मकर रास मे महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मकर ही राशिचक्रातील दहावी रास असून तिचे बोधचिन्ह आहे सिंह वाला बोकड. मित्रांनो हिंदू पुराणांमध्ये मकर हा जलप्राणी असल्याचाही उल्लेख आहे. या प्राण्याचा पुढचा भाग बकऱ्या सारखा आणि मागचा भाग एखाद्या मासा किंवा मगरी सारखा आहे. मगर हा अतिशय सुस्त पडून राहणारा प्राणी आहे.

परंतु तितक्याच ताकदीने आपल्या शिकारीवर तुटून पडणारा. शिकारीची वाट बघत अगदी कितीही वेळ वाट पाहणारा हा स्वभाव मकर राशीच्या मंडळींमध्ये ही दिसून येतो. या राशीचे लोक पूर्ण यश मिळत नाही तोवर प्रयत्न आणि चिकाटी कधीही सोडत नाहीत. एकदा यश शेवटच्या मार्गावर आलं की त्याच्यावर हल्ला करून ते यश आपल्या पदरात पाडून घेण यांना चांगल जमत.

त्यामुळे बऱ्याचदा नियती त्यांच्या या संयमाची परीक्षा घेत असते. असं त्यांच्या आयुष्यातील प्रसंग पाहून वाटायला लागतं. मित्रांनो यांना यांच्या मेहनतीच फळ पुरेपूर मिळत. मकर या राशीचा स्वामी ग्रह आहे शनी वर्ण वैश्य आणि तत्व पृथ्वी असल्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोन अत्यंत उत्तम हा सर्व वेद बंद आहे.

वेळेचा आणि पैशाचा व्यवस्थापन करण्यात ही मंडळी अतिशय हुशार असतात. कष्ट करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. अत्यंत कष्ट आणि मेहनती लोकांची ही रास आहे. यश मिळवण्यासाठी सतत धडपडत राहणं हेच ते मंडळी असतात. राशीचा स्वामी ग्रह शनी असल्यामुळे मेहनतीचे फळ बऱ्याचदा उशिरा मिळताना दिसत.

कारण शनी म्हणजे उशिरा मिळणारे यश. पण यांच्या उत्तर वयात यांना सुखाचे दिवस येताना दिसतात. मकर राशीचे मंडळी नियोजनात तरबेज असतातच. शिवाय चांगला सल्लागार म्हणून यांची ओळख आहे. नोकरी करूनही हे एखाद्या छोटा व्यवसाय करण्याची त्यांची तयारी असते. किंबहुना नोकरीपेक्षा व्यवसायाकडे यांचा फार कल असतो.

त्याचबरोबर एकापेक्षा अनेक व्यवसाय करण्याची क्षमता यांच्या मध्ये सर्वात जास्त असते. मकर राशीच्या व्यक्तींची तूळ मिथुन कन्या भविष्यवाणी कुंभ राशीच्या व्यक्तीशी मैत्री होते. कर्क सिंह आणि वृश्चिक या राशींशी यांचे फारतर पटत नाही. मे महिन्यात जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची काही मतभेद होत असतील तर तरी या महिन्यात हे छोटे वाद मिटतील.

कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबातील सर्व सदस्यांनी मध्ये स्नेह आणि आई-वडिलांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून शुभ संकेत ही मिळू शकतो. भावंडं प्रती तुमचे प्रेम अधिक वाढेल. या महिन्यात पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आणि त्यांना योग्य वेळी आहार द्या.

त्यांच्या खेळकरपणामुळे तुम्हाला आनंद होईल. व्यवसायाच्या क्षेत्रात हा महिना चांगला जाईल. आणि तुमची दिवसेंदिवस प्रगती होईल. या दरम्यान काही नवीन शत्रू तयार होऊ शकतात. जे तुमचं नुकसान करू शकतात. त्यामुळे सदैव सजग आणि सतर्क राहा. आणि आपल्या आजूबाजूला विशेष लक्ष ठेवा.

जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. नोकरी करणाऱ्या लोकांना या महिन्यात काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या जास्त ताणामुळे तुम्ही तणावात राहू शकता. यादरम्यान ऑफिसमध्ये तुमच्याविषयी चुकीची छापही पडू शकेल. यामुळे तुम्हाला त्रास होईल.

त्यामुळे नेहमी सहजतेने काम करा. या महिन्यात तुमचे तुमच्या जोडीदाराशी काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. आणि परस्पर भांडणे समोर उघड होऊ शकतात. अशा वेळी मन मोकळेपणाने बोलले तर प्रश्न सुटू शकतील. नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल.

लग्नासाठी स्थळ शोधत असाल तर या महिन्यात तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. कुठून तरी चांगलं नातं येईल आणि ते सगळ्यांना आवडेल. अशा परिस्थितीत घाई टाळा आणि विचार करूनच निर्णय घ्या. या महिन्यात तुम्ही निरोगी राहाल परंतु आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे.

जर तुम्ही जड वस्तू उचलत आहात तर काळजी घ्या. कारण मणक्याच्या समस्या उद्भवू शकतात. मणक्याची काळजी न घेतल्यास आणखी त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे हे आधी लक्षात ठेवा. मानसिक दृष्ट्या तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल. आणि कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाही. दररोज तुम्हाला स्वतः मध्ये एक नवीन ऊर्जा मिळेल. त्यानुसार काम करा.

मे महिन्या साठी मकर राशीचा भाग्यशाली अंक ३ असेल. त्यामुळे या महिन्यात ३ अंकांना प्राधान्य द्या. आणि मे महिन्यासाठी मकर राशीचा शुभ रंग मरून असेल. तसेच या महिन्यात तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण तुम्ही जे बोलता त्यांना टोचू शकते.

ते मनावर घेऊ शकतात पण तुम्हाला सांगणार नाहीत. म्हणून तुम्हाला याची आधीच माहिती असायला पाहिजे. अस असणार आहे मकर राशीसाठी या महिन्यातील राशिभविष्य.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *