होळीच्या दिवशी म्हणा हा एक मंत्र, सगळी स्वप्ने होतील सहज पूर्ण…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो येत्या काही दिवसात होळीचा सण येत आहे, या सणाला अनेकजण एकत्र येतात. होळीच्या अग्नीत अनेक वाईट गोष्टींचे दहन केले जाते. त्यामुळे अग्नी देवतांच्या साक्षीने आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता घरात पसरते.

या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात, हे उपाय आपल्या जीवनातील वाईट शक्तींचा ऱ्हास करून चांगल्या गोष्टी आपणास प्राप्त होतात. हे उपाय मित्रहो नक्की करा, त्यामुळे तुमची सगळी दुःखं, दारिद्र्य दूर होतील. आजच्या या लेखातून काहीसे उपाय तुम्हाला सांगण्यात येतील, जे अगदी साधे आहेत पण खुप उपयोगी आहेत.

घरातील वातावरण चांगले राहण्यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील असतो, पण काहीशा मुख्य तिथीवर,किंवा विशेष दिनादिवशी जर हे उपाय केले तर ते लवकर सिद्धीस येतात. शिवाय त्याचा लाभ आपणाला लगेच मिळतो.

शास्त्रात सांगितलेला हा उपाय होळीच्या दिवशी केला जातो, यावेळी दहनासोबत हा उपाय केल्याने याचे फळ लवकर मिळते. मित्रहो होळीच्या दिवशी तुमच्या परिसरात, किंवा अंगणात जिथे कुठे होळी साजरी होत असेल तिथे तुम्हाला जायचे आहे.

तिथे जाऊन अगदी विधिनुसार मनोभावे पूजा अर्चा करायची आहे. पूजेला जात असताना एका तांब्यातून पाणी घेऊन जायचे आहे, तसेच पूजेला जाताना नैवेद्य देखील घेऊन जायचे आहे. पूजा झाल्यावर होळीला नैवेद्य दाखवायचा आहे.

यानंतर तिच्या प्रदक्षिणा काढायच्या आहेत. मात्र प्रदक्षिणा करत असताना आपण आणलेल्या तांब्यातले पाणी थोडे थोडे टाकत टाकत पुढे जायचे आहे. हे पाणी प्रदक्षिणा घालत असताना होळीच्या बाजूने टाकत संपवायचे आहे. आपल्या मनात जितक्या येतील तितक्या प्रदक्षिणा आपण घालायच्या आहेत. ही सर्व पूजा मनापासून, भक्तीने करायची आहे.

जेव्हा मित्रहो होळीचा दहन करण्यात येईल त्यावेळी आपणाला त्या पेटत्या होळीकडे पाहून एका मंत्राचा उच्चार करायचा आहे. हे मंत्र उच्चारत असताना आपले मुख पूर्व दिशेला असणे मांगल्याचे ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही पूर्वेला तोंड करून उभे राहावे.

तसेच होळीकडे पाहून या मंत्राचे जवळपास अकरा वेळा उच्चार करायचा आहे. हा मंत्र “ओम धन दाय नमः” असा असून याचे अकरा वेळा उच्चारण करायचे आहे. हा मंत्र मित्रहो खुपच सोपा आहे, त्यामुळे पाठांतर करण्यास जास्त काही अडचण येणार नाही.

हा मंत्र उच्चारून झाल्यावर होळी मातेला नमन करायचे आहे, मनोभावे तिची प्रार्थना करायची आहे. तसेच आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि शांती येण्यासाठी देखील तिला प्रार्थना करावी. जो मंत्र तुम्हाला सांगण्यात आला आहे तो खूपच प्रभावशाली असून, याचा लगेच परिणाम दिसून येतो.

मंत्राच्या उच्चारणामुळे घरातील वातावरण सकारात्मक बनते तसेच घरात वास्तव्य करणाऱ्या सदस्यांचे आरोग्य चांगले राहते शिवाय घरात धनसंपत्ती भरभरून येते.

तुम्ही हा मंत्र नक्की म्हणा तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना देखील सांगा तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *