लग्न जुळण्यासाठी ‘कुंडली’ महत्वाची असतेच….कारण जाणून घ्या तुम्हीही….

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो प्रत्येक जीवाला दुसऱ्या जीवाचा आधार हा हवा असतोच, त्याच्या प्रत्येक कामात तिची साथ असणे किंवा तिच्या प्रत्येक निर्णयात त्याचा पाठींबा असणे आवश्यक असते. पती पत्नी दोघे मिळून आपल्या संसाराला आकार देत असतात.

पण तो आकार चांगला आहे की वाईट आहे हे विलग झाल्यावर कळतेच. मात्र काहीजण अगदी शेवटपर्यंत एकमेकांना साथ देतात, समजून घेऊन नात्याची गाडी पूढे नेत असतात. पण काहीवेळा आई वडिलांनी थाटामाटात लग्न लावून देऊन सुद्धा वर्षभरातच दोघांचे खटके उडू लागतात व हे प्रकरण घटस्फोटाची पायरी चढते.

अनेकजण म्हणतात की पती पत्नीच्या जोड्या या भगवंत आधीच तयार करून ठेवतात, पण आपणाला त्या जोड्या योग्यरीत्या शोधून त्यांना एक करायचे असते. मात्र खूपदा यामध्ये आपली चूक होते व या जोड्या एकत्र राहत नाहीत.

या जोड्या जुळवताना काहींचे मार्ग अगदी सरळ, साधे असतात तर काहींचे तिरपे पण जवळपास असतात पण काहीजणांचे मार्ग खूप दूर व गुंतागुंतीचे असतात. मात्र तरीही इतके असून देखील या जोड्या एकत्र कराव्याच लागतात. त्यांची एकमेकांशी गाठ घालून द्यावी लागतेच.

लग्न जुळवताना अनेक गोष्टींचा बारीक विचार करावा लागतो, सर्वप्रथम यामध्ये कुंडली जुळणे महत्वाचे असते. काही व्यक्तींचा या कुंडलीवर विश्वास असतो, तर काहीजणांना हे पटत नाही. आजकालची तरुण पिढी ही कुंडली, ग्रह तारे यावर अजिबात विश्वास ठेवत नाही.

मात्र तरीही घरातील मोठ्या व्यक्तींना त्याचे महत्व माहीत असल्याने ते हट्ट करतात व त्यापुढे या तरुण पिढीचे काहीही चालत नाही. त्यांना हा हट्ट मान्य करावाच लागतो. ज्योतिषशास्त्रात ग्रह,तारे, शास्त्र,दोष, नियम यांना फार महत्व असते.

काहींना यावर विश्वास नसतो पण ज्यांना यावर विश्वास आहे त्यांनी आपली कुंडली जरूर जुळवावी. मात्र लाखो मैलांवर असणारे ग्रह तारे यांच्या जुळण्यापेक्षा ज्यांना एकमेकांशी लग्न करायचे आहे त्यांची मने जुळणे फार महत्वाचे असते. जरी त्यांची कुंडली नाही जुळली तरीही त्यावर खूपसे उपाय आहेत.

आपण अभिषेक करून त्यातील दोष दूर करू शकतो. मित्रहो काहीवेळा असेही होते की कुंडली मधील प्रत्येक गुण सहज मिळतो, पण तरीही त्या दोघांची मने मात्र अजिबात एक झालेली नसतात. त्यामुळे त्यांच्या नात्यात नेहमीच कडवटपणा जाणवतो.

पण काहीवेळा असे होते की कुंडली न पाहता, फक्त मने जुळल्यावर लग्न केलेले जोडपे अगदी उतारवयात देखील आपल्या जीवनसाथीवर भरभरून प्रेम करत असतात. कुंडली पाहणे काही जास्त गरजेचे आहे असेही नाही.

पण जर आपल्या मनात काही शंका येत असेल तर आपण कुंडली पहावी. मात्र शंका निरसन होण्याऐवजी जर काही वेगळेच समोर येत असेल तर नात्याला तडा जाण्याची शक्यता असते. कुंडली जुळण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते, एकमेकांची मने जुळणे.

त्यांचे स्वभाव, सूर, विचार कसे आहेत यावर त्यांचे भविष्य अवलंबून असते. ते एकमेकाला किती चांगलं सांभाळतात यावर त्यांचे नाते अवलंबून असते. एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते, जोडीदार गुण दोषासहित स्वीकारण्यात आला पाहिजे.

त्यामुळे त्यांचे प्रेम वाढत राहील, अन्यथा त्यांना नेहमी करार केल्यासारखा संसार करावा लागले ज्यामध्ये कधीच प्रेम नसेल. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *