घरातील तिजोरीवर ठेवा ही १ वस्तू आणि पहा, गरिबी झटक्यात कमी होऊन तुम्ही धनवान व्हाल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे हवे असतात, त्यामुळे त्यासाठी प्रत्येकजण विशेष कार्यक्षम असतो. काहीजण चांगली नोकरी शोधत असतात, काहीजणांचा व्यापार असतो. त्यामुळे प्रत्येकाची पैसा कमावण्यासाठी एक नियोजन पद्धती असते.

मात्र तो पैसा नीट राखता पण यायला हवा. काहीवेळा असेही होते की आपण पैसे तर खूप कमावतो पण ते पैसे आपल्या हातातच राहत नाहीत. हातात येताच लगेच खर्च होऊन जातात, त्यामुळे आपल्या गरजा देखील अपूर्ण राहतात. मग घरात वादविवाद सुरू होणे. नात्यांमध्ये वाईट पणा येतो.

आपण आपले पैसे, दागदागिने तिजोरीत ठेवतो. आपणाला नेहमी असे वाटते की आपली तिजोरी ही नेहमीच धनाने भरलेली असावी. पण मित्रहो यासाठी तुम्हाला काही उपाय देखील करावे लागतील, जर तुम्ही हे उपाय केला तर तुम्हाला धनसंपत्ती तर लाभेलच शिवाय तुमची धनसंपत्ती जपून ठेवण्यास सुद्धा मदत होईल.

आपण पैशाला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतो, मग ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीने वास्तव्य करावे असे आपणाला वाटते ते स्थान नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असणे आवश्यक असते. त्यामुळे तिजोरीची जागा दररोज स्वच्छ करावी.

तसेच रोज ही तिजोरी आतून व बाहेरून स्वच्छ कपड्याने पुसावी. या तिजोरीवर कोणतेही बिनकामाचे किंवा अडगळीचे सामान ठेवू नये. जर आपली तिजोरी अस्वच्छ असेल किंवा तिच्यावर काही रिकामे सामान असेल तर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी कधीच राहत नाही.

मित्रहो जर आपणाला आपली आर्थिक स्थिती मजबूत ठेवायची असेल तर आपल्याला हा उपाय करावाच लागेल. यामध्ये आपण एक विड्याचे पान घ्यायचे आहे. यावर तीन लवंगा, तीन वेलदोडे आणि मोठा तुकडा दालचिनी घ्यायची आहे.

त्यानंतर या पानाचा विडा बनवायचा आहे, व ते विड्याचे पान एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून घ्यायचे आहे. ही गाठोडी बांधताना सुद्धा पिवळ्या रंगाचाच दोरा वापरावा. तसेच जेव्हा ही गाठोडी बांधून होईल, त्यानंतर येत्या पौर्णिमेच्या दिवशी तिला आपल्या घरातील तिजोरीवर ठेवायची आहे.

त्यानंतर धूप ओवाळून तिजोरीचे, आणि त्या गाठोडीचे पूजन करावे. रात्रभर ती गाठोडी तशीच ठेवावी, व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती गाठोडी सोडून ते पान वेगळे करावे. ते पान आणि त्यावरील वेलदोडे, दालचिनी, लवंगा काढाव्या व पुन्हा नवे पान बनवावे.

पिवळ्या रंगाचा कपडा वापरून ती गाठोडी तयार करून पुन्हा तिजोरीवर ठेवून द्यावी. यामधूम फक्त पान बाहेर काढायचे आहे, यातील कापड व सामग्री तशीच ठेवायची आहे. हा उपाय मित्रहो २७ दिवस करायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहील.

हळूहळू आपल्या तिजोरीतील धनात वाढ होऊ लागेल. मित्रहो हा उपाय नक्की करून पहा. तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *