अशा असतात कुंभ राशीच्या व्यक्ती. मे पासून वाऱ्याच्या वेगाने धावणार यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज बघूया कुंभ राशि बद्दल. कशी असते कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो. त्यांची प्रगती कधी होते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कुंभ राशीचे लोक दिसायला सावळी असतात. म्हणजे एकदम असा गोरा रंग यांचा नसतो. दिसायला शारीरिकदृष्ट्या सुदृढ असतात. आणि रेखीव अशी आकृती असते.

या लोकांचा पोठरीवर एखादी जन्मखून असू शकते किंवा एखाद्या जखमेमुळे सुद्धा खुन होऊ शकते. कुंभ राशी ही स्थिर स्वभावाची रास आहे. स्थिर रास असल्यामुळे त्यांच्या निर्णयावर ही लोकं ठाम असतात. म्हणजे या लोकांची मतं कोणीही बदलू शकत नाही.

या लोकांचे मन वळवणे सुद्धा कठीण असत. कुंभ राशीची लोकल सर्वांचे ऐकून घेतात. म्हणजेच ऐकावे जनाचे करावे मनाचे अशी ही लोक असतात. त्यामुळे यांची मतं कोणीही बदलू शकत नाही.स्थिर स्वभावाचे असल्यामुळे यांचे आकलन शक्तीसुद्धा चांगली असते.

म्हणजे एखाद्या गोष्टीचं बारीक निरीक्षण करून योग्य तो निष्कर्ष यांना चांगला काढता येतो. आयुष्यात काय पाहिजे काय करायचा आहे. हे यांचं खूप ठाम असतं ते स्वतःचा मार्ग निवडताना कोणताही भ्रम ठेवत नाही. कुंभ राशीचे लोक हे तमोगुणी असतात. थोडेसे आळशी किंवा अंधश्रद्धाळू असू शकतात.

ही लोक स्वतःच्या भावना पटकन व्यक्त ही करत नाही. कुंभ राशीचे लोक आपल्या भावना लपवतात. असंही म्हटलं तरी चालेल. किंवा कधीकधी भावना योग्य प्रकारे युक्त ही करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान सुद्धा होऊ शकते. कुंभ रास हि वायुतत्वाची रास आहे.

वायुतत्वाची रास असल्यामुळे ही लोक अर्थात हुशार असतात बुद्धीसुद्धा तल्लख असते. कुंभ राशीचे शिक्षक हे पुस्तक हातात न घेता सुद्धा ते उत्तम शिकवू शकतात. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर पुस्तकात न बघता देऊ शकतात. कुंभ राशीचा स्वामी हा शनि आहे.

त्यामुळे सेवाभावी वृत्ती या लोकांची असते. तसेच या लोकांच्या आयुष्यात संघर्ष सुद्धा खूप असतो. हाच संघर्ष करत ही लोकं परिस्थिती सावरतात. नीतिमत्ता यांची खूप चांगली असते. नाती सुद्धा छान जपतात. पण कोणालाही डोक्यावर चढवून ठेवत नाही.

कुंभ राशीचे लोक जरा सुंदरतेला कमी महत्त्व देतात. म्हणजेच आपला जोडीदार सुंदर नसला तरी चालेल. पण बौद्धिक पातळीवर चांगला असला पाहिजे. कसं यांचं म्हणणं असतं. कुंभ राशीचे लोक वक्तशीर असतात. तसेच जेवण वगैरे लवकर करतात. कुंभ राशीच्या लोकांना कपट राग मत्सर या गोष्टी अजिबात आवडत नाही.

भावनांपेक्षा थोडी प्रॅक्टिकल वृत्ती यांची जास्त असते. वर्तमानावर जास्त लक्ष देतात. जर कुंभ राशीच्या व्यक्तींचा मागे जर कोणी कटकारस्थान करत असेल किंवा खोटं वागत असेल किंवा लपवत असेल काही त्यांच्यापासून. तर त्यांना ते पटकन समजत.

तुमच्या आयुष्यात कुंभ राशीची व्यक्ती असेल तर यांच्या मागून काहीही करताना काळजी घ्या. या लोकांचा स्वभाव चौकस असल्यामुळे यांना कधीही कोणीही पटकन फसवू शकत नाही. हे यांचे वैशिष्ट्य. ही लोकं वायफळ बडबड ही करत नाही. स्पष्ट बोलणारी अशी ही रास आहे.

पण कोणाच्याही चुका काढून कोणालाही दुखवत नाही. सगळ्यांचं ऐकून घेतात पण मनाला पटेल तेच करतात ‌. कुंभ रास हुशार बुद्धिमान प्रॅक्टिकल आणि भावनांमध्ये तलारी रास आहे. थोडीशी हट्टी किंवा हेकेखोर हसतात ही लोक. मग मंडळी तुमच्या घरात आहे का कोणी कुंभ राशीची व्यक्ती आणि तुमचा अनुभव कसा आहे.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *