मेष रास एप्रिल महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मेष ही राशीचक्रातील पहिली रास असून मंगळ हा या राशीचा स्वामी ग्रह आहे. या राशीचं बौद्ध चिन्ह आहे ते म्हणजे मेंढा. अंगामध्ये प्रचंड ताकद आणि कुठेही धडक मारायला तयार असणारा प्राणी आयुष्यात भरभराट करून घेण्यासाठी वाटेल ते करायची तयारी या राशीच्या लोकांना असते.

पण खांद्यावर जबाबदारीचं ओझं आल्यावर यांची खऱ्या अर्थाने प्रगती व्हायला लागते. नाहीतर बर्याचदा विश्रांती मध्येच सुख मानणारी ही रास आहे. व्यापारामध्ये जास्त सहभागी होणारी तसेच कला क्षेत्रामध्ये विशेष रमणारी ही रास आहे. कलेची दृष्टी यांना अगदी निसर्ग ताच असते.

पृथ्वी तत्त्वाची ही रास असल्यामुळे आपला निर्णयावर बऱ्यापैकी ही मंडळी ठाम असतात. चला तर मग बघुया एप्रिल महिना मेष राशीसाठी कसा असणार आहे. हा महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी आव्हानात्मक असणार आहे. एप्रिल महिन्यातील बहुतेक वेळ तुमचा नातेवाईकांच्या पाहुणचारात जाईल.

नातेवाईकांच्या घरी ही जावे लागेल. महिन्याच्या मध्यात घरातील वातावरण अध्यात्मिक राहण्याची संकेत आहेत. तिसऱ्या आठवड्यामध्ये घरामध्ये काही धार्मिक विधी देखील होऊ शकतात. भाऊ किंवा बहिणी पैकी जर कोणी नोकरी करत असेल तर त्यांच्या नोकरीत संकट येऊ शकत.

अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन द्या आणि वाईट बोलणं टाळा. काही जुन्या प्रकरणातून कुटुंबात वाद असतील तर ते मिटतील. घरातील गोष्टी घराबाहेर बोलणे टाळा. अन्यथा तुमचे शत्रू त्याचा फायदा घेऊ शकतात. जर तुम्ही एखाद्या सोबत भागीदारीत व्यवसाय करत असाल. तर वर्षातील हा महिना तुमच्यासाठी शुभ असणार आहे.

असे काही करार होतील की ज्याचे शुभ परिणाम तुम्हाला भविष्यात होणार आहेत. अशा वेळी सतर्क मात्र राहण्याची गरज आहे. कारण कोणतीही संधी तुम्ही हातातून जाऊन द्यायची नाहीये. अन्यथा विरोधक ही संधी तुमच्या कडून हिरावून घेऊ शकतात.

नोकरी करणाऱ्या लोकांना ही त्यांच्या बॉस कडून या महिन्यात प्रोत्साहन मिळणार आहे. तुमचे सहकारीही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. सरकारी नोकरी करत असाल तर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सावधगिरी बाळगा कारण विरोधक नुकसान करण्याच्या प्रयत्नात आहेत.

पैसे कुठे गुंतवले असतील तर त्यावरही लक्ष ठेवा. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नफा मिळण्याची चिन्हे आहेत. जर तुम्ही संगीत किंवा कलेच्या क्षेत्रात काम करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठ्यांचे सहकार्य मिळण्याचे संकेत आहेत.

अशा परिस्थितीत उत्तेजित होणे टाळा आणि विचार करून निर्णय घ्या. जर तुम्ही कोणत्यातरी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या तयारीत आहात. तर या महिन्यात तुम्हाला त्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातील हा काळ शुभ आहे. जे शिक्षक हो तुम्हाला मार्गदर्शन करतील.

त्यांच्याकडून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. शालेय विद्यार्थ्यांचे मात्र या काळात अभ्यासात कमी लागेल. जर तुमचं लग्न होऊन जास्त दिवस झाले नसतील तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत नात्यात थोडा दुरावा येऊ शकतो.

या गोष्टीचा तुम्हाला थोडा त्रास होईल पण तुम्ही त्यांना सांगू शकणार नाही. यांच्या लग्नाला ५ वर्षाहून जास्त काळ झालेला आहे. त्यांना एकमेकांना चांगल्या प्रमाणात समजून घेण्यास वेळ भेटेल. जर तुम्ही एखाद्या सोबत प्रेम संबंधांमध्ये आहात तर कोणीतरी तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करेल. पण तुम्ही त्याबद्दल निष्काळजी राहू नका.

अशा परिस्थितीत प्रियकरावर विश्वास ठेवा. लग्नाच्या प्रतीक्षेत असलेले लोकं या महिन्यात निराश होऊ शकतात. जर तुम्हाला आधीच गंभीर आजार झाला असेल तरी या महिन्यात तुम्हाला डॉक्टरांच्या संपर्कात राहणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु मानसिक तणाव राहू शकतो.

अशा स्थितीत सकाळी योगासने आणि प्राणायाम करण्याची सवय लावा. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात झोपेची कमतरता तुम्हाला सतावू शकते. यासाठी झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करणं आवश्यक आहे. याचे चांगले परिणाम मिळतील. एप्रिल महिन्यात मेष राशीचा भाग्यशाली अंक असेल ५ आणि भाग्यशाली रंग असेल पिवळा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *