नमस्कार मित्रांनो.
वेदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह इतर कोणत्याही ग्रहाशी युती करतो त्यावेळी त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. देवतांचे गुरु बृहस्पति आणि मानवांचे गुरु शुक्राचार्य यांचीसुद्धा युती होणार आहे. आता हे दोन शत्रू ग्रह आहेत. त्यांची युती होणार आहे.
ज्योतिष शास्त्रात गुरु हा ज्ञान आणि बुद्धीचा कारक मानला जातो तर शुक्र हा ग्रह धन वैभव आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. त्यामुळे हा योग ज्योतिषशास्त्राच्या नुसार महत्त्वाचा मानला जातो. तर पाहूया हा योग कधी आहे कोणत्या राशीला या योगाचा फायदा होऊ शकतो.
मित्रांनो वैदिक कॅलेंडरनुसार शुक्राची युती मीन राशीत होणार आहे. देवगुरु बृहस्पती आधीच मीन राशीत आहेतच आणि आता २७ एप्रिल ला शुक्र सुद्धा या राशीत प्रवेश करणार आहे. २७ एप्रिल ते २३ मे पर्यंत गुरु शुक्र या दोन ग्रहांची युती असेल. आणि तीसुद्धा मीन राशीत. याचा फायदा मात्र ३ राशींना होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया.
वृषभ राशी- गुरु आणि शुक्र ची जोडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण की ही युती तुमच्या गोचर कुंडली तून सहाव्या घरात तयार होईल. ज्याला उत्पन्न आणि मिळकतीचे ठिकाण म्हणतात. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. धनाच्या आगमनाचे संकेत आहेत.
त्यामुळेच उत्पन्नाचे नवे स्रोत ही तयार होतील. व्यावसायिक जीवनात चांगले यश मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. त्यामुळे शुक्राची विशेष कृपा तुमच्यावर होईल.
मिथुन राशी- तुमच्या गोचर कुंडलीत दशम भागात गुरु आणि शुक्राची युती तयार होईल. याला कार्यक्षेत्र आणि नोकरीची जागा म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
तसेच तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती किंवा वेतन लाभही मिळू शकतो. या काळात व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार ही होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
कर्क राशी- गुरु आणि शुक्राची युती कर्क राशीच्या लोकांच्या नवव्या भागात होईल. ज्याला भाग्यस्थान आणि परमस्थान असे म्हणतात. अर्थात परदेश प्रवासाचे स्थान देखील म्हणतात. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यासह प्रलंबित कामे देखील मार्गी लागतील.
व्यवसायात अडकलेला करारही अंतिम टप्प्यात येऊ शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. वाहन सुख मिळण्याचे देखील दाट शक्यता आहे. उत्पन्नात चांगली लक्षणीय वाढ दिसून येईल. जे स्पर्धक विद्यार्थी आहेत. त्यांनासुद्धा नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
म्हणजेच ते कोणत्याही स्पर्धात्मक खेळामध्ये यश मिळू शकतात. मंडळी थोडक्यात काय तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो ना तसंच काहीसं हे झाल अस म्हणायला हरकत नाही.
दोन शत्रू ग्रह एका एकाच ठिकाणी येत आहेत आणि त्याचा लाभ मात्र या तीन राशींच्या लोकांना होत आहे. म्हणून या तीन राशींमध्ये तुमची रास आहे की नाही ते पहा.
तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद