सुवासिनींनी या ६ गोष्टी वाटून घेऊ नये, नाहीतर आयुष्यभर रडत बसाव लागेल…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मंडळी आपल्याला माहीतच आहे की महिला वर्गाला गप्पा मारायला खूप आवडतं. आणि त्या गप्पांमधून नच त्यांना खूप मैत्रिणी सुद्धा मिळतात. आणि एकदा का मैत्री झाली की मैत्रिणींबरोबर सगळे शेअर केलं जातं. आपल्या मनातील सुख-दुखःही तिला सांगितले जातात. घरातल्या काही गोष्टी सुद्धा सांगितल्या जातात.

पण तुम्हाला हे माहित आहे का असं म्हटलं जातं सुवासिनी महिलांनी या ६ गोष्टी कोणाशीही कधीही वाटून घेऊ नये. नाहीतर पश्चातापाची वेळ येते. कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊ या. एकमेकींना काही ना काही देना किंवा एकमेकींशी आपल्या घरातल्या विषयांवर चर्चा करण याचं प्रमाण महिला वर्गामध्ये जास्त पाहायला मिळतं.

अगदी एकमेकींच्या साडी पासून ते काही छोट्या छोट्या गोष्टींपासूनही वस्तू एकमेकींमध्ये शेअर केल्या जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या शेजारणीने किंवा नात्यातील एखाद्या स्त्रीने त्यांना कौतुकाने जर म्हटल तुझ्या कपाळावरील ती टिकली किती छान दिसते आहे. ती तू कुठून घेतली आहे.

त्यांच्या हातातल्या बांगड्या बघून कोणी विचारलं किती छान बांगड्या आहे त्या कुठून घेतला तुम्ही हे असे प्रश्न ऐकून महिला मंडळी नक्कीच खूश होतात. आपल्या वस्तूंची नोंद घेतली जात आहे याचे त्यांना कौतुक वाटत.

या कौतुकाने त्या कधीही हरवूनही जातात आणि आपल्या वस्तू दुसऱ्याला सहज देतात. की लगेच आपण हातातल्या बांगड्या सुद्धा काढून देतो. पण हे कितपत योग्य आहे. हे आपण जाणून घेणार आहोत.

शास्त्रानुसार लग्न झालेल्या महिलांनी काही गोष्टी या इतरांना कधीच देऊ नये. त्यामुळे वैवाहिक संबंध खराब होण्याची दाट शक्यता असते. आणि त्या गोष्टींमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे कपाळाचं कुंकू, किंवा हल्ली आपण टिकली म्हणूया.

आपल्या भारतीय संस्कृतीनुसार कुंकू हेच महिलांचे सर्वात मोठे सौभाग्य मानले जाते. म्हणूनच सुवासिनींनी स्वतः वापरलेले कुंकू दुसऱ्याला कधीही देऊ नये. अर्थात हाच नियम टिकलिला सुद्धा लागू होतो. याउलट कोणी दुसऱ्याला एखादे नवीन कुंकवाची डबी भेट म्हणून देऊ शकता.

त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे तुमच्या विवाहामध्ये तुम्ही घातलेले कपडे- सुवासिनी त्यांच्या लग्न समारंभामध्ये जे काही कपडे घालतात त्यापैकी काही लग्नाचे कपडे असतात. हळदीची पिवळी साडी असेल, किंवा लग्नातला शालू असेल, किंवा पैठणी असेल या गोष्टी इतरांना वापरायला देऊ नये. तसे केल्याने सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण होतात.

त्याच बरोबर काजळ काजळ हे केवळ महिलांचे सौंदर्य वाढवत नाही तर इतरांच्या वाईट नजर पासून त्यांचं संरक्षणही करत असतं अशिक मान्यता आहे. सुवासिनी महिलांनी कधीही ते वापरत असलेले काजळ कोणालाही देऊ नये. त्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात असे सुद्धा म्हटला जातं आणि परिवारात भांडणं होतात अशीही मान्यता आहे.

त्यानंतर महत्त्वाची वस्तू म्हणजे मेहंदी- मेहंदी ला सुद्धा सौभाग्याचे लक्षण मानले जाते. असंही मानलं जातं की मेहंदी जितकी जास्त एखाद्या स्त्रीच्या हातावर रंगते इतकं जास्त त्या सुवासिनीच तिच्या नवऱ्यावरच प्रेम फुलत जात. आणि म्हणूनच मेहंदी सुद्धा इतरांबरोबर शेअर करू नये. अशी एक मान्यता आहे.

आणि आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे बांगड्या आणि पैंजण शास्त्रात म्हटले आहे की, सुवासिनींनी त्यांच्या हातातील बांगड्या आणि त्यांच्या पायातील पैंजण हे इतरांना देऊ नयेत. या गोष्टी सहज इतरांना दिल्या जातात.

एखाद्याकडे मॅचिंग बांगड्या नसतील तर तू माझ्या वापर असे आपण सहज म्हणतो. परंतु हे करणं अयोग्य आहे असं मानलं जातं. आपल्या वस्तूंची काळजी आपणच घ्यायला हवी. आणि आपल्या सौभाग्याच लेण आपणच जपायला हव.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *