धनु रास- जून महिन्यात या घटना तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

धनु ही राशिचक्रातील नववी रास आहे. धनु राशीच बोधचिन्ह म्हणजे आर्ध पुरुष म्हणजेच ज्याचं आर्ध शरीर घोड्याच आहे. याचा अर्थ असा होतो की मानवी बुद्धी अफाट असून घोडा म्हणजे शारीरिक कष्ट करण्याची अफाट ताकद सुद्धां या राशीमध्ये आढळते. त्याला आता बघूया या राशीला हा महिना कसा जाणार आहे.

या महिन्यात तुमच्या कुटुंबात काही आनंददायी गोष्टी घडतील ज्यामुळे सर्वांचेच मन प्रसन्न होईल. कुटुंबातील सदस्यांचा तुमच्यावरील विश्वास आणखीन वाढेल. आणि तुम्ही तुमच्या बोलण्याने सगळ्यांनाच प्रभावित कराल.

आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी मात्र घ्यावी लागेल. कारण दोघांपैकी कोणाचे तरी आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तुम्हाला भावंडांचे सुद्धा पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्याकडून तुम्हाला मदतही मिळेल.

जर तुम्ही त्यांच्याशी एखाद्या गोष्टीवर रागवले असाल तर या महिन्यांमध्ये नाराजी संपेल. आणि दोघांमध्ये परस्पर प्रेम ही वाढेल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून विचार करता या महिन्यात तुम्हाला फायदाच फायदा होईल. परंतु त्याचबरोबर नवीन शत्रू देखील तयार होऊ शकतात. जे व्यवसायामध्ये तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.

त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आणि कोणताही व्यावसायिक निर्णय जाहीरपणे बोलणे टाळा. सरकारी अधिकाऱ्यांना या महिन्यांमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज आहे. खाजगी नोकरी करणाऱ्यांना ही त्यांच्या कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावे लागेल. अन्यथा त्यांना नुकसान सहन करावे लागेल.

यावेळी तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर चांगले होईल. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. परंतु अशा वेळी त्यांचे लक्ष पूर्वक ऐका कारण ते भविष्यात तुमच्‍यासाठी उपयुक्‍त ठरेल. शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना या महिन्यात कमी कष्टातही चांगले फळ प्राप्त होणार आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात अनेक क्षेत्रातून संधी मिळतील. पण तुमच्या दुर्लक्षामुळे त्याही तुमच्या हातातून निष्टू शकतात. त्यामुळे जरा आपल्या आजूबाजूला लक्ष द्या. जर तुम्ही एखाद्या बरोबर प्रेमसंबंधात असाल तर या महिन्यात कोणीतरी तुमच्या नात्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.

अशा परिस्थितीमध्ये पटकन कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका आणि फसन टाळा. वैवाहिक व्यक्तींचे कोणाशी तरी जमण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. जर तुमचं लग्न होऊन काही काळ झाला असेल. तर तुम्हाला तुमच्या जीवन साथी कडून शुभ संकेत मिळतील.

तुमच्या दोघांमधील घरातील रणनीती बद्दल फुल चर्चा होईल. आणि दोघांमधील संबंध पूर्वीपेक्षा घट्ट बनतील. लग्नाची वाट पाहणार्‍यांना सुद्धा चांगल्या बातम्या मिळू शकतात. या महिन्यात तुमच्याबरोबर काही अप्रिय घटना सुद्धा घडू शकते. शनी तुमच्या आरोग्यावर भारी आहे. त्यामुळे जिने चढताना किंवा जड वस्तू उचलताना काळजी घ्या.

शनी देवाचा प्रकोप कमी करण्यासाठी शनिवारी तिळाचे दान करा. या महिन्यात मानसिक त्रास होणार नाही. त्याचबरोबर महिन्याच्या मध्यात झोप न लागण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे काही काळ तणाव असेल. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी झोपताना थोडं ध्यान करण्याची सवय लावा.

जून महिन्यामध्ये धनु राशीचा भाग्यशाली अंक असेल ३ आणि भाग्यशाली रंग असेल मरून. सगळ्यात महत्त्वाचं या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि मुख्यतः तुमच्या शरीराची व विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच काळजी घेतली आणि चुकीचे काम केले नाही तर तुमचे आरोग्य चांगले राहील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *