वृषभ राशि मे २०२२ पासून होईल खऱ्या प्रगतीला सुरुवात पुढील ३ वर्ष सुखाचे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो वृषभ राशि ही राशिचक्रातील दुसरी राशी मानली जाते. वर्षभ राशि चा स्वामी शुक्र आहे. वृषभ राशीचे लोक हे फार मधुर बोलणारी असतात. यांची वाणी फार मधुर असते. वृषभ राशीच्या लोकांच्या चेहऱ्याचा आकार हा गोल असतो. हे अतिशय मृदुभाषी मानले जातात.

हे जमिनीशी जोडलेले लोक असतात. शेतजमीन अथवा नैसर्गिक वातावरण यांना फार आवडते. यांचा राशीस्वामी शुक्र असल्यामुळे यांनी जर ठरवले तर हे जीवनात खूप मोठे यश प्राप्त करू शकतात किंवा जीवनात खूप पैसा आणि धनसंपत्ती कमावू शकतात.

पण कधी कधी हे फार आळशी बनतात. आणि आलेल्या अनेक संधी यांच्या हातून निघून जातात. त्यामुळे बरेच वेळा यांचे नुकसान देखील होत असते. मे २०२२ या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती वृषभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

मे मध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती ग्रहांची होणारी राषांतरे ग्रहण युत्या आणि एकूणच ग्रहण नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनात चालू असणारा संघर्षाचा काळ समाप्त होणार असून प्रगतीला सुरुवात होणार आहे.

काळ सर्वत्र दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मित्रांनो हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे त्यामुळे चालून आलेल्या संधी पासून आपल्याला लाभ प्राप्त करून घेता आला पाहिजे.

आलेल्या प्रत्येक संधी पासून आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. मित्रांनो या काळात जर प्रयत्नांची आपण पराकाष्टा केली तर नक्कीच जीवनात मोठे यश आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात देखील सुख प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार असून मनोमिलन घडवून येण्याचे संकेत आहेत.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग देखील जमून येऊ शकतात. वडीलो पायदी धनसंपत्तीचा लाभ आपल्याला मिळू शकतो. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून. सरकारी क्षेत्रात मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

अथवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. शेतीतून आर्थिक आवक वाढण्याची संकेत आहेत. शेतीमधून आर्थिक आवक वाढणार आहे, त्यासोबतच उद्योग व्यवसायात चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग-व्यवसायात प्रगतीचे मार्ग चालून येणार आहेत.

काही नवीन करार घडून येऊ शकतात. एखादी मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला या काळात प्राप्त होऊ शकते. त्यासोबतच मित्र देखील चांगली मदत करणार आहेत. पण मित्रांवर जास्त विसंबून राहू नका. सुखाची मेहनत अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होतील.

विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या संधी आपल्या दिशेने चालू होणार आहेत त्यामुळे आलेल्या संधीचा लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. नातेसंबंधात आलेला दुरावा आता मिळणार असून. नातेसंबंध मजबूत होतील. भाऊबंदकी मधील चालू असणारे वाद देखील आता मिटणार आहेत.

आता इथून पुढे प्रगतीची एक नवी दिशा आपल्या जीवनाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे या काळात व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. चांगली संगत आणि चांगल्या मित्रांसोबत राहून चांगली कामे केल्यास त्याचे शुभ फल आपल्याला प्राप्त होऊ शकते.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *