नमस्कार मित्रांनो.
एप्रिल महिन्याच्या या आठवड्यात शनिमहाराज मकर राशित तर सूर्यदेव राहू आणि बुधासोबत मेष राशीत असणार आहेत. बृहस्पती आपल्याच राशीत अर्थात मीन राशीत संचार करणार आहेत. आठवड्याच्या शेवटी ही बुद्ध ग्रह मेष राशि वृषभ राशीत जाणार आहे.
तर वृषभ राशीचा स्वामी शुक्र गुरू सोबतच मीन राशीत असेल. या ग्रहस्थिती मध्ये हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे. भाग्य तुम्हाला साथ देईल का. तुम्हाला कुठला फायदा होईल आणि कुठे अडचणी येतील. चला हे सगळ सविस्तर जाणून घेऊ. सुरुवात करुया मेष राशी पासुन.
मेष राशी- काहींच्या ठिकाणी निराशाजनक बातम्या मिळाल्याने मन उदास असणार आहे. या आठवड्यात महिलांवरील आर्थिक खर्चात वाढ होणार आहे. प्रेमसंबंधातील समस्या संभाषणातून सोडवता आल्यास बर होईल. या आठवड्यात प्रवास पुढे ढकलणे चांगले.
अन्यथा त्रास वाढणार आहेत. आठवड्याच्या शेवटी अर्थात उत्तरार्धात कौटुंबिक बाबतीत अचानक सुखद बदल दिसून येणार आहेत. आणि मनही प्रसन्न राहील. आठवड्याच्या शेवटी वडीलधाराच्या आशीर्वादाने जीवनात सुखसमृद्धी येणार आहे. या आठवड्याचे मेष राशीसाठी शुभ दिनांक असणार आहेत १९ एप्रिल आणि २२.
वृषभ राशी- वृषभ राशीचे लोक या आठवड्यात कामाशी संबंधित नवीन योजना आखण्यात यशस्वी ठरणार आहेत. मोठे व्यापारी किंवा अधिकारी त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करतील.
तुम्ही बनवलेल्या संबंध तुम्हाला फायदा मिळवून देतील. मित्रांच्या मदतीने तुम्ही शत्रूंचा पराभव करू शकाल. तुमच्यासाठी शुभ रंग असेल लाल आणि भाग्यवान क्रमांक आठवड्यासाठी असेल ६.
मिथुन राशी-मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात अशुभ परिस्थितीवर मात करण्यात यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. पण त्याचबरोबर कुटुंबासोबत सुद्धा चांगला वेळ घालवाल.
कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. या काळात तुम्हाला रिअल इस्टेट मधून चांगले फायदे मिळण्याचे सुद्धा संकेत आहे. तुमच्यासाठी शुभ रंग असेल गुलाबी आणि क्रमांक असेल २.
कर्क राशी- कर्क राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात व्यवसायात वाढ होणार आहे. उच्च पदावर असलेल्या लोकांशी संबंध निर्माण होतील. आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ तुम्ही घालवाल. नवीन लोकांशी संवाद वाढेल.
त्याचबरोबर त्यांच्याशी व्यावसायिक संबंध सुद्धा प्रस्थापित होतील. या आठवड्यात कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडून सर्व शक्य सहकार्य अर्थात मदत मिळणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग असेल बदामी आणि भाग्यवान क्रमांक असेल ११.
सिंह राशी- सिंह राशि साठी हा आठवडा धार्मिक कार्यांसाठी चांगला असणार आहे. प्रवासाची सुद्धा संधी मिळेल. कुटुंबात शुभकार्य होणार आहेत. तुमच्या हुशारीने तुम्हाला कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता दिसून येणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवू शकणार आहात. शुभ रंग निळा आणि भाग्यवान क्रमांक असेल ३.
कन्या राशी- कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात कुटुंबीयांकडून खूप स्नेहा मिळणार आहे. धर्मावरील श्रद्धा वाढणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी राहणार आहे. संभाषणातील कौशल्य आणि चपळता वापरून तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळतील. कोर्टात विजय मिळणार आहे. तुमच्यासाठी शुभारंभ असेल हिरवा आणि लकी क्रमांक असेल ९.
तूळ राशी- तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असेल. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तुमच्या स्वभावात आणि वागण्यात परिपक्वता दिसून येईल. वैवाहिक जीवन चांगले असणार आहे. तुम्हाला आरोग्याच्या समस्या असू शकतात. शुभ रंग असलेला आकाशी आणि भाग्यवान क्रमांक २१.
वृश्चिक राशी- या आठवड्यात या राशीच्या लोकांना सरकारी क्षेत्रात मानसन्मान आणि लाभ मिळणार आहे. उच्चपदस्थ लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. राजकारणात तुमचे आकर्षण असणार आहे.
पण राजकारणात गुंतलेल्या लोकांपासून तुम्हाला थोडा सावध रहावे लागणार आहे. अन्यथा तुमच्यावर संकटे निर्माण होतील. तुमच्यासाठी शुभारंभ असेल राखाडी आणि भाग्यवान क्रमांक असेल ३.
धनु राशी- धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात व्यवसायात यश मिळणार असून कुटुंबात आनंद राहील. आपल्या सवयी बदलणे मात्र आवश्यक आहे. या आठवड्यात उच्च पदावरील लोकांशी चांगले संबंध निर्माण होणार आहेत. कुटुंबात सुद्धा चांगल्या बातम्या मिळतील. आनंदाचं वातावरण असेल. तुमच्या साठी शुभ रंग असेल तपकिरी आणि भाग्यवान क्रमांक असेल ७.
मकर राशी- या आठवड्यात मकर राशीचे लोक धार्मिक कार्य आणि धर्माशी संबंधित कामांवर पैसा खर्च करताना दिसतील. तुम्हाला तुमचे मित्र आणि सहकाऱ्यांकडून सुद्धा शक्य तेवढे सगळे सहकार्य मिळणार आहे. या आठवड्यात तुमचा कल धार्मिक कार्यांकडे असणार आहे. कुटुंबाकडून आनंद आणि सहकार्य चांगले असणार आहे. शुभ रंग असलेले क्रीम कलर आणि भाग्यवान क्रमांक असेल १६.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य बिघडू शकते. मानसिक तणाव वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची तुमचे संबंध चांगले असणार आहेत. प्रतिष्ठा वाढू शकते आणि धार्मिक कार्य व तसेच उदात्त कार्यात पूर्ण निष्ठेने तुम्ही सहभागी व्हाल. तुमच्या क्षेत्रातील लोकांमध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा आणि भाग्यवान क्रमांक असेल १२.
चला आता वळूया राशि चक्रातील या सगळ्यात शेवटचा राशीकडे अर्थात मीन राशीकडे- मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात राजकारणात यश संपादन करण्याची संधी मिळू शकते. सरकारी सेवेत उच्च पदावरील लोकांची सुद्धा मैत्री होईल. दानशूर स्वभावाचे तुम्ही असल्यामुळे इतरांच्या भल्यासाठी काम कराल. सरकार कडून पैसे मिळतील. तुमच्या साठी शुभ रंग असेल सोनेरी आणि भाग्यवान क्रमांक असेल ५.
तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद