गुढीपाडवा का साजरा केला जातो? काय आहे गुढीपाडवा विधीचे महत्व? हे आहे खरे सत्य.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो काही जण नवीन वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून करत असतात. पण हिंदू परंपरेनुसार आपले नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होत असते आणि आपण जे जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात करत होते. ते इंग्लिश पद्धत आहे जी बाहेर देशात वापरली जाते.

तर मित्रांनो तुम्ही कित्येक दिवस तरी गुढीपाडवा साजरा करत असाल पण नक्की गुढीपाडवा का साजरा करतात. हे तुम्हाला माहीत नसेल ते काही क्वचित लोकांना माहीत असेल. तर आज ही माहिती आम्ही तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख घेऊन आलेलो आहोत चला तर मग पुर्ण लेख आवर्जून वाचा.

चैत्र पक्षाच्या प्रतिपदेला गुढीपाडवा हा हिंदू परंपरेतील सण साजरा केला जातो. इथूनच नवीन नूतन वर्ष याची सुरुवात होते. गुढी म्हणजे विजय आणि पाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी जो विजयोत्सव साजरा केला जातो.

त्याला गुढीपाडवा असे संबोधले जाते. गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो. याबद्दल पुराणांमध्ये खूप साऱ्या गोष्टी नमूद केल्या आहेत, त्यापैकी खालील प्रमाणे काही गोष्टी सांगणार आहोत.

असे सांगण्यात येते की जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा दक्षिण भारतात श्रीराम पत्नीला शोधण्यासाठी निघाला. शोधत असताना त्याला समजते की, लंकाधीश रावणाने सीताचे अपहरण केले आहे त्यावेळी दक्षिण भारतात वाली यांचे राज्य होते.

शोधाच्या प्रवासाला जाताना त्यांना वाटेत लक्ष्मण आणि रामाला सुग्रीव भेटतात ते वालीचे भाऊ असतात. तेव्हा सुग्रीव ने वालीच्या राज्यात काहीच करता येत नाही असे सांगितले तेव्हा रामाने सुग्रीवला वाली साम्राज्य मिळवून देईन मला त्याबदल्यात मदत हवी.

असे सांगितले तेव्हा रामाने सुग्रीवाला वाली सोबत द्वंदयुद्ध करण्यासाठी सांगितले. वाली हा जसा रागीट आहे तसा तो प्रेमळ देखील आहे त्याने आपल्या भावाने दिलेले द्वंदयुद्ध स्वीकारले वाली सुग्रीव सोबत युद्ध करत असताना त्याने द्वंदयुद्धाचे नियम मोडून सुग्रीव आपला भाऊ असल्याकारणाने त्याला सोडून दिले.

सुग्रीव मग पुन्हा द्वंदयुद्धाचे आवाहन वालीला करतो. तेव्हा वाली खूप चिडतो द्वंदयुद्धात वाली सुग्रीवला हरवतो पण यावेळी तो द्वंद्वयुद्धाचे नियम मोडत नसतो त्याने हाताच्या भाहूमध्ये सुग्रीवचा गळा दाबून ठेवलेला असतो.

मरण यातनेच्या वेळेस सुग्रीव असताना वालीवर कट रचला जातो झाडून लपलेला श्रीराम बाण सोडतो आणि एका क्षणातच वाली खाली कोसळतो आणि मृत्युमुखी पडतो. ज्या दिवशी हे सर्व घडले तो दिवस होता चैत्र शुक्ल प्रतिपदेचा.

याच दिवसापासून असे मानले जाते की गुढीपाडव्याचा दिवस विजय दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी गुढी उभारली जाते तोरण लावले जाते. असेही सांगण्यात येते की याच दिवशी ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली होती.

याच बरोबर ऋषी भास्कराचार्य यांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत येणार्‍या अवधीमध्ये पंचांगाची निर्मिती केली होती. अशा खूप साऱ्या दंतकथा सांगितल्या जातात यातून गुढीपाडव्याला सुरुवात झाली असे मानले जाते. याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *