नमस्कार मित्रांनो.
मीन राशी म्हणजे शेवटची रास. म्हणजे बारावी रास असून या राशीचे बोधचिन्ह विरुद्ध दिशेला तोंड असणारे दोन मासे. मासे सौंदर्य आणि शांततेचे प्रतीक मानले जातात. परंतु विरुद्ध दिशेला तोंड करून पोहणारे म्हणजेच स्वभावातील विरोधाभासाच प्रतीक आहे.
ज्याला आपण द्विधा मनस्थिती असे म्हणतो. मानवी स्वभाव हा फार अनाकलनीय आहे. आपले सुविचार बऱ्याचदा आपल्यालाच पटत नाहीत. सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी आपल्याला योग्य वाटत नाही मग आता विचार करा. दुसऱ्याचे विचार कसे पटतील. अशा काही स्वभावाचे मीन राशीची मंडळी असतात.
शुभ्र हा या राशीमध्ये उच्च राशीचे फळ देतो. म्हणजे सौंदर्य कला यामध्ये यांना अतिशय रस असतो. किंबहुना करिअर सुद्धा चांगलं करतात. या राशीचा स्वामी ग्रह पूर्व आहे. ब्राह्मण वर्णाची ही राशी असल्यामुळे उच्च शिक्षण घेण्याकडे यांचा विशेष कल असतो. स्वतः शिकायचं आणि दुसऱ्यांना देखील शिकवायचं.
गुरू ग्रह राशीचा मालक ग्रह असल्यामुळे सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड अगदी मनापासून असते. गुरु ग्रहाची ज्ञानी राशी असल्यामुळे अंधश्रद्धेला मात्र आपल्यापासून लांब ठेवतात. जल आणि श्री राशी असल्यामुळे व्यवहारात चोक असतात. या राशीचे लोक अचूक असतात. त्यामुळे अकाउंट कॉमर्स यासारख्या विषयात यांना गोडी असते.
भावनिक स्वरूपाची असल्यामुळे व्यवहार आणि भावना हे वेगळे ठेवले तर बऱ्यापैकी यशस्वी होताना ही मंडळी दिसतात. पण बऱ्याचदा भावनेच्या आहारी ही मंडळी जास्त जातात. चला बघूया मीन राशीच्या व्यक्तीसाठी हा महिना कसा असणार आहे.
हा महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी उत्सवाचा असेल. तुम्ही एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला जाल किंवा तुमच्या घरी मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. पण अस्वस्थता ही जास्त असेल. घरी नेहमी कोणी ना कोणीतरी एक जात राहील.
या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना भेटाल. सुखदुःखाचे क्षण शेअर कराल. काही कौटुंबिक कामाची चिंता मात्र असेल. आणि ती समस्या चर्चेतूनच सुटेल. तुमचा घरातील कुठल्याही सदस्यांशी वाद होत असेल. तोही या महिन्यात मिटण्याची अपेक्षा आहे.
या महिन्यात तुम्हाला अनेक नवी किंवा जुनी देणी द्यावी लागतील. ज्यामुळे आर्थिक परिस्थिती अवघड असेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश मिळेल आणि उत्पन्न ही पूर्वीपेक्षा जास्त असेल.
पण खर्चही वाढतील. जर तुम्ही कुठे पैसे गुंतवले असतील तर तिथून तुम्हाला फायदा होईल. तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तर त्यातही यश वाढेल. पाठिंबा मिळेल. तुम्हाला त्यांच्याकडून नवीन नोकरीची ऑफर्स सुद्धा मिळू शकते.
जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात कोणतीही अडचण येणार नाही. या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात निराशा जाणवेल. तुम्हाला असे वाटेल की तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी सर्वकाही करत आहात.
पण समोरून तसा प्रतिसाद मात्र मिळत नाही. त्यामुळे मनात थोडीशी निराशा येऊ शकते. अशावेळी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे. आणि परिस्थिती सुधारेल. जर तुम्ही लग्नासाठी स्थळ शोधत आहात.
तर घाई करू नका आणि आक्रमक वृत्ती टाळा. तुम्हाला योग्य स्थळाची वाट पहावी लागेल. अविवाहित लोक या महिन्यात निराश होतील. अस म्हणायला हरकत नाही एखादे शी संभाषण सुरू होऊ शकत परंतु ते फार काळ टिकणार नाही.
स्वतःला तंदुरुस्त करण्यासाठी केलेले प्रयत्न या महिन्यात फलदायी ठरतील. आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक ताजंतवानं वाटेल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डोळ्याच्या काही समस्या निर्माण होतील. परंतु जास्त काळ टिकणार नाहीत. मानसिक थकवा जाणवेल. पण तुम्ही व्यवस्थित हाताळाल. काही काळ अस्थिर त्यांची स्थिती राहिल.
महिन्याच्या मध्यात कमी झोप लागण्याची समस्या तुम्हाला सतावू शकते. अशा वेळी संयमाने काम करण्याची सवय लावा आणि सर्वांशी गोड वागणूक ठेवा. एप्रिल महिन्यासाठी मीन राशीचा शुभ अंक असेल ८ आणि शुभ रंग असेल तपकिरी. घरात जास्त काम असेल त्यामुळे तुमच्या स्वभावात काही दिवस चिडचिड होईल. अशा स्थितीत जर तुम्ही कमी बोलाल तर अनेक प्रश्न सुटतील.
तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद