३० जून २०२२- गुरुपुष्यामृतला लक्ष्मीप्राप्ति आणि गुरुकृपेसाठी करा ही सेवा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

येत्या ३० जूनला आहे गुरुपुष्यामृत योग आणि या योगावर तुम्ही कुठलीही सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला काही पटीने जास्त मिळते चला तर मग जाणून घेऊया की गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही कुठली सेवा करू शकता. ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्रांचा उल्लेख आहे. पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे.

जेव्हा नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणून ओळखले जातात. या नक्षत्रातील प्रमुख देवता म्हणजे बृहस्पति देव आहे जे देवतांचे गुरु आहेत. हा ज्योतिष शास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. या दिवशी तुम्ही नवीन वस्तू खरेदी करू शकतात.

जसे की जमीन, घर, वाहन, सोन्याचे दागिने, या अशा मौल्यवान वस्तू सुद्धा खरेदी करू शकतात. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतात या दिवशी कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नसते. जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल. तर अतिउत्तम माता लक्ष्मीची तुमच्यावर नक्कीच कृपा होईल.

सगळी काम सुद्धा सहज पूर्ण होतात. या गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णू बरोबरच बृहस्पती देवतेची सुद्धा पूजा केली जाते. ज्यांना सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते. गुरुपुष्ययोगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तुमच्या जर काही आर्थिक समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी नारायणाची पूजा करा.

त्याचबरोबर शुभयोगामध्ये लक्ष्मी मंत्राचा सुद्धा जप करा. १०८ वेळा लक्ष्मी मंत्राचा जप जर तुम्ही केलात तर तुमची आर्थिक समस्या सुटलीच म्हणून समजा त्याचबरोबर गुरूपुष्यामृत योगादिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह काढा. तसेच दक्षिणावर्ती शंखाची पूजा करा. या शंकाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे.

अस केल्याने जर पैसे कुठे अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. तसच तुमचं दुकान असेल किंवा व्यवसाय असेल तर त्या कामाच्या ठिकाणी पारध लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यानेसुद्धा संपत्ती आणि समृद्धी मिळते. ती तुम्ही गुरूपुष्यामृत योगादिवशी स्थापन करू शकतात. असं केल्याने व्यवसायाला गती मिळते.

आर्थिक संकट दूर होतात नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असाल तर गुरूपुष्यामृत योगात पारध लक्ष्मीची पूजा तुम्ही नक्कीच करा. पारध लक्ष्मी बरोबरच तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा सुद्धा करू शकता. एकाक्षी नारळाला तुम्ही लक्ष्मीच रूप मानल जात.

या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये जर पैशासंबंधी काही अडचण असेल तर ती दूर होते. अन्नधान्यात ही वाढ होते गुरूपुष्यामृत योगादिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक असे कनकधारा स्तोत्र लक्ष्मी स्तोत्र पठण करू शकता. कनकधारा स्तोत्राचे निर्माते आद्य शंकराचार्य आहेत.

त्यांनी या स्तोत्राचे पठण करून पैशाचा पाऊस पाडला होता. अस म्हणतात नियमितपणे या दोन्ही गोष्टींचे पठण केल्याने त्याला वैभव संपत्ती मिळू शकते. तसेच शत्रूंपासून सुद्धा मुक्ती मिळते. श्रद्धा भक्तीने तुम्ही गुरुपुष्यामृत योगा दिवशी या स्त्रोताचे पाठ करा किंवा तुम्हाला म्हणता येत नसेल तर किमान ऐका.

मंडळी उपाय तर मी बरेच सांगितले यातला कोणताही उपाय तुम्ही श्रद्धा भक्तीने केला तर त्याचे फळ तुम्हाला गुरूपुष्यामृताला नक्कीच मिळेल. तर यातली कोणतीही सेवा तुम्ही करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *