वास्तूनुसार घरात हे बदल करा आणि बघा कस चमकेल तुमच भाग्य.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो निसर्गामध्ये असे सामर्थ्य आहे ज्यामुळे आपण आपल्या सकारात्मक ऊर्जेला विकसित करू शकता. त्यामुळे आपण भाग्यवान होऊ शकता नशिबात वेळ आणि स्थळ या दोन्हीचे फार महत्त्व आहे. चुकीच्या ठिकाणी राहिल्याने किंवा जाण्याने आपल नशीब देखील थांबत. नशिबात कर्म देखील महत्त्वाच आहे, चुकीच काम केल्याने देखील नशीब मंदावत.

तर आम्ही आपणास नशिबाला जागृत करण्याचे सुख यावर एक उपाय सांगत आहोत. मग मित्रांनो चला जाणून घेऊया ते उपाय कोणते आहेत. सगळ्यात पहिला उपाय घराचे दार उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला असल्यास सर्वात उत्तम असत.

पूर्वी कडे उत्तम आणि पश्चिमेकडे असल्यास मध्यम मानल जात. घरातील नैऋत्य पुरणात अंधार असू नये, तसेच वायव्य पुरणात जास्त उजेड असू नये. घरात तुळस असल्यास अनेक प्रकारचा वास्तुदोष दूर होतात. तुळशीजवळ दररोज संध्याकाळी दिवा लावावा दुसरा उपाय घर नेहमी स्वच्छ ठेवा.

घरात अनावश्यक तुटलेल्या फाटलेल्या वस्तू जूनाट अडगळीचे सामान जुने फाटके नसावे.

तिसरा उपाय घरात बऱ्याच देवांच्या मूर्त्या किंवा चित्र ठेवू नये. नकारात्मक चित्रे तसेच ताजमहालचे चित्र काटेरी झाडांची चित्र लावू नये. चौथा घरातील ईशान्य कोपरा नेहमीच रिकामा ठेवावा. त्याला पाण्याचे स्थळ बनवा.

पाचवा उपाय घरातील दारावर भगवान गणेशाचे चित्र उजव्या आणि डाव्या बाजूस स्वास्तिक शुभ लाभ दिलेला असावा. सहावा उपाय सकाळी संध्याकाळी घरात सुमधूर संगीत आणि सुवासाने वातावरण चांगल बनवा.

सातवा उपाय रात्री झोपण्यापूर्वी तुपात भिजवलेला कापूर पेटवावा. आठवा उपाय घरात नकारात्मक ऊर्जा असणारे झाडे असल्यास त्यांच्यापासून सावध रहाव. नववा उपाय घरात वारे येण्याचे मार्ग असे असावेत की, घरात हवा खेळती असावी.

दहावा उपाय तीन दार एका सरळ दिशेत नसावे. हवाई तिकडून घेऊन दुसरीकडून निघणारे दार नसावे. अकरावा उपाय घरात नेहमी या वस्तू ठेवाव्या. रुद्राक्ष, शंख, घंटाळी, स्वस्तिक चिन्ह, ओम लॉकेट, कलश, गंगाजल, कमला घंटे, तुळस किंवा रुद्राक्षाची माळ, शाही ग्राम पंचदेव, पितळेची मूर्ती, भिंतीवरील लागलेल निसर्गाचे चित्र किंवा एखाद्या हसणाऱ्या कुटुंबाचे चित्र.

बारावा उपाय केळी, तुळस, मनी प्लांट, डाळिंब, पिंपळ वटवृक्ष, आंबा, पेरू, कढीपत्ता, चंपा जाई, परिजातक वैजयंती, रात रानी हे झाडे लावावेत. तेरावा उपाय आठवड्यातून एकदा समुद्री मिठाने फरशी पुसावी. यामुळे घरात शांतता नांदते. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. आपल्या घरात वाद देखील होत नाहीत.

आणि लक्ष्मीचे वास्तव्य कायमच राहते. चौदावा उपाय घरातील स्वच्छता गृह आणि स्नान गृह नेहमी स्वच्छ आणि सुवासिक ठेवा. कारण हे राहू आणि चंद्राच असत. पंधरावा उपाय आपल्या घरात तुटकी खुर्ची किंवा टेबल त्याला त्वरित घरातून बाहेर काढून फेकून द्या.

हे आपल्या प्रगतीत आणि येणाऱ्या पैशात अडथळे आणतात. बैठकीतील सोपा देखील फाटका किंवा तुटलेला नसावा. त्यावर अंथरलेली चादर देखील फाटकी किंवा घाणेरडी नसावी. सोपा, खुर्ची, टेबल यांचे पण दोष असतात. दिसायला सुंदर आणि स्वच्छ असल्यास त्यांचे आकार घाणेरडी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. म्हणून वास्तुतज्ञाला विचारून वस्तू खरेदी करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *