राग कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय….शिव महापुरणात सांगितलेला हा उपाय नक्की करा…..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो अनेकांना नेहमी खूप राग येत असतो, काही लोकांना साध्या कारणावरून सुद्धा जास्त राग येतो. राग हा माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो, त्यामुळे अनेकदा आपलेच नुकसान होते. किंवा जर आपणाला जास्त राग असेल तर लोक आपल्याशी मोकळ्या मनाने बोलत नाहीत.

अनेकजण दचकून,घाबरून आपल्या सोबत राहतात. त्यामुळे आपल्या आसपासचे वातावरण सुद्धा नेहमी गंभीर असते. कधी कधी आपण शांत असतो पण समोरची व्यक्ती खूप चिडचिड करत असते, तसेच त्या व्यक्तीला प्रचंड राग येत असतो. पण असे होणे हे त्याच्यासह आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असते.

त्यामुळे अशा व्यक्तीचा राग शांत करणे आवश्यक असते, यासाठी आपण खूपसे उपाय करतो. पण त्याचा काही फारसा परिणाम होत नाही, आज आपण एक खास उपाय जाणून घेणार आहोत. ज्याचा महिमा शिव पुराणात सुद्धा कथन केला गेला आहे.

हा उपाय तुम्ही कोणत्याही शिवरात्रीला करू शकता, भगवान शंकराचे तुमच्यावर विशेष लक्ष राहील. त्यांची देखील भक्ती केल्याने तुमच्यावरील संकटे नेहमीच दूर राहतील व तुमचे जीवन सुखमय होईल. आजचा हा उपाय देखील त्यांच्याशी निगडित आहे.

शिवरात्री ही प्रत्येक महिन्यात येत असते, हा छोटासा उपाय या दिवशी केल्यास रागीट माणसाचा स्वभाव बदलून ही व्यक्ती एकदम शांत बनते. विशेष म्हणजे हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे. यासाठी आपणाला ५ बेलाच्या पानांची आवश्यकता आहे.

या बेलपत्रांचे देठ तोडायचे आहेत, या ५ बेलपत्रांचे ५ देठ तोडून जवळपास असणाऱ्या शिवालयात जायचे आहे. तसेच तिथे जात असताना अगदी आठवणीने घरातील तांब्याभर पाणी घेऊन जायचे आहे. मंदिरात गेल्यावर मित्रानो प्रथम देवाला नमस्कार करायचा आहे.

त्यानंतर शिव शंभुच्या पाणी ओघळणाऱ्या भागावर जिथे भगवान शिवाची धाकटी मुलगी अशोक सुंदरी तिचे जे स्थान आहे त्याच्या टोकाशी हे बेलपत्रांचे ५ देठ ठेवायचे आहेत. तिथे हे देठ ठेवल्यानंतर हटकेश्वर महादेवाचे मनोभावे स्मरण करायचे आहे.

हटकेश्वर महादेव हे हट्टी व्यक्ती, जे खूप जिद्दी असतात, रागीट असतात. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करत नाहीत. नेहमी डोक्यात राग घालून तयार असतात अशा व्यक्तींना शांत करतात. त्यांचा राग निवळतात.

त्यांच्या नावाचा जप करून घरातील आणलेले तांब्यातून जे जल आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. हे जल अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, किंवा श्री शिवाय नमोस्तोभ्यं असा मंत्र म्हणायचा आहे.

त्यानंतर देवाला हात जोडून प्रार्थना करायची आहे, की जी कोणी रागीट व्यक्ती आहे तिचा राग लवकर निवळूदे. तसेच पाणी अपूर्ण करतेवेळी अशोक सुंदरीच्या स्थानावर ठेवलेले जे बेलपत्राच्या पानांचे जे देठ ठेवण्यात आले होते.

ते पाण्यासह काही ओघळून खाली येणार आहेत, पण जितके देठ खाली येतील तिकडे सर्व देठ आपण घ्यायचे आहे व घरी परत यायचे आहे व ज्या व्यक्तीला जास्त राग येतो त्या व्यक्तीला हे देठ खाऊ घालायचे आहेत.

हा उपाय मित्रहो नक्की करून पहा, तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते देखील नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *