे. तीस दिवस जर हा उपाय केला तर नक्कीच वाढलेले मास कमी होईल व मूळव्याध देखील आटोक्यात येईल.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.