नमस्कार मित्रांनो.
ओम नमः शिवाय मित्रांनो सायंकाळची वेळ तिन्हीसांजेची वेळ ही खूपच महत्वाचे असते कारण यावेळी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होत असते. या तिन्ही सांजेच्या वेळी काही नियम आपण नक्की पाळायला हवेत. जेणेकरून माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल.
आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. सायंकाळच्या वेळी आपण दिवा बत्ती करतो. धूप दीपक करतो भगवंतांची आरती देखील करतो. आणि याच वेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल.
आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी हा मंत्र बोलायचा आहे. माता लक्ष्मीचा स्थिर आणि स्थायी वास आपल्या घरामध्ये राहावा यासाठी दररोज नियमित आपल्याला दिवाबत्तीच्या वेळी हा मंत्र म्हणायचा आहे. मित्रांनो तिन्हीसांजेच्या वेळी आपल्या घरामध्ये अंधार नसावा.
तसेच या वेळेमध्ये आपण काहीही खाऊ नये पिऊ नये. झोपू नये घरामध्ये वादविवाद भांडणे करू नयेत. घरातील वातावरण प्रसन्न असावे. जर तिन्हीसांजेच्या वेळी आपल्या घरामध्ये भांडणे कटकटी असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही.
त्यामुळे त्यांनी सांजेच्या वेळी आपल्या घरातील वातावरण आनंददायी असावे. मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल वायफळ खर्च होत असतील. आजार पणा मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत असेल.
तर सायंकाळच्या वेळी जेव्हा दिवाबत्ती कराल. तेव्हा देवाला धूप दीप दाखवल्यानंतर आपल्याला एका मंत्राचे तीन वेळा उच्चारण करायचे आहे. मंत्र आहे,
चंदनस्य महतपुण्यम पवित्रम पापनाशम् आपधाम हरते नित्यम लक्ष्मी तिष्टतू सर्वदा. या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो या मंत्राचा आपल्याला दररोज तीन वेळा जप करायचा आहे. दिवाबत्तीच्या वेळी धूप दीप लावल्यानंतर या मंत्राचे तीन वेळा अगदी श्रद्धा भावाने उच्चारण करायचे आहे.
आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थाई निवास करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तसेच जर तुमच्यावर खूप मोठे कर्ज असेल. आणि ते काही केल्या पटत नसेल तर अशावेळी तुम्ही घरामध्ये दिवा लावताना फक्त तेलाचा किंवा तुपाचा दिवा न लावता त्या दिव्या मध्ये एखादी काळीमिरी किंवा एखादी लवंग नक्की टाका.
असे केल्याने तुमच्यावर जर कर्ज आहे त्यातून तुमची सुटका लवकर होईल. कर्जाचा कितीही मोठा डोंगर असेल तरी काही दिवसांमध्ये ते कर्ज मीटेल. आणि अनेक मार्गांनी पैसा घरामध्ये येऊ लागेल. तर मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये अशा आर्थिक अडचणी असतील आर्थिक समस्या असतील. तर माता लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये स्थायी निवास राहत नसेल.
वायफळ खर्च होऊन घरातील पैसा घराबाहेर जात असेल. तर अशावेळी तुम्ही नियमितपणे हा उपाय अवश्य करा. तिन्हीसांजेच्या वेळी या मंत्राचा जप नक्की करा. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होईल. आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी सोबत संपत्ती देखील येईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवश्य लिहा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद