सोमवारी याठिकाणी लावा एक दिवा….तुमच्या जीवनात होईल पैशाचा पाऊस….नक्कीच पहा..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो सोमवार हा एक शुभ वार मानला जातो, यादिवशी भगवान शंकरांचे आपण नेहमीच पूजन करतो. त्यांची मनोभावे पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ असते, महादेव हे आपल्या भक्तांचे लगेचच ऐकतात व त्यांच्या तपस्येला जाणून लगेच दर्शन देतात.

आपली इच्छा देव महादेव लगेच पूर्ण करतात, तुम्हाला व्यापारात, व्यवसायात नफा होत नसेल, घरात नकारात्मक वातावरण निर्माण होत असेल. मुले नीट अभ्यास करत नसतील, विवाह जुळत नसतील, वादविवाद होत असतील, घरात पैसा येत नसेल, उत्पन्नाचे मार्ग बंद झाले असतील तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी महादेवांच्या मंदिरात अशा पध्दतीने दिवा लावावा.

हा उपाय मित्रहो फक्त ११ सोमवारी केल्याने आपली इच्छा ननक्कीच पूर्ण होते, मनाला समाधान मिळते, यशप्राप्ती होते. मित्रहो हा उपाय करण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे व घरात भगवंताचे पूजन करावे.

अगदी भक्तिभावाने त्यांचे पूजन करून हात जोडून नमस्कार करावा. तसेच दिवसभर मनातल्या मनात “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करावा. अगदी मनिभावें हा उपाय करावा, प्रदोष काळातच हा उपाय नक्की करावा.

प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्यापूर्वी ४३ मिनिटे आणि सूर्यास्त झाल्यानंतर ४३ मिनिटांच्या आतील काळ म्हणजेच ८६ मिनिटांचा काळ. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, या काळातच भगवान शंकराच्या मंदिरात जावावे.

पण त्यापूर्वी सर्वात आधी घरात एक दिवा लावावा आणि त्यानंतरच भगवान शिवच्या मंदिरात जावावे. मंदिरात जाताना एक तांब्याचा तांब्या घ्यावे, व त्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकावे.

तसेच एका ताटात पूजेचे सामान, जसे की अक्षदा,दिवा, कापूर, धोतऱ्याचे फुल घ्यावे किंवा मंदार आणि रुईची फुले व बेलाची पाने अशी सामग्री ताटात घ्यावी. हे सगळं सामान घेऊन मंदिरात प्रवेश करावा. या सर्व वस्तू जरी नसतील तरीही एक दिवा आणि तांब्याच्या तांब्यातील पाणी असले तरीही चालेल.

हे तांब्यातील आपण घरातूनच घेऊन जावे, काही स्त्रिया रिकामा तांब्या घेऊन जातात आणि मंदिरातील नळाचे पाणी त्यामध्ये भरतात. मात्र असे करणे चुकीचे असून त्यामुळे आपले कोणतेही दोष नष्ट होत नाहीत. असे म्हणले जाते की घरातील पिण्यासाठी भरलेल्या पाण्यात घरातील सर्व पितृदोष एकवटलेले असतात.

तसेच घरातील नकारात्मक शक्ती, करणी, काळी जादू, अशाप्रकारच्या ज्या काही अदृश्य वाईट शक्ती आपल्या घरात स्थित असतील त्या सर्व या पाण्यात जमा झालेल्या असतात. त्यामुळे जर हे पाणी आपण मंदिरात जाऊन भगवान शिवांना अर्पण केले तर घरातील एरव्ही पितृदोष नष्ट होतात.

अशाप्रकारे घरातून एक तांब्या आणि एक कणकेचा दिवा करून घ्यावा, जर कणकेचा दिवा शक्य नसेल तर एक मातीचा दिवा करून घ्यावा. पण हा दिवा पूर्णपणे नवीन असावा, यापूर्वी त्याचा अजिबात वापर झालेला नसावा. त्या दिव्यात साजूक तूप किंवा तिळाचे तेल टाकावे व तो दिवा घेऊन मंदिरात जावावे.

सर्वप्रथम पाणी घालून महादेवांना स्नान घालावे. त्यानंतर गंध लावून फुले व अक्षदा अर्पण कराव्या व तसेच दोन लवंगा देखील अर्पण कराव्या आणि तिथे दिवा लावावा व त्यातही दोन लवंगा टाकाव्या. तिथेच बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.

देवाला नमस्कार करून, प्रार्थना करावी, त्यानंतर देवाला अक्षदा अर्पण करून घरी परतावे. येताना तो दिवस घरी परत न आणता तिथेच ठेवावा. असे ११ सोमवार करावे, प्रत्येक वेळी नवा दिवा घेऊन जावे. असे केल्याने नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

तुम्ही याचा अनुभव नक्की घ्या व कमेन्ट मध्ये हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते सांगा. तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते देखील सांगा आणि जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *