रात्रीच्या स्वप्नात मेलेली माणसे देत असतात हे ५ संकेत……काय अर्थ असतो त्यांना स्वप्नात पाहण्याचा…..?

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो दिवसभराची कामे आटोपून जेव्हा आपण रात्री झोपी जातो तेव्हा, खूपदा आपणाला गाढ झोप लागून छानशी स्वप्ने पडतात. काही स्वप्ने खूप आनंद देऊन जातात, झोप आणखी गाढ बनवतात. तर काही स्वप्ने खुप भयानक असतात, आपणाला विचित्र प्रकार दाखवून घाबरवून सोडतात.

त्यामुळे अचानक आपली झोप मोडते, व आपण जागे होते. त्यावेळी मनात येते की हे सर्व काय होते, आपल्यालाच का हे स्वप्ने पडले? या स्वप्नात आपणाला निरनिराळे संकेत मिळत असतात, त्यातून खूप काही आपल्या डोळ्यासमोर येत असते. तर मित्रहो आता आपण याबद्दल काही खास बाब जाणून घेऊया.

काही लोकांच्या स्वप्नात नेहमी मृत व्यक्ती येतात, तर आपल्या घरात जर नुकताच कोणी मृत झाले असेल तर ते देखील स्वप्नात येतात. पण असे लोक स्वप्नात येऊन आपणाला खूप काही संकेत देत असतात, हे संकेत ओळखता येणे आवश्यक असते.

मनोविज्ञानानुसार आपल्या स्वप्नात येऊन हे लोक काहीतरी नेहमीच संकेत देत असतात. स्वप्नात येणारी व्यक्ती जर आपली नातेवाईक असेल तर ते नेहमी आपल्या भावी जीवनासाठी सकारात्मक विचार घेऊन येतात.

हे मृत व्यक्ती काहीतरी संदेश घेऊन आपल्या स्वप्नात येत असतात. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.

१) जर कधी आपल्या एकदम जवळची व्यक्ती आजारी पडून मृत पावली असेल तर आपण सारखा त्यांचाच विचार करत असतो. जर अशी व्यक्ती आपल्या स्वप्नात येत असेल आणि निरोगी व स्वस्थ दिसत असेल तर समजून जावे की, ती व्यक्तीचा जन्म एका चांगल्या ठिकाणी झाला आहे.

स्वप्नशास्त्रात अशा स्वप्नाला आश्वासन स्वप्न असेही म्हणतात. असे स्वप्न पडल्यावर आपण समजून जावे की आपल्या स्वप्नात आलेली ही व्यक्ती अगदी स्वस्थ व निरोगी आहे. तिची काळजी केली नाही तरी चालते. असा संदेश ते देत असतात.

२) तसेच जर एखादी जवळची निरोगी व्यक्ती अचानक मृत पावल्यावर आपल्या स्वप्नात येत असेल आणि स्वप्नात ती व्यक्ती जर आजारी आणि दुःखी दिसत असेल तर समजून जावे की ती व्यक्ती स्वप्नात येऊन तुमच्याकडे काहीतरी अपेक्षा करत आहे.

आपणाला शक्य असेल तर आपण त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण कराव्या, त्यामुळे ती व्यक्ती समाधानी राहू शकते. आपण तिच्या इच्छा पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यामुळे ती व्यक्ती स्वप्नात येणे बंद करते. आपले स्वप्न पूर्ण न करता ती व्यक्ती अचानक मृत पावल्याने तिची ही स्वप्नपूर्ती अपुरी राहिलेली असते.

३) एखादी जिवंत व्यक्ती जर आपल्या स्वप्नात येत असेल व ती मृत अवस्थेत दिसत असेल तर आपण खुप घाबरून जातो. पण अशावेळी घाबरण्याची अजिबात गरज नसते, घाबरण्याचे काहीच कारण देखील नसते.

असे स्वप्न आपणाला पडणे खूप चांगले असते, स्वप्नशास्त्रानुसार असे जिवंत व्यक्ती जर आपल्या स्वप्नात मृत होऊन येत असतील तर त्या व्यक्तींना आणखीन आयुष्य लाभते. त्यांच्या जीवनात आनंद येणार असतो.

४) तसेच जर आपल्या पूर्वजांची आपल्या स्वप्नात छटा दिसत असेल, हे पूर्वज सारखे आपल्या स्वप्नात येत असतील व ते काहीच बोलत नसतील तर समजून जावे की स्वप्नशास्त्रानुसार ते लोक आपणाला भविष्यात येणाऱ्या एखाद्या वाईट गोष्टीपासून सावध होण्याचा संदेश देत असतात.

तसेच वर्तमान काळात आपण चुकीचा व्यवहार करत असतो, आपण जर तशी मानसिकता बाळगत असेल तर ते पूर्वज आपल्याला सावध करत असतात. जर ते आपल्या समोर आशीर्वादासाठी हात वर करून उभे आहेत पण काहीच बोलत नाहीत तर समजून जावे की आपल्या चांगल्या कार्यात यश मिळणार आहे.

५) तसेच काहीवेळा पूर्वज आपल्या स्वप्नात येतात, त्यावेळी ते दुःखी वाटतात. किंवा एखाद्या गोष्टीची मागणी करत असतात, तसेच कर निर्वस्त्र दिसत असतील तर एखाद्या ब्राम्हणाला वस्त्र आणि चपला दान कराव्या. आपल्या पूर्वजांच्या आठवण रुपी अन्नदान करावे.

आपण असे सकारात्मक कार्य केल्याने नक्कीच त्यांना त्या वस्तू मिळतात, त्यांचे मन देखील समाधानी राहते. तसेच वृद्ध मृत व्यक्ती आकाशात दिसली तर समजून जावे की त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती झाली आहे. तसेच ते आपल्या स्वप्नात आसपास असल्याचे भासत असेल तर त्यांची आपल्या पासून ओढ संपलेली नसते.

जर आपल्या सोबत असे होत असेल तर त्यावेळी गायीला या मृत व्यक्तीच्या नावाने पोळी खायला द्यावी. तर अमावास्येला छतावर त्यांच्यासाठी नैवेद्य देखील ठेवावा.

तर मित्रहो हे उपाय नक्की करा, तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *