घरात झुरळ, मुंग्यांचे प्रमाण अधिक होत आहे. तर नक्कीच करा हा एक उपाय. मच्छर देखील होतील छुमंतर.

Health and Fitness

नमस्कार.

मित्रहो घरात आपण सोडून खुपसे लहान मोठे प्राणी देखील राहत असतात, कधी कधी त्यांची संख्या वाढल्याने घरात वस्तूंची नासधूस होते. घरात झुरळं, पाली, मुंग्या जास्त झाल्यावर त्यांची संख्या कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. तसेच पावसाळ्याच्या दिवसात मच्छरची संख्या देखील वाढते, त्यामुळे घरात सतत आजारपण सुरू होत.

साथीचे रोग येतात, तब्येत सारखी बिघडते. त्यामुळे घरातील वातावरण गंभीर आणि नकारात्मक बनते. या दिवसात सर्वत्र खूप ओलसरपणा जाणवतो, वातावरण खराब असते. घरात किंवा गोठ्यात बुरशीजन्य आजार पाहायला मिळतात. अनेकजण आपल्या घरामध्ये विविध प्रकारचे कॉईल, लिक्विड वापरतात.

पण याच्या धुरामुळे घरातील वयस्कर व्यक्ती, लहान मुलांना त्रास होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही, तो पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे. मित्रहो या पावसाळ्यात आपणाला अनेक प्रकारच्या झाडांना बहर आलेला दिसतो.

असेच एक झाड असते कडुनिंबाचे. हे कडुनिंब आयुर्वेदिक असते याचा अनेक आजारांवर औषध म्हणून वापर केला जातो. मित्रहो आपणाला याच्या लिंबोळ्या ज्या आहेत त्यांची जास्त गरज लागणार आहे. या लिंबोळ्या तोडून घरात आणायच्या आहेत, घरात आणल्यावर या लिंबोळ्या वाळवायच्या आहेत.

वाळल्यावर घरातील उपलब्ध साहित्याच्या मदतीने याचे आपणाला बारीक चूर्ण करायचे आहे. आणखी एक गोष्ट आपणाला लागणार आहे ते म्हणजे कोणतेही कोकोनट तेल, हे तेल उपलब्ध साहित्यामध्ये म्हणजेच कोणतीही कढई असेल तर त्यामध्ये तीन चमचे टाकायचे आहे.

त्यामध्ये आपण बारीक केलेले चूर्ण टाकायचे आहे. त्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे आहे. ते गरम झाल्यावर पुन्हा दोन चमचे कोकोनट तेल टाकायचे आहे. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे कढवून घ्यायचे आहे. कढल्यावर ते तेल थंड करण्यासाठी ठेवायचे आहे. त्याला थंड केल्यानंतर ते गाळून घ्यायचे आहे.

या तेलात अँटी सेप्टिक, अँटी फंगल असणार आहे जे वातावरण शुद्ध ठेवण्यास मदतशीर असते. सोबतच या तेलाचा गंध घरात असणारे कीटक व मच्छर यांना सहन होत नाही व त्यामुळे घरात मच्छर, कीटक अजिबात थांबत नाहीत. या तेलाचा दिवा मित्रहो सायंकाळी सात, साडे सातच्या दरम्यान लावावा. सायंकाळच्या वेळेस मच्छर घरामध्ये जास्त असतात.

हा दिवा संध्याकाळी लावल्याने हे येणारे मच्छर दिव्यातून निघणाऱ्या गंधामुळे परत येणार नाहीत. त्यांना तो गंध अजिबात सहन न झाल्यामुळे त्यांना त्रास होईल व त्यामुळे ते निघून जातील व आपला त्रास देखील कमी होईल. तसेच याचा कोणताही वाईट परिणाम वयस्कर व्यक्तींवर किंवा लहान मुलांवर होणार नाही.

मित्रहो तुम्ही हा उपाय एक दिवस नक्की करून पहा, तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *