नवऱ्याच्या भरभराटी साठी बायकोने हे उपाय केल्यास…घरात धनसंपत्ती नक्कीच वाढेल….!

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो अनेकदा आपल्या मनात असा विचार येतो की आपल्या कडे भरपूर पैसे असावेत. आपण खूप श्रीमंत व्हावे, आणि काही लोकांकडे असे भरपूर पैसे देखील येतात. त्यांच्या कष्टाला योग्य मान मिळून, त्याचे यश त्यांना प्राप्त होते. त्यामुळे ते लोक खूप धनवान बनतात.

व आरामात जीवन जगतात. मात्र काही लोकांचे जीवन खूपच हलाखीत जात असते, त्यांच्या मेहनतीला योग्य फळ न मिळता त्यांच्या वाट्याला दुःख दारिद्र्य भरपूर प्रमाणात साचलेले असते. त्यांना जितका हवा असतो तितका पैसा मिळत नाही, खर्च वाढतो पण त्यामानाने त्यांचे उत्पन्न नसते.

मित्रहो पण जरी असे असले तरीही घाबरण्याचे काहीच कारण नाही, तुम्हाला आजच्या या लेखातून काही असे उपाय मिळणार आहेत ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली बनेल. मंडळी सर्वप्रथम आपल्या देवावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे.

त्यामुळे तुम्ही भगवंतावर विश्वास नक्की ठेवा. दररोज त्यांची पूजा करावी, त्यांचा एखादा मंत्र असेल तर तो उत्साहाने म्हणावा त्यामुळे घरातील वातावरण सुखमय होईल. सकारात्मकता पसरेल. त्यामुळे पूजा झाल्यावर घरात मोठमोठ्याने मंत्र उच्चारावे.

तसेच जेव्हा घरातील एखादी व्यक्ती जर काही कामानिमित्त बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीच्या कपाळावर टिळा लावावा. कोणतेही काम असो, नोकरीचे असो, स्वतःचा व्यवसाय असो. घरातील व्यक्ती या कामासाठी बाहेर जात असताना घरातील स्त्रीने त्या व्यक्तीच्या कपाळावर गंध लावावा.

तसेच घराच्या बाहेर जाताना दक्षिण दिशेला छोटासा गुळाचा खडा टाकावा, तिथे तो मुंग्यांना खायला मिळतो व आपणाला हजारो मुंग्यांना भोजनासाठी गूळ दिल्यानिमित्त सहस्त्र भोजनाचे सुख मिळते.

तसेच घरातून बाहेर पडताना आपली जी नाडी चालू असते, म्हणजेच नाकपुडीवर हाथ ठेवून दुसऱ्या नाकपुडीतून श्वास सोडावा अशावेळी ज्या नाकपुडीतून जास्त श्वास जातो ती नाडी चालू असते. त्या नाडीच्या दिशेचा पाय घराबाहेर टाकावे.

तसेच घराबाहेर पडताना आपली नजर आकाशाकडे ठेवावी, त्यामुळे आपणाला उंच ध्येय प्राप्त होते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळत जाईल. तुमची झेप देखील उंच जाईल, व यश तुमच्या कवेत येईल. त्यामुळे घरातून बाहेर जाताना या काही गोष्टी जाणीवपूर्वक हाताळाव्या.

तसेच जर आपण घरात परतत असताना काही विसरून आलो असेल, आणि काही आणायचे असेल तर त्यावेळी झाडाचे एखादे पान किंवा माती घरात घेऊन यावी. पण रिकाम्या हाताने घरामध्ये येऊ नये.

जर माती आणली असेल तर तिचा टिळा कपाळाला लावून मगच ती टाकून द्यावी आणि जर पान आणले असेल तर ते थोडे दाताखाली घ्यावे व नंतर टाकून द्यावे. तसेच घराबाहेर जाताना थोडेसे तरी पैसे घेऊनच जावे, रिकाम्या हाताने जाऊ नये. त्यामुळे पैसा नेहमीच तुमच्या जवळ येत राहील.

तर मित्रहो हे उपाय नक्की करून पहा, तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा तसेच आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *