३० एप्रिल २०२२ सूर्यग्रहण या ३ राशींना मिळू शकतो जबरदस्त पैसा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मात सूर्य आणि चंद्र ग्रहण आला विशेष महत्त्व आहे. आणि तसेच ज्या दिवशी सूर्यग्रहण असतं त्यादिवशी अनेक नियम पाळले जातात. यावर्षी २०२२ मध्ये दोन सूर्यग्रहण होतील. ३० एप्रिल च्या मध्यरात्री वर्षातील पहिलं सूर्यग्रहण सुरू होत आहे.

मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे कोणतेही नियम पाळले जाऊ नयेत. असं सुद्धा सांगण्यात येत आहे. मात्र हे सूर्यग्रहण अर्धवट असेल. हे ग्रहण मध्यरात्री १२:१५ मिनिटांनी सुरू होईल. आणि पहाटे चार वाजेपर्यंत चालेल. तसेच ग्रहण मेष राशीत होणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे.

त्यामुळे या ग्रहणाचे महत्त्व वाढते. वैदिक दिनदर्शिकेनुसार मगाशी म्हटल तस भारतात अदृश्यच राहील. इथे दिसणार नाही त्यामुळे सुतक काळ मानला जाणार नाही. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या नैर्ऋत्य भागात प्रशांत महासागरावर अटलांटिक आणि दक्षिण ध्रुवावर दिसणार आहे.

पण अर्थातच या ग्रहणाचा प्रभाव राशींवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा ग्रहण होतं तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर हा होतच असतो. पृथ्वीवर होतो त्यामुळे मानवी जीवनावर होतो.

त्यामुळे या ग्रहणाचा काही ना काही प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण तीन राशी अशा आहेत की ज्यांच्यासाठी हे ग्रहण फायदेशीर ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या तीन राशी. ग्रहणाचा चांगला परिणाम होणारी पहिली रास आहे वृषभ रास.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण लाभदायक ठरू शकतो. सूर्यग्रहणा मुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो तसेच रखडलेली कामे ही करता येतील. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. यावेळी तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. तसेच तुमच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

कर्क रास- हे ग्रहण तुमच्या साठी सुद्धा फायदेशीर ठरू शकत. तसेच या काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुमची प्रतिमा चांगली राहू शकते. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल.

तसेच कामाच्या ठिकाणी तुमची कार्यशैली सुद्धा सुधारु शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रशंसा मिळू शकते. त्याचबरोबर तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य सुद्धा मिळेल. तुम्ही नवीन योजनांवर काम करू शकता.

धनु रास- सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळू शकत. तसेच भागीदारीचे काम फायदेशीर ठरू शकते. त्याबरोबरच जोडीदार बरोबरचे संबंध मधूर होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. या काळात तुमची ताकदही वाढेल. गुप्त शत्रूंचा नाश होईल. धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे.

त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि सूर्य मित्र आहेत. त्यामुळे हे ग्रहण तर तुमच्यासाठी फायदेशीरच असणार आहे. तर मंडळी ह्या होत्या त्या तीन राशी ज्यांना ग्रहणाचा फायदा होईल.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *