या ४ राशीच्या लोकांचा बॉसशी असतो ३६ चा आकडा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ऑफिसमध्ये तुम्ही बॉस सोबत पंगा घेता का. म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने का होईना पण तुमचं तुमच्या अधिकारी वर्गाची भांडण होतं का. किंवा खटके उडतात का किंवा अगदीच पटत नाही मतभेद आहेत का. असे असेल तर याला कारण तुमची रास सुद्धा असू शकते.

कारण ज्योतिषशास्त्रात बारा राशींच्या वर्णन केले गेले आहे. आणि त्यानुसार राशींचे स्वभाव वैशिष्ट्ये आणि उणिवा सुद्धा सांगितल्या आहेत. ज्योतिष शास्त्रात अशा काही राशी आहेत ज्यांना कामाच्या ठिकाणी अधिकारी किंवा सहकार्‍यांसोबत जमवून घेताना समस्या येतात.

कोणत्या आहेत त्या राशी आणि मग यावर उपाय काय हे सगळे आज आपण पाहणार आहोत. मंडळी कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गासोबत होणारा मतभेद किंवा न पटणं या सगळ्या गोष्टी मागे अनेक कारणे असतात. आणि ती कारण तुमच्या राशीनुसार वेगवेगळी असू शकतात.

मेष रास- मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप लवकर राग येतो. अनेक वेळा या राशीचे लोक कामाच्या ठिकाणीही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. या लोकांना स्वतःच्या अटींवर काम करायला आवडत. याच कारणामुळे कधी कधी त्यांचा बॉस आणि इतर सहकाऱ्यांशी त्यांच जुळत नाही.

त्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरं जावं लागतं. मेष राशीच्या लोकांच्या स्वभावाचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही लोक स्वतःच्या कामांमध्ये अगदी पर्फेक्ट असतात. तसेच वेळेवर काम पूर्ण करणारी असतात. यांना कामात दिरंगाई अजिबात चालत नाही. आणि याउलट समोरची व्यक्ती जर कामांमध्ये ढिली ढाली असेल तर मात्र मग विचारायलाच नको.

यांचा होणारा तोंड दाबून बुक्क्याचा मार यांना बिलकुल सहन होत नाही. आणि मग यांचा राग समोरच्यावर निघतो. पण यावर उपाय सुद्धा आहे. नियमितपणे सूर्याला अर्घ्य द्यावे. याशिवाय हनुमान चालीसाचे पठण ही मेष राशीच्या लोकांनी नियमित करावं. ते त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात.

वृश्चिक रास- वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. अनेक वेळा या लोकांमध्ये त्यांच्या बॉस विरोधात सुडाची भावना दिसून येते. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामावर नीट लक्ष केंद्रित करता येत नाही. आणि मग त्यांचं कामही वेळेवर पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

स्वतःमध्ये सूडाची भावना असल्याने काही वेळा त्यांना अधिकार्‍यांची नीट समन्वय साधता येत नाही. अशा परिस्थितीत मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करणे आणि कोणतीही गोष्ट मनात ठेवून बसण्याची वृत्ती सोडून आवश्यक आहे. यासाठी उपाय म्हणजे तुम्ही सुद्धा हनुमान चालीसाचे पठण करायला हवे.

धनु राशी- धनु ही गुरूची रास आहे. या राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात. परंतु या लोकांना अनेक गोष्टींचा पटकन राग येतो. आणि काही वेळा ते आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी ही नीट समजून घेत नाहीत. स्वतःला श्रेष्ठ समजू लागतात.

या स्वभावामुळे या लोकांना नोकरीमध्ये वारंवार बदल करावे लागतात. यासाठी सुद्धा उपाय आहे. रविवारच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूना धुप दीप दाखवा. याशिवाय सूर्य चालीसाचा सुद्धा पठण तुम्ही करू शकता.

मकर रास- ही शनिची रास आहे. तसेच सूर्य आणि शनी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या अधिकारी किंवा बोसशी चांगले संबंध ठेवण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात. जर एखाद्याच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती योग्य नसेल तर ते आपल्या जोडीदाराशी देखील सुसंवाद ठेवू शकते.

त्यासोबतच या राशीचे लोक एकांतातही राहण्याचा प्रयत्न करतात. आणि अचानक रागवतातही. यांच्यासाठी सुद्धा उपाय आहे. आणि तो म्हणजे शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं. याशिवाय सूर्योदयाच्या वेळी सूर्याला दीप दाखवावा. याशिवाय सोमवारी गाईला गूळ आणि हरभरा खाऊ घालावा.

मित्रांनो कुठलाही उपाय तुम्ही करा पण तो नियमित करणे महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा. एक दिवस करून तुम्हाला कुठलाही फरक जाणवनार नाही. जो काही उपाय कराल तो रोज नित्यनेमाने ठराविक वेळेला करा. नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *