नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदु धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण की ही हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा मानली जाते.
त्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या नदी किंवा कुंड्यांमध्ये स्नान करणे अतिशय पवित्र मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणेक उपाय देखील केले जातात.
मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या १५ कलाने युक्त असतो. चंद्र पूर्ण असतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. चंद्राचा प्रभाव मनुष्याच्या मनाला प्रभावित करत असतो. मान्यता आहे की, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भक्तीभावाने आणि शुद्ध अंतःकरणाने माता लक्ष्मी ची उपासना केल्याने व्यक्तीला सर्व सुखाची प्राप्ती होते.
व्यक्तीची आर्थिक स्थिती अनुकूल बनते. आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा घडून येते. सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते. मान्यता आहे की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून दूध अर्पण केल्याने माता लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि जीवनातील पैशाची तंगी दूर होते.
पौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना दानधर्म केल्याने व्यक्तीला सुख शांती आणि समाधानाची प्राप्ती होते. यावेळी येणारी पौर्णिमा विशेष फलदायी मानले जात आहे. यावेळी पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी होणार असून हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मित्रांनो पौर्णिमेच्या या आगमनाने काही राशींच्या जिवनावर विशेष प्रभाव पडणार आहे. या राशींचे वाईट दिवस आता समाप्त होणार असून. शुभ काळाची सुरुवात होणार आहे. पौर्णिमेच्या आकर्षक प्रभावामुळे चमकून उटेल आपले भाग्य. उद्या चैत्र पक्ष सुकलं हस्त नक्षत्र दिनांक १६ एप्रिल चैत्र पौर्णिमा असून हनुमान जयंती आहे.
दिनांक १५ एप्रिल उत्तर रात्री २:२६ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १६ एप्रिल मध्यरात्री १२:२५ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. पोर्णिमे पासून पुढे येणारा काळ या काहीही राशीच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहेत.
तर चला वेळ वाया न घालवता बघूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.
मेष राशी- पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ या राशीसाठी आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रात आपण जी कामे सुरू केले आहेत त्यात आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
पण दुसऱ्यावर विसंबून राहू नका. दुसऱ्यावर विसंबून चालणार नाही. स्वतःची मेहनत अत्यंत आवश्यक आहे. या काळात आर्थिक प्राप्ती मध्ये चांगली सुधारणा घडवून येण्याचे संकेत आहेत. या काळात आर्थिक क्षमता मजबूत बनेल. यात आर्थिक समतेचे साधने उपलब्ध होणार आहेत.
पैसे उधार देताना सावध राहण्याचे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. मेष राशीचे लोक हे अतिशय बुद्धिमान मानले जातात. आपण विचारपूर्वक घेतलेले निर्णय या काळात सफल ठरणार आहेत. आपल्या कल्पनेत असणारे योजना आता प्रत्यक्षात उतरतील.
पौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना दानधर्म केल्याने मनाला शांती लाभेल आणि आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. तरुण-तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.
वृषभ राशि- मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. चैत्र पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ वृषभ राशीच्या जीवनात अतिशय सकारात्मक काळ ठरणार आहे. वृषभ राशीच्या जिवणाला एक सकारात्मक कलाटणी देणारा हा काळ ठरणार आहे.
मित्रानो जीवनात चांगल्या लोकांची संगत अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आपण खूप चांगल्या मनाचे आहात. आपण खूप चांगल्या स्वभावाचे आहात. मागील काळात ग्रह नक्षत्र अनुकूल नसल्यामुळे काही वाईट अनुभव आपल्याला आले असतील.
काही वाईट गोष्टी आपल्या जीवनात घडलेल्या असतील पण आता इथून पुढे परिस्थिती आपल्यासाठी बदलणार आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती ची प्राप्ती आपणाला होणार आहे.
जे काम आपण हातात घ्याल त्या कामात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी या काळात घडून येणार आहेत.
कर्क राशि- कर्क राशि साठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. मागील काळात झालेले आपले अति नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल. आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ होईल.
परिवारातील लोक या काळात आपली मदत करणार आहेत. मित्रांनो आपल्याला आपल्या परिवारा पुरते विशेष प्रेम आहे. नेहमी आपण आपल्या परिवाराचा विचार करत असता. सुख-समृद्धी किंवा आनंद कसा मिळेल याचा विचार आपल्या मनामध्ये असतो. आणि आपण भरपूर मेहनत देखील करता.
परिवाराला पूर्ण सुख सुविधा मिळवून देण्यासाठी आपण खूप कष्ट घेतात. आता इथून पुढे कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला अतिशय शुभ दिवस येणार आहेत. कार्यक्षेत्रात यावेळी अतिशय चांगले यश अपनाला प्राप्त होणार आहे. प्राप्त होणार आहे.
माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे.
मानसिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
कन्या राशि- कन्या राशि साठी पुढे येणारा काळ विशेष फलदायी आणि सुखाचा ठरून येणार आहे. कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. नशिबाची भरपूर साथ आपणाला लाभणार आहे. मित्रांनो कन्याराशीचे लोक हे थोडे लाजाळू असतात.
हे लोक थोडेसे शांत स्वभावाचे लाजाळू असतात हे कोमल मनाचे सुद्धा असतात. हे भावनिक असतात. यांना समजून घेणारे किंवा यांच्या भावना समजून घेणारे लोक फार कमी असतात. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.
पैशाची तंगी आता दूर होईल. आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. करियर मध्ये चांगले यश अपणाला प्राप्त होईल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपण घेतलेली मेहनत या काळात फळाला येणार आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहात. पौर्णिमे पासून पुढे भाग्य भरपूर प्रमाणात साथ देईल.
तुळ राशि- पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ तूळ राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.
मित्रांनो आपल्या जीवनात मित्र पुष्कळ येतात पण मित्र निवडत असताना मित्रांची पारख करणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले मित्र आणि वाईट मित्र हे निवडणे गरजेचे आहे. कुणावरही अतिविश्वास या काळात ठेवू नका. मागील काळात केलेल्या चुका पुन्हा परत या काळात करू नका.
उद्योग व्यापारात नवी चालना प्राप्त होणार आहे. उद्योग व्यवसायात आपण केलेले करार म्हणजेच काही नवीन करार या काळात घडून येणार आहेत. जमीन खरेदी विक्री चे योग सुद्धा येऊ शकतात.
वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. पौर्णिमे पासून आपल्या जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होईल. कोणत्याही मोहाला बळी पडून चुकीची कामे निवडू नका किंवा चुकीची कामे करू नका.
वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. वृश्चिक राशीसाठी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. जीवनात आता सुवर्णसंधीचा काळ सुरू होणार आहे. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपणाकडे येणार आहेत.
कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. नवीन सुरू केलेल्या कामांना आता मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. आपण जे निर्धारीत केले आहे ते या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपण निर्धारित केलेले ध्येय प्राप्त होईल. लोक आपल्या शब्दाने प्रभावित होणार आहेत.
लोक आपली प्रगती पाहून आश्चर्यचकित होणार आहेत. आपल्या पडत्या काळात आपल्यावर हसणारे आपली टिंगल उडवणारे लोक आपली स्तुती करू लागतील. समाजात मानसन्मान आणि यशकिर्ती मध्ये वाढ होणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. चैत्र पौर्णिमेपासून पुढे अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येईल. सामाजिक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. एखाद्या राजकीय व्यक्तीची मदत आपल्याला मिळणार आहे.
कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक आपल्याला समाधान कारक असेल. नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाची बाहार येणार आहे.
समाजात नावलौकिकात वाढ होणार आहे. कुंभ राशीचे लोक शांत वृत्तीचे आणि इमानदार लोक मानले जातात. हे फार बुद्धिमान असतात. या काळात ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला मना प्रमाणे यश प्राप्त होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद