दिनांक १९ एप्रिल अंगारकी संकष्टी चतुर्थी या राशींची लागणार लॉटरी पुढील ११ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच अंगारकी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. गणेश भक्तांसाठी हा दिवस विशेष मानला जातो.

शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी तर कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणले जाते. अमावस्येनंतर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी तर पौर्णिमेनंतर कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते.

मित्रांनो उद्या येणारी चतुर्थी ही मंगळवारी येत असल्यामुळे या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. ही चतुर्थी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो असे म्हणतात की अंगारकी चतुर्थी ही सहा महिन्यातून एकदा येते. आणि या चतुर्थीला प्रथम व्रत उपास केल्याने वर्षभराच्या सर्व चतुर्थीचे फळ प्राप्त होते.

संकष्टी म्हणजे संकट हरण करणारी चतुर्थी मान्यता आहे की या दिवशी व्रत उपास करुण विधिविधान पूर्वक गजाननाची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. सर्व संकटे दूर होतात. असे म्हणतात की या दिवशी भक्तिभावाने आणि शुद्ध अंतकरणाने भगवान गणेशाचे स्मरण केल्याने कोणतीही मनोकामना पूर्ण होते.

मित्रांनो भगवान गणेश हे सुखकर्ता असून दुःखहर्ता आहेत. त्यामुळे जो काही भक्तिभावाने गजाननाची भक्ती करतो. त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर झाल्याशिवाय राहात नाहीत. उद्या संकष्ट चतुर्थी पासून असा काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या काही भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

काही सकारात्मक प्रभावाने चमकुन उठेल यांचे भाग्य. आता जीवनात कशाची म्हणून उणीव भासणार नाही. गजानना चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. मित्रांनो दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३५ मिनिटांनी चतुर्थीला सुरुवात होणार असून 20 एप्रिल दुपारी १:३५ मिनिटांनी चतुर्थी स्थिती समाप्त होणार आहे.

चतुर्थीपासून पुढे येणारा काळ या राशींसाठी भाग्यदायी ठरणार आहे. मित्रांनो चंद्रोदय रात्री ९:४० मिनिटांनी होणार आहे. चतुर्थीपासून पुढे येणाऱ्या काळात या राशींच्या जिवनात अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- मेष राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. गणेश चतुर्थी चा विशेष प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. गजानना चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून आपल्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. कार्यक्षेत्रात हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.

उद्योग व्यापारात चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायातून चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. व्यापारात मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. या काळात नोकरीच्या क्षेत्रात आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

नोकरीच्या क्षेत्रात आता यश प्राप्त होणार आहे. करियर मध्ये प्रयत्नांची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. चांगली मेहनत घेतल्यास यशप्राप्ती ला वेळ लागणार नाही. आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो आपण कष्टाळू आहात. त्यामुळे या काळात आपण केलेले प्रयत्न फळा येतील.

आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. आपण खूप बुद्धिमान आहात आणि आपण खूप हुशार पण आहात पण तरीही आपण कधी कधी चुकीचे कामे करतात यामुळे आपल्याला त्याची नुकसान भरपाई करावी लागते.

मित्रांनो एखाद्या मोहाला बळी पडून आपण चुकीचा निर्णय घेऊ शकता. त्यामुळे या काळात कोणत्याही मोहाला बळी पडू नका आणि कोणतेही चुकीचे काम करू नका. त्यामुळे आपली आर्थिक उन्नती घडून येऊ शकते.

आर्थिक देवाण-घेवाण करताना कुणावरही अति विश्वास ठेवून चालणार नाही. कार्यक्षेत्रात आलेल्या संधीचा चांगल्या प्रकारे लाभ प्राप्त करून घ्यावा. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशि व गजाननाची विशेष कृपा बसण्याचे संकेत आहेत. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला एक नवी प्रेरणा देणारा काळ ठरणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करणार आहात. आपल्या इच्छा आकांक्षा या काळात पूर्ण होणार आहेत.

मागील काळात आपल्याला लागलेल्या काही वाईट सवयी बदलणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो आपण खूप चांगले आहात पण संगत देखील चांगली निवडणे गरजेचे आहे. आपल्यासोबत राहणारी लोक ही चांगली असायला हवीत. पूर्ण विचार केल्याशिवाय कोणावरही अति विश्वास ठेवू नका.

किंवा पूर्ण विचार केल्याशिवाय कोणत्याही कामाची सुरुवात करू नका. हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत अत्यंत मेहनत करणे किंवा परिश्रम करणे या काळात अत्यंत आवश्यक आहे. या काळात आपला मानसिक ताण तणाव कमी होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

सिंह राशि- सिंह राशि वर गजाननाची विशेष कृपा बसण्याचे संकेत आहेत. हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील त्यामुळे मानसिक तान तनाव काहीसा कमी होणार आहे.

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. निश्चित केलेले ध्येय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. संसारीक जीवनात गोडवा निर्माण होईल.

तूळ राशी- तूळ राशीसाठी परिस्थिती विशेष अनुकूल बनत आहे. आपल्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात गजानना चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामात आपण मेहनत करत आहात ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत.

व्यापारातून आर्थिक आवक वाढेल. घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कामे व्यवस्थित रित्या पार पडतील. घरातील लोक सुद्धा या काळात आपली मदत करणार आहेत. नवीन व्यवसाय उभारण्याचे स्वप्न या काळात आपले साकार होऊ शकते.

प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त होणार आहे. मित्रांनो या काळात भगवान गजाननाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. आपल्या मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. पण मित्रांनो आपल्याला मित्र भरपूर आहेत.

स्वार्थी मित्र पासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे आर्थिक आवक वाढणार असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी काळ लाभदायी ठरणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशि साठी काळ सर्वत्र दृष्टीने समाधानकारक असेल. या काळात आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जुळून येतील. गणेश चतुर्थीपासून पुढे प्रगतीला सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात अतिशय शुभ संकेत आहेत. कार्यक्षेत्रात एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते.

कामे व्यवस्थित रित्या पार पडणार आहेत. मित्रांनो व्यवसाय वर्गासाठी अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. मित्रपरिवार आणि सहकारी चांगले मदत करणार आहेत. या काळात हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. आपण घेतलेली मेहनत देखील फळाला येणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्यायला त्या क्षेत्रात आपल्याला फळ प्राप्त होऊ शकणार आहे.

मित्रांनो आपण फार महत्त्वकांक्षी आहात. आपण फार जिद्दी स्वभावाचे मानले जातात. या काळात आपण केलेले प्रयत्न हा त्याला यशाचे फळ देऊन जातील. या काळात कोणत्याही मोहाला बळी पडू नका.

व्यसनापासून दूर राहणे आपल्या साठी आवश्यक आहे. मित्रांनो आपण बुद्धिमान आहात पण आपण कधी कधी अतिशय भोळे बनता. या काळात देवाण-घेवाण करताना सतर्क राहणे आवश्यक आहे.

मकर राशी- मकर राशी वर चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. आर्थिक आवक चांगली असेल. व्यापारात प्रगती चे संकेत आहेत. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होतील.

या काळात जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. पण इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर च्या मनात साथ देणार आहेत पण आपल्याला प्रयत्न देखील भरपूर करावे लागतील.

याकाळात प्रयत्नांची पराकाष्टा करणे अत्यंत आवश्यक आहे. कष्ट देखील भरपूर घ्यावे लागणार आहेत. जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढे जास्त यश आपल्याला लाभू शकते. मानसन्मान आणि यशप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे.

मीन राशी- मीन राशि साठी काळ सुखाचा ठरणार आहे. आपल्या राशीत होणारे नेपच्यून या ग्रहाची आगमन आणि चतुर्थीचा शुभ प्रभाव जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील. व्यापारात प्रगतीच्या दिशा मोकळ्या होणार आहेत. नोकरीत बढतीचे योग येऊ शकतात. विदेश यात्रा घडण्याचे योग आहेत. संसारिक सुखात वाढ दिसून येईल. वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होणार आहे. करियरमध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *