तुळ रास एप्रिल महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तूळ ही राशिचक्रातील सातवी रास असून तूळ राशीचं जे बोधचिन्ह आहे ते म्हणजे तराजू. व्यापार समतोलपणा न्यायदान याचं प्रतीक समजला जाणारा तराजूच तूळ राशीचे चिन्ह आहे. आणि अशीच गुणधर्म या राशींच्या मंडळीमध्ये पाहायला मिळतात. स्वभावात असणारा समतोलपणा सामंजस्य आणि कोणत्याही विषयाचं गांभीर्य त्यांच्यात खूप सुंदर रीतीने भरलेल असत.

कोणत्याही दृष्टीत अन्यायाबद्दल वागण्याचा यांचा एक अनुभव असतो. कोणावरही अन्याय होणार नाही. आणि नेहमी खऱ्या च्या बाजूने उभे राहणारे या राशीचे लोक असतात. कोणत्याही व्यापारात ही मंडळी यशस्वी होऊ शकतात. तसाच या राशीचा कारक ग्रह शुक्र आहे.

वायुतत्वाची ही रास असल्यामुळे प्रचंड हुशार बुद्धिमान आणि अभ्यासू स्वभावाची ही रास मानली जाते. ही मंडळी कोणत्याही कामाची लाज बिलकूल बाळगत नाहीत. प्रत्येक काम श्रेष्ठ असतं. ते काम पूर्ण अभ्यास करून आणि कष्टाने मेहनतीने करतात आणि त्यामुळेच प्रत्येक कामात यशही मिळवतात. चला तर बघुया एप्रिल महिना तुळ राशीच्या व्यक्तीसाठी कसा असेल.

या महिन्यात काही कौटुंबिक व्यक्तींच्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होईल आणि तुम्ही त्यांच्याबद्दल द्वेष मनात ठेवू शकता. कमीपणा घेतला नाही तर प्रकरण वाढेल. त्यामुळे वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. वडील तुमच्या कडून काही अपेक्षा ठेवतील.

या महिन्यात सर्व काही सामान्य असेल परंतु एखाद्या गोष्टीबद्दल वाद विवाद होऊ शकतो. संयुक्त कुटुंब असेल तर काही गोष्टींमुळे आपापसात वाद होतील. त्यामुळे मन अस्वस्थ होईल. परंतु महिना अखेरी वर सर्व काही पूर्वपदावर येईल. आणि परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल.

महिन्याच्या मध्यात वडीलधाऱ्या माणसांची प्रकृती बिघडू शकते पण घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमची लहान बहीण किंवा भाऊ असेल तर त्यांना बाहेर फिरायला पाठवू नका. व्यावसायिकांना या महिन्यात फायदा होईल. तुम्हाला तुमच्या ग्राहकाकडून किंवा भागीदार आखडून पूर्ण पाठिंबा मिळेल.

तुमच्याबद्दल बाहेर सकारात्मक वातावरण असेल. सगळेजण तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्ही शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले असतील तर तिथूनही तुम्हाला नफा मिळेल. टॉप समाधानकारक असेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना वरच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

काही महिन्यांपासून काही काम करण्याची इच्छा असेल तर ते काम ह्या महिन्यात पूर्ण होईल. नवीन नोकरी शोधत असाल तर या महिन्यात लक्ष ठेवा. कारण काही चांगल्या ऑफर तुमच्या हातात येऊ शकतात. जर तुमच लग्न होऊन थोडाच काळ लोटला असेल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रती ओढ वाटेल.

दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षणाची भावना निर्माण होईल. आणि दोघेही एकमेकांना अधिक वेळ देऊ शकतील. हा महिना प्रेम संबंधांसाठी चांगला फायदा देईल. आणि दोघांच्या नात्यात उबदारपणा येईल. जर तुम्ही अविवाहित असाल आणि जर तुम्ही जीवंसाठी शोधत असाल तर या महिन्यात सोशल मीडियावर सकारात्मक संभाषण कराल.

जे हळूहळू प्रेम प्रकरणात बदलेल. सुरुवातीपासूनच लक्षात ठेवा की अतिउत्साही पणा टाळा. मणक्यात किंवा कमरेमध्ये समस्या असू शकतील. जी दीर्घकाळ टिकेल. त्यामुळे अजून आराम मिळेल त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या. महिन्याच्या मध्यात काही गोष्टींसाठी तणाव असू शकतो.

ज्यामुळे मित्रांना अस्वस्थता अशा काही समस्या त्रास देऊ शकतात. या सगळ्यांपासून मुक्त होण्यासाठी कोणाशी तरी मन मोकळ बोला. आणि आपल्या मनातलं सांगा. तुम्हास यावर नक्कीच उपाय सापडेल. एप्रिल महिन्यातील तूळ राशीसाठी भाग्यशाली अंक असेल ६ आणि भाग्यशाली रंग असेल हिरवा.

जर तुम्हाला भाऊ किंवा बहीण असेल तर तुमच्या दोघांमध्ये कटुता निर्माण करण्याचा तिसरी व्यक्ती प्रयत्न करेल. त्यासाठी काही जुन्या गोष्टींचा आधारही घेतला जाईल. त्यामुळे आधीच सावधपणा बाळगावा. आणि बहीण भावांशी मोकळेपणाने बोला.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *