राधा आणि कृष्णाचे लग्न कोणत्या कारणाने मुळे नाही झाले?

Astrology

नमस्कार मित्रांनो.

जेव्हा जेव्हा खऱ्या प्रेमाची व्याख्या केली जाते तेव्हा राधा कृष्णाचे नाव घेतलं जात नाही असं शक्यच नाही. खऱ्या प्रेमाची व्याख्या त्याशिवाय पूर्ण होत नाही. पण जर खऱ्या प्रेमाची पूर्तता लग्नात असेल तर मग राधा आणि कृष्णाची एकाच मंदिरात पूजा झाली नसती नाही का?

आपण सगळेजण लहान असल्यापासून राधा-कृष्णाच्या प्रेमाच्या कथा ऐकतच मोठे झालेलो असतो. प्रेम कसा असाव तर राधाकृष्ण सारखा असाव अस आपल्या मनामध्ये ठसलेल असत. पण आपल्याला कळत की राधा आणि कृष्ण यांचे लग्न झालं नव्हतं.

तेव्हा मात्र आपल्याला आश्चर्य वाटतं. मनात अनेक प्रश्न उभे राहतात की त्यांचं प्रेम होतं तर त्यांनी एकमेकांशी लग्न का केलं नाही. काय कारण आहे त्यामागे चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार भगवान श्रीकृष्णांनी एकदा सांगितलं होतं. की आपण आपल्याच आत्म्या सोबत विवाह कसा करु शकतो.

अर्थात राधाकृष्णन हे इतके एकरूप झालेले होते की त्यांचा अस्तित्व एकच होतं. लग्न करण्यासाठी दोन लोकांची गरज असते. मग अशा परिस्थितीमध्ये दोघांचा विवाह एकत्र कसा होऊ शकतो. खऱ्या प्रेमाचा अर्थ त्या व्यक्तीला मिळवणे असा नसतो. असा संदेशच जणू काही त्यांना द्यायचा होता. राधा कृष्णाचे प्रेम निर्मळ होतं ज्यात वासनेला थारा नव्हता.

त्यांचं लग्न झालं नाही परंतु त्यांचा दिव्य प्रेम हे आध्यात्मिक आहे. राधेच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांनी भक्तिमार्ग संपूर्ण जगाला दाखवून दिला. भक्तीने सुद्धा तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचता येतं हे भगवान श्रीकृष्णांनी आणि राधेने दाखवून दिलं. ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप मोठं तपश्चर्या व्रतवैकल्य करण्याची गरज नाही. मनापासून प्रेम केलं तरी तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचता.

हे राधेच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण जगाला दाखवून दिल. ईश्वरही प्रेमाचा भुकेला असतो देव तुमच्या मनातला भावच बघतो. जगाला खरं प्रेम काय आहे ते समजावं. प्रेमाला नातं ओढ असण्याची गरज नसते. हे सुद्धा त्यांनी सांगितलं. प्रेममय भक्तीद्वारे तुम्ही ईश्वराला प्राप्त करू शकतात हे राधेने संपूर्ण जगाला दाखवले.

मंडळी राधा कृष्णाचे लग्न का झालं नव्हतं हे सांगणार्‍या अनेक कथा आहेत. त्यापैकीच एक कथा म्हणजे व्रिघौऋषीची कथा आहे. ऋषींच्या एका पत्नीने एकदा असुरांना घरांमध्ये लपण्याची जागा दिली. आणि त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूना त्यांचा वध करावा लागला. पत्नीचा झालेला वध पाहून त्यांनी श्रीहरी विष्णूना शाप दिला की प्रत्येक जन्मांमध्ये त्यांना प्रेमाचा विरह सहन करावा लागेल.

अनेक जण असही सांगतात की राधाकृष्ण यांचा विवाह न होण्यामागे श्री धामाचा शाप सुद्धा कारणीभूत होता. श्री धाम हा कृष्णाचा जवळचा मित्र आणि भक्त होता. त्यांना असं वाटत होतं की कृष्णाच्या आधी राधेचे नाव का घेतलं जातं त्यामुळे त्यांनी राधेला विसरण्याचा शाप श्रीकृष्णांना दिला होता. काही पौराणिक कथांनुसार राधा कृष्णा पेक्षा पाच वर्षांनी मोठी होती.

दोघांमध्ये मैत्री होती. लग्नही करणार होते. पण तेव्हाच गर्ग ऋषींनी श्रीकृष्णाला घेऊन त्याच्या जन्माचा उद्देश सांगितला. धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे याची आठवण करून दिली. आणि त्यानंतर श्रीकृष्ण आपल्या जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी मथुरेकडे निघाले. आणि राधा मागेच राहिली.

परंतु राधे विषयीचा प्रेम त्यांच्या मनात कायम राहील. पण त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिल. कदाचित मनुष्याने प्रेमाचाही आदी कर्तव्याला प्राधान्य द्यायला हवं हाच संदेश त्यांनी मनुष्यजातीला दिला.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *